मुकेश अंबानींची मोठी भविष्यवाणी! पहलगाम हल्ल्यावर PM मोदींसमोर केलं मोठं विधान

Mukesh Ambani News

मुकेश अंबानींची मोठी भविष्यवाणी! पहलगाम हल्ल्यावर PM मोदींसमोर केलं मोठं विधान
Entertainment HubIndiaMedia Industry
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 150 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 101%
  • Publisher: 63%

Mukesh Ambani On Entertainment Revolution: मुकेश अंबानींनी म्हटलं आहे की, आम्ही जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची बरोबरी करण्याच्या आणि त्यांच्या पुढे जाण्याच्या महत्त्वाकांक्षेने जियोहॉटची सुरुवात केली.

Mukesh Ambani On Entertainment Revolution: मुकेश अंबानी ंनी म्हटलं आहे की, आम्ही जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची बरोबरी करण्याच्या आणि त्यांच्या पुढे जाण्याच्या महत्त्वाकांक्षेने जियोहॉटची सुरुवात केली.

भारताला मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचं आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. आपला कंटेंट, लोकसंख्या आणि तंत्रज्ञानाच्या आधेर भारत लवकरच या क्षेत्रात मक्तेदारी करेल असंही ते म्हणाले आहेत. मुकेश अंबानी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 मध्ये बोलत होते. पुढील दशकापर्यंत भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र चारपटींनी वाढ नोंदवेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. म्हणजेच 100 अरब डॉलरपेक्षा मोठा आकडा गाठू शकतो. सध्या मार्केट 28 अरब डॉलर्सचं आहे. मुकेश अंबानी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत एक आघाडीचा डिजिटल राष्ट्र बनला आहे. कथा सांगण्याची शैली आणि डिजिटल तंत्रज्ञान यांच्या संगमामुळे भारताच्या मनोरंजन आणि सांस्कृतिक प्रभाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. एआय आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कथा पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनवू शकतात. तसंच ते विविध भाषा, देश आणि संस्कृतींमधील प्रेक्षकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतात. मला विश्वास आहे की भारतातील अति-प्रतिभावान तरुण जागतिक मनोरंजन क्षेत्रावर राज्य करतील.आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख करत ते म्हणालेकी,"AI आता मनोरंजनासाठी ते करत आहे, जे 100 वर्षांपूर्वी सायलेंट कॅमेराने केलं होतं. तेदेखील लाखपटीने उत्तम असेल. जगातील लोक मागील 5 हजार वर्षांपासून गोष्टी ऐकत आहे. कंटेंट आणि लोकसंख्येनंतर भारताची तिसरी ताकद तंत्रज्ञान आहे. भारतात 1.2 बिलियन मोबाईल फोन युजर्स आहेत. याचा अर्थ 1.2 बिलियन स्क्रीन आहेत, ज्यांचा उपयोग मनोरंजनासाठी केला जाऊ शकतो. जिओने हाय-स्पीड इंटरनेट डेटा परवडणारा बनवून भारतातील डिजिटल आणि मनोरंजन क्रांतीचा पाया रचला आहे. 5G वर बांधलेली आमची जागतिक दर्जाची डिजिटल पायाभूत सुविधा लवकरच 6G पर्यंत वाढवली जाईल."मुकेश अंबानी पुढे म्हणाले की,"आम्ही जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची बरोबरी करण्याच्या आणि त्यांच्या पुढे जाण्याच्या महत्त्वाकांक्षेने जियोहॉटची सुरुवात केली आहे. हे भारत आणि परदेशातील सर्वोत्तम प्रतिभांना एक व्यासपीठ उभारत आहे. आम्ही प्रेक्षकांच्या संख्येचे रेकॉर्ड तोडले आहेत, आयपी स्ट्रीमिंगमध्ये क्रांती घडवली आहे आणि इमर्सिव्ह, बहुभाषिक, इंटरअॅक्टिव्ह क्रीडा दृश्यांचे जागतिक मानक देखील बदलले आहेत. आणि ही फक्त सुरुवात आहे. डिस्नेसोबत जिओची भागीदारी डिजिटल स्टोरी-टेलिंगमध्ये एका नवीन युगाची सुरुवात आहे."त्यांनी सांगितलं की,"वेव्ह्स इनोव्हेशन, संस्कृति आणि सहयोगाचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू होण्यास तयार आहे. आपला 5 हजारांहून अधिक वर्षाचा इतिहास आहे. आपल्याकडे गोष्टी, कथांचा मोठा खजिना आहे. रामायण आणि महाभारतापासून आपल्याकडे डझनभर भाषांमध्ये लोककथा आणि क्लासिक्स आहेत. यामध्ये मूल्य, बंधूता, शौर्य, प्रेम आणि सुंदरता आहे जे जगभरातील लोकांच्या मनाला स्पर्श करतात. कोणताही देश भारताच्या कथा सांगण्याच्या ताकदीला स्पर्धा देऊ शखत नाही". पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत ते म्हणाले की,"आम्ही सर्व पीडित कुटुबांप्रती संवेदना व्यक्त करतो. इतक्या कठीण काळातही पंतप्रधानांनी येथे येणं देशासाठी संदेश आहे. मोदीजी शांतता, न्याय आणि माणुसकीच्या शत्रूंविरोधातील या लढाईत तुम्हाला 145 कोटी भारतीयाचं समर्थन आहे. भारताचा विजय निश्चित आहे".उन्हाळ्यात मलईदार दही लावायचं आहे? 2 तासात होईल तयार, जाणून...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Entertainment Hub India Media Industry Business Growth Creative Industries मुकेश अंबानी मनोरंजन हब भारत मीडिया उद्योग व्यावासिक वृद्धि रचनात्मक उद्योग

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'ठाकरे एकत्र येणार की नाही हे रश्मी ठाकरेंच्या इच्छेवर...', खळबळजनक विधान करत नितेश राणे म्हणाले, 'ज्यांनी ज्यांनी..''ठाकरे एकत्र येणार की नाही हे रश्मी ठाकरेंच्या इच्छेवर...', खळबळजनक विधान करत नितेश राणे म्हणाले, 'ज्यांनी ज्यांनी..'Nitesh Rane On Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच नितेश राणेंनी केलं एक महत्त्वाचं विधान
Read more »

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरची दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाला...पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरची दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाला...Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जवळपास 28 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. 2019 पुलवामानंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.
Read more »

'जर इस्लामच्या नावे...,' असदुद्दीन ओवेसी यांचं मुस्लिमांना जाहीर आवाहन, म्हणाले 'उद्या नमाज-ए-जुम्मा अदा करताना...''जर इस्लामच्या नावे...,' असदुद्दीन ओवेसी यांचं मुस्लिमांना जाहीर आवाहन, म्हणाले 'उद्या नमाज-ए-जुम्मा अदा करताना...'Asaduddin Owaisi on Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना आवाहन केलं आहे.
Read more »

भारत के सख्त एक्शन के बाद बैकफुट पर पाकिस्तान, अब पहलगाम हमले की जांच के लिए तैयारभारत के सख्त एक्शन के बाद बैकफुट पर पाकिस्तान, अब पहलगाम हमले की जांच के लिए तैयारपहलगाम हमले की जांच के लिए पाकिस्‍तान तैयार, जानें PM शहबाज शरीफ ने क्‍या कहा
Read more »

'तिथं मरणारा पहिला मुस्लीमच होता आणि...' पहलगाम हल्ल्यानंतर अनुराग कश्यप नेमकं काय सुचवू पाहतोय?'तिथं मरणारा पहिला मुस्लीमच होता आणि...' पहलगाम हल्ल्यानंतर अनुराग कश्यप नेमकं काय सुचवू पाहतोय?Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट भूमिका मांडली.
Read more »

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचं मोठं पाऊल, राफेलचा करारामुळे पाकचा थरथराट!पहलगाम हल्ल्यानंतर भारताचं मोठं पाऊल, राफेलचा करारामुळे पाकचा थरथराट!Rafale Marine: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यंटकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलीय. दहशतवादी आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घड़वण्याची मागमी जोर धरू लागलीय. यातच आता भारत सरकारने एक मोठं पाऊल उचललंय. भारताने फ्रान्ससोबत 26 राफेल मरीन विमानांसाठीचा करार केलाय.
Read more »



Render Time: 2026-04-02 03:10:25