Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Nilesh Rane Challenges Aditya Thackeray: राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा डिवलं आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Nilesh Rane Challenges Aditya Thackeray : राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा डिवलं आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Nilesh Rane Challenges Aditya Thackeray: राजकोट किल्ल्यावर बुधवारी झालेल्या राड्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोशल मीडियावरुन पुन्हा डिवचलं आहे. रात्री पावणे दोनच्या सुमारास निलेश राणेंनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवर पोस्ट करत ठाकरेंना आव्हान दिलं आहे. सध्या निलेश राणेंची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर पहाणीसाठी पोहोचलेले आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं. राजकोट किल्ल्यावरच दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापसात भिडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने मालवणमध्ये धडक मोर्चाची घोषणा केली होती. या मोर्चासाठी मालवणमध्ये पोहोचलेल्या आदित्य ठाकरेंनी ज्यावेळी किल्ल्याला भेट दिली त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेही पहाणीसाठी आले होते. त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखलं. मात्र काही वेळाने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पुन्हा एकदा भिडले.किल्ल्यावरील या वादानंतर निलेश राणेंनी सोशल मीडियावरुन पुन्हा ठाकरेंना आव्हान दिलं आहे."ठाकरे यांची खरी लायकी महाराष्ट्राला कळली. ठाकरे आमदार, एक विरोधी पक्ष नेता आणि एक माजी खासदार असून सुद्धा हतबल झाले," असं निलेश राणे म्हणाले आहेत."अडीच तास लपून बसावं लागलं. उबाठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांसमोर मार खाल्ला. मैदान सोडून एका बाजूने सटकावं लागलं," असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी,"हा ट्रेलर होता अर्धा तास अजून थांबला असता तर पूरा पिक्चर दाखवला असता," असा इशारा दिला आहे. तर पोस्टच्या शेवटी,"आदित्यसारखा घाबरट मी बघितला नाही," असं म्हणत थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.दरम्यान, किल्ल्यावरील बाचाबाची आणि राड्यावर प्रतिक्रिया नोंदवताना आदित्य ठाकरेंनी, "आम्ही येथे नीट येत होतो. ही काय लढाई करण्याची जागा आहे. ही बालबुद्धी किती दिवस सहन करायची. माझ्यावर हल्ला करण्याचा 100 टक्के हेतू होता. कारण ते मला घाबरतात. पण माझ्या खिशात कोंबड्या नाहीत," असा टोला लगावल्याचं पाहायला मिळालं.उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणार
Nilesh Rane Challenges Aditya Thackeray Fight Supoorters Rajkot Fort
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
दागिने खरेदी करणे महागले; सोनं वधारलं, वाचा आजचा प्रतितोळ्याचा भावGold Price Today In Marathi: ऑगस्ट महिना सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Read more »
महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलंMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलंय.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप केला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनीही पलटवार केलाय..
Read more »
पवार-शिंदेंच्या बैठकीला अदानींचे अधिकारी: उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांची भूमिका...'Eknath Shinde Sharad Pawar Meeting Adani Connection: उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
Read more »
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरणSindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
Read more »
'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोलShivaji Maharaj Statue Collapse : मोर्चात मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे नारायण राणेंवर नाव न घेता केला. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
Read more »
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुन्हेगार फरार; पोलिसांच्या कारभारावर शिवप्रेमी संतापलेसिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाल्यानं शिवप्रेमी संतप्त झालेत.
Read more »
