मोठी बातमी! तिसऱ्या मुंबईसाठी नेमकं कसं होणार भूसंपादन? त्या 124 गावांचं, जमीन मालकांचं काय होणार?

Navi Mumbai News

मोठी बातमी! तिसऱ्या मुंबईसाठी नेमकं कसं होणार भूसंपादन? त्या 124 गावांचं, जमीन मालकांचं काय होणार?
MumbaiNavi Mumbai AirportThird Mumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 175 sec. here
  • 24 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 143%
  • Publisher: 63%

Third Mumbai near Navi Mumbai outskirts : आकार घेतेय तिसरी मुंबई. बातमी भूसंपादनाविषयी.... कोणत्या स्वरुपात जमीन मालकांना मिळणार मोबदला? टक्केवारी काय? पाहा A to Z माहिती...

Third Mumbai near Navi Mumbai outskirts : मुंबई. हे शहर जितक्या झपाट्यानं वाढलं तितक्याच वेगानं या शहरालहत असणाऱ्या उपनगरांचा विकासही मागील पाच वर्षांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला नवी मुंबई, त्यामागोमाग दुसरी मुंबई आणि आता थेट तिसऱ्या मुंबईला उभारण्यासाठी एमएमआरडीए आणि सिडकोनं पुढाकार घेतला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणुकीचा वाव असणाऱ्या या भागांचा चेहरामोहरा पुढील काही वर्षांमध्ये पूर्णत: बदलणार आहे.

Third Mumbai near Navi Mumbai outskirts : मुंबई... हे शहर जितक्या झपाट्यानं वाढलं तितक्याच वेगानं या शहरालहत असणाऱ्या उपनगरांचा विकासही मागील पाच वर्षांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला नवी मुंबई, त्यामागोमाग दुसरी मुंबई आणि आता थेट तिसऱ्या मुंबईला उभारण्यासाठी एमएमआरडीए आणि सिडकोनं पुढाकार घेतला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणुकीचा वाव असणाऱ्या या भागांचा चेहरामोहरा पुढील काही वर्षांमध्ये पूर्णत: बदलणार आहे. याच धर्तीवर अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर आली असून, यामध्ये तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन किंवा जमीन अधिग्रहण प्रक्रिया नेमकी कशी पार पडणार आहे आणि यामध्ये जमीन मालकांना नेमका कोणत्या स्वरुपात मोबदला मिळणार आहे, यासंदर्भातील माहिती नुकतीच समोर आली आहे. मोठा निर्णय आणि तितकाच मोठा बदल... मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या वतीनं कर्नाळा- साई- चिरनेर इथं नव्यानं एक शहर उभारण्यासाठी सिडको आणि एमआयडीसीकडून जमीन संपादन करण्याचा मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये जमीन मालकांना मोबदल्याच्या स्वरुपात समाधानकारत परतावा दिला जाणार आहे. प्राथमिक स्वरुपात जमीन मालकांना या संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेमध्ये 12.5% आणि 22.5% असे दोन पर्याय दिला जाऊ शकतो. या संपूर्ण तिसऱ्या मुंबईमध्ये 124 गावांमधील जमिनींचं अधिग्रहण केलं जाणार असून, यामध्ये खालीलप्रमाणं गावांची विभागणी समोर येते. नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील 80 गावं खोपटा नवनगर क्षेत्रातील 33 गावं मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील 2 गावं रायगड प्रादेशिक क्षेत्रातील 9 गावं अशा एकत्रित 124 गावांचा समावेश.... स्थानिकांचा विरोध अपेक्षित? तिसऱ्या मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहण गरजेचं असून यासाठी यंत्रणांना स्थानिक विरोध अपेक्षित असल्यानं यशस्वी झालेल्या मॉडेलच्याच धर्तीवर सिडको आणि एमआयडीसीचं सूत्र इथं अवलंबलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याअंतर्गत जमीन मालकांना पुरेसा मोबदला देण्यावरही यंत्रणांचं लक्ष केंद्रीत असेल. हेसुद्धा वाचा : मुंबईतील एक रस्ता पालिकेला करुन देतोय लाखोंची कमाई... सायकल, दुचाकीलाही नो एंट्री; कुठंय ही वाट?काय असेल मोबदल्याचं स्वरुप? 12.5 टक्के विकसित भूखंड धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या मोबदल्यात विकसित केलेली 12.5 टक्के जमीन परत दिली दाते. यामध्ये 30 टक्के जागा सामाजिक सुविधांसह सार्वजनिक कामांसाठी राखीव असते. तर, नवी मुंबई विमानतळादरम्यान 2014 पासून लागू असणाऱ्या 22.5 टक्के धोरणानुसार पुनर्वसन झालेल्या गावांना आरोग्य केंद्र, बाजारपेठ, शाळा, प्रशासकीय इमारती, धार्मिक स्थळं असा सुविधा देण्यात येतात. दरम्यान तिसऱ्या मुंबईसाठी एमआयडीसीचं धोरण लागू झाल्यास औद्योगिक प्रकल्पांसाठी जमिनीतील 15 टक्के भाग औद्योगिक आणि 5 टक्के भाग जमिनीचा भाग प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा विचारही केला जात आहे. तेव्हा आता ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कोणत्या आणि कशा टप्प्यांमध्ये पार पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कसं असेल हे स्वप्नातलं शहर? अटल सेतूचा फायदा आर्थिक स्वरुपात करून घेत या प्रभावित क्षेत्पातील साधारण 323.44 चौकिमी क्षेत्रांतील गावांचा विकास होणार असून, ही स्वप्नातली तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे. 32300 हेक्टर क्षेत्रफळाच्या अतिप्रचंड भूखंडावर हे शहर उभारण्यात येणार आहे. FAQतिसरी मुंबई प्रकल्प म्हणजे काय?तिसरी मुंबई हा मुंबई महानगर प्रदेशाच्या विस्ताराचा भाग आहे, ज्यात अटल सेतू जवळील 323.44 चौरस किलोमीटर क्षेत्रात एक स्वयंपूर्ण शहर विकसित केले जाईल. तिसरी मुंबई कुठे आणि कशा विकसित होणार आहे?हा प्रकल्प नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात, खोपटा नवनगर आणि मुंबई-रायगड प्रादेशिक क्षेत्रात विकसित होईल. MMRDA ने CIDCO आणि MIDC च्या यशस्वी मॉडेलचा अवलंब केला आहे. स्थानिक विरोधाची शक्यता आहे का आणि त्यावर काय उपाययोजना?होय, शेतकरी आणि स्थानिकांकडून विरोध अपेक्षित आहे, कारण मोठ्या प्रमाणात शेतीची जमीन जाईल. मात्र, MMRDA ने CIDCO च्या यशस्वी मॉडेलचा अवलंब केला आहे, ज्यात पुरेसा मोबदला आणि पुनर्वसन सुविधा देण्यात येतील.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Navi Mumbai Airport Third Mumbai Planned Land Aqusition MIDC Cidco Land Owners Land Deal Cidco Lottery CIDCO Land Deals Latest News News मराठी बातम्या एमआयडीसी जमीन भूसंपादन जमीन अधिग्रहण कायदा तिसरी मुंबई नवी मुंबई विमानतळ मराठी बातम्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'विमातनळाला मोदींचं नाव.., दि. बा. पाटलांच्या नावाला अदानींचा विरोध असून..'; खळबळजनक दावा'विमातनळाला मोदींचं नाव.., दि. बा. पाटलांच्या नावाला अदानींचा विरोध असून..'; खळबळजनक दावाNavi Mumbai Airport Name Issue: महाराष्ट्रातील खासदाराने एक धक्कादायक दावा केला असून विमानतळाचं काम अर्धवट असतानाच उद्घाटन केल्याचंही म्हटलंय.
Read more »

नवी मुंबई एअरपोर्टजवळ घरं, दुकानं, बंगल्यांच्या प्लॉटसाठी आज ऑनलाइन लिलाव; किंमत...नवी मुंबई एअरपोर्टजवळ घरं, दुकानं, बंगल्यांच्या प्लॉटसाठी आज ऑनलाइन लिलाव; किंमत...Navi Mumbai Airport Property: भूखंड निवासी, व्यावसायिक, बंगला आणि सेवा उद्योगाच्या उद्देशाने वापरता येणार आहेत.
Read more »

'आई-बाबा सॉरी, मी...', नवी मुंबईत 10 वीच्या मुलीने स्वत:ला संपवलं! चिठ्ठीतून समोर आलं खरं कारण'आई-बाबा सॉरी, मी...', नवी मुंबईत 10 वीच्या मुलीने स्वत:ला संपवलं! चिठ्ठीतून समोर आलं खरं कारणNavi Mumbai Shocking News: ही मुलगी दहावीला शिकत होती. सायंकाळी आई घरी आल्यानंतर समोरचं दृष्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली.
Read more »

भयंकर! नवी मुंबईसह ठाण्यात अग्नितांडव; घटनाक्रम वाचून मन विचलित होईल...भयंकर! नवी मुंबईसह ठाण्यात अग्नितांडव; घटनाक्रम वाचून मन विचलित होईल...Fire Accident News Navi Mumbai Thane : कुठं आणि कशा घडल्या आग लागण्याच्या भीषण घटना? दिवाळीदरम्यान काळजी घ्या...
Read more »

Navi Mumbai Fire Outbreak: നവി മുംബൈയിൽ ഫ്ലാറ്റിൽ തീപിടിത്തം; നാല് മലയാളികൾ ഉൾപ്പെടെ നാല് പേർ മരിച്ചുNavi Mumbai Fire Outbreak: നവി മുംബൈയിൽ ഫ്ലാറ്റിൽ തീപിടിത്തം; നാല് മലയാളികൾ ഉൾപ്പെടെ നാല് പേർ മരിച്ചുനവി മുംബൈയിൽ ഫ്ലാറ്റിൽ തീപിടിത്തം
Read more »

दिवाली की रात आग की चपेट में आईं मां-बेटी, फ्लैट के अंदर दर्दनाक मौतदिवाली की रात आग की चपेट में आईं मां-बेटी, फ्लैट के अंदर दर्दनाक मौतNavi Mumbai Fire Accident: फायर ब्रिगेड डिपार्टमेंट की तरफ से कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया लेकिन तब तक मां और बेटी की दर्दनाक मौत हो चुकी थी.
Read more »



Render Time: 2026-04-02 06:59:07