भाजपासोबत युती करण्याचे दोन्ही प्रयत्न फेल, अखेर MIM ने घेतला मोठा निर्णय; इम्तियाज जलील यांची मंचावरुन घोषणा

MIM News

भाजपासोबत युती करण्याचे दोन्ही प्रयत्न फेल, अखेर MIM ने घेतला मोठा निर्णय; इम्तियाज जलील यांची मंचावरुन घोषणा
AkolaAkotBJP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 119 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

MIM alliance with BJP in Akot: अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपा आणि एमआयएम युतीचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला होता. मात्र स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीच्या माध्यमातून या युतीचा ‘पार्ट 2’ यशस्वी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

MIM alliance with BJP in Akot : अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषद एका वेगळ्या राजकीय समीकरणामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला आली आहे. अकोट नगरपरिषदेत भाजपा ने आणि एमआयएमची युती झाल्याने कधीही न होणारे दोन पक्ष एकत्र कसे आले याचं आश्चर्य वाटत होतं.

मात्र नंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना युतीसाठी जबाबदार धरत हात झटकले होते. पण त्यानंतही दुसऱ्यांदा युतीसाठी प्रयत्न झाला. यानंतर आता एमआयएमने संबंधित नगरसेवकांवर कारवाई केली आहे. एमआयएमने या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून, पाच जणांना पक्षातून हकालपट्टी केली आहे. भाजपा-एमआयएम युतीचे दोन प्रयत्नअकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपा आणि एमआयएम युतीचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला होता. मात्र स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीच्या माध्यमातून या युतीचा ‘पार्ट 2’ यशस्वी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून भाजपाचे जिल्हा सदस्य आणि माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे सुपुत्र जितेन बरेठिया यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती आणि जितेन बरेठिया यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यातही आले. या निर्णयामुळे एमआयएममधील काही नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली असून एका नगरसेविकेच्या पतीने थेट सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गट स्थापन करताना स्वीकृत गैर मुस्लिम उमेदवार न घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र ते पाळलं गेलं नाही असा आरोप नाराज नगरसेविकेच्या पतीने केला आहे. दरम्यान भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जितेन बरेठिया यांचा भाजपाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत या प्रकरणापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या गटाकडून सुचविण्यात आलेल्या जितेन बरेठिया यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. या घडामोडींमुळे अकोट नगरपरिषदेत भाजप–एमआयएम युतीचा दुसरा टप्पा यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे. मात्र या प्रकरणात एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराला मदत केल्याचा ठपका ठेवत त्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कृती पक्षविरोधी असल्याचं सांगत एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी पत्राद्वारे नोटीस बजावली आहे. तर संभाव्य स्वीकृत नगरसेवक उमेदवार ताज राणा यांनी व्हिडिओद्वारे या पाच नगरसेवकांवर विश्वासघाताचा आरोप करत त्यांना मदत न करण्याचं आवाहन केलं. तर पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली. या सर्व घडामोडींवर अखेर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आपल्या जाहीर भाषणात संबंधित पाचही नगरसेवकांना पक्षातून निष्कासित केल्याची घोषणा केली आहे. मात्र अधिकृत पत्राद्वारे ही आदेश पारित करण्यात आलेले नाही.अकोट नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीमुळे भाजप–एमआयएम युतीचा दुसरा टप्पा यशस्वी झाला आहे. मात्र या निर्णयामुळे एमआयएममध्येच नाराजी निर्माण झाली असून राजीनामे, नोटिसा आणि अखेर थेट निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे अकोटच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Akola Akot BJP भाजपा अकोट अकोला

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

பாஜக கூட்டணி வரலாறு: இதுவரை சந்தித்த தேர்தல்களும்... வெற்றி, தோல்விகளும்...பாஜக கூட்டணி வரலாறு: இதுவரை சந்தித்த தேர்தல்களும்... வெற்றி, தோல்விகளும்...AIADMK - BJP Alliance: தமிழ்நாடு தேர்தல் வரலாற்றில், அதிமுக - பாஜக கூட்டணி சந்தித்த வெற்றி, தோல்விகள் குறித்து இங்கு விரிவாக காணலாம்.
Read more »

Cooperative Bank Election: ৪১-এ ৪১! ভোটে জিতল রাম-বাম, হাইকোর্টে যাচ্ছে তৃণমূল...Cooperative Bank Election: ৪১-এ ৪১! ভোটে জিতল রাম-বাম, হাইকোর্টে যাচ্ছে তৃণমূল...Left wins Cooperative Bank Election with by making alliance with BJP in West Midnapore
Read more »

यूपी में अखिलेश 50-60 सीट से ज्यादा नहीं देंगे: बिहार में दुर्गति के बाद राहुल मोल-भाव की हैसियत में नहींयूपी में अखिलेश 50-60 सीट से ज्यादा नहीं देंगे: बिहार में दुर्गति के बाद राहुल मोल-भाव की हैसियत में नहींUttar Pradesh Upcoming Election BJP Vs Congress SP BSP Alliance Politics Explained.
Read more »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच पक्षाच्या BJP नेत्यांवर नाराज, त्या निर्णयामुळे तीव्र नाराजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच पक्षाच्या BJP नेत्यांवर नाराज, त्या निर्णयामुळे तीव्र नाराजीDevendra Fadnavis on Alliance with Congress MIM: भाजपाने अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली असून, अकोलामध्ये थेट एमआयएमशी हातमिळवणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Read more »

Wont Be Tolerated: Fadnavis Slams BJP Leaders Congress-AIMIM Tie-UpsWont Be Tolerated: Fadnavis Slams BJP Leaders Congress-AIMIM Tie-UpsMaharashtra Chief Minister Devendra Fadnavis remarks came after reports of local BJP leaders entering post-poll alliances with the Congress and AIMIM in civic bodies in Ambernath and Akot without party approval.
Read more »

BJP–Congress alliance: অবিশ্বাস্য বিজেপি-কংগ্রেস জোটে নাটকীয় মোড়! সব হিসেব উলটে দিয়ে এবার...BJP–Congress alliance: অবিশ্বাস্য বিজেপি-কংগ্রেস জোটে নাটকীয় মোড়! সব হিসেব উলটে দিয়ে এবার...BJP–Congress alliance Big Update: Suspended over BJP–Congress alliance, 12 Congress councilors in Maharashtra Ambernath now join BJP
Read more »



Render Time: 2026-04-02 21:30:11