Pahalgam Attack PM Modi Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्च स्तरीय अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये आपली भूमिका केली स्पष्ट
पाकिस्तानवरील हल्ल्याची तयारी पूर्ण? उच्च स्तरीय बैठकीत मोदी म्हणाले, 'हल्ला कधी व कुठे करायचा हे.' Pahalgam Attack PM Modi Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्च स्तरीय अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये आपली भूमिका केली स्पष्टPM Modi In Heigh Level Security Meeting: पहलगाम येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार करुन 26 जणांचे प्राण घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला एका आठवड्याहून अधिक कालावधी पूर्ण झालेला असातनाच भारत या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करेल अशी जोरदार चर्चा आहे.
पाकिस्तानवरील हल्ल्याची तयारी पूर्ण? उच्च स्तरीय बैठकीत मोदी म्हणाले, 'हल्ला कधी व कुठे करायचा हे...' Pahalgam Attack PM Modi Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्च स्तरीय अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये आपली भूमिका केली स्पष्टPM Modi In Heigh Level Security Meeting: पहलगाम येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार करुन 26 जणांचे प्राण घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला एका आठवड्याहून अधिक कालावधी पूर्ण झालेला असातनाच भारत या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करेल अशी जोरदार चर्चा आहे. असं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवरील हल्ल्यासंदर्भात सूचक विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पहलगाम हल्ल्याला उत्तर कधी आणि कसं द्यायचं हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार लष्कराला असल्याचं मोदींनी उच्च स्तरीय सुरक्षा बैठकीमध्ये सांगितलं आहे. कोणाला लक्ष्य करावं, कधी हल्ला करावा हे सुद्धा लष्करच ठरवू शकतं, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणांवर पूर्ण विश्वास असून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल कोणतीही शंका नसल्याचं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख पंतप्रधान मोदींबरोबरच्या बैठकीमध्ये हजर होते.पंतप्रधान मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांची निवासस्थानीच भेट घेतली. भागवत यांनी मागील आठवड्यामध्ये 'धर्मा'नुसार भारताने शत्रूला शिक्षा केली पाहिजे, असं म्हटलं होतं. मंगळवारी झालेल्या बैठकीतील एक व्हिडीओ जारी करण्यात आला असून यामध्ये बैठकीत चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे.| PM Narendra Modi chairs a meeting with Defence Minister Rajnath Singh, NSA Ajit Doval, CDS and chiefs of all the Armed Forces. पंतप्रधानांनी पहलगाममधील येथील हल्ल्यानंतर घेतलेल्या दुसऱ्या बैठकीनंतर आज पंतप्रधान मोदी कॅबिनेटची बैठक घेणार आहेत. मंत्रिमंडळाशी संबंधित वेगवेगळ्या समित्यांबरोबर राजकीय आणि आर्थिक धोरणात्मक चर्चा या बैठकीमध्ये होणं अपेक्षित असून आज मंत्रिमंडळाची बैठकही होणार आहे."आपल्याकडे मर्यादीत वेळ असून मोठं लक्ष्य भेदायचं आहे," असं पंतप्रधान मोदींनी मंगळवारी एका शैक्षणिक कार्यक्रमातील भाषणामध्ये म्हटलं. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी थांबून,"मी सध्याच्या श्थितीबद्दल बोलत नाहीये" असंही म्हटलं.
PM Modi Armed Forces Freedom Targets Response To Pakistan
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मेट्रो स्टेशनवर अश्लील चाळे! त्याने गर्लफ्रेंडच्या टी-शर्टमध्ये हात घातला अन्..; Video मुळे संतापाची लाटCouple Vulgar Video At Metro Station: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होताना दिसत आहे. नेमकं घडलंय काय आणि कुठे जाणून घेऊयात...
Read more »
'फुले विरुद्ध फडणवीस!' म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'फडणवीसांनी मौन...'UBT Shivsena On CM Fadnavis: फडणवीस वगैरे लोकांनी ‘कश्मीर फाईल्स’, ‘ताश्कंद फाईल्स’, अलीकडेच ‘छावा’ चित्रपटावर भाष्य केले व हे चित्रपट पाहावेत असे लोकांना आवाहन केले.
Read more »
15 साल बाद होगी पाक-बांग्लादेश के बीच उच्च-स्तरीय बैठक, भारत की बारीक नजरपाकिस्तान और बांग्लादेश 15 वर्षों के बाद फिर से उच्च-स्तरीय वार्ता कर रहे हैं. दोनों देशों के बीच रक्षा सहयोग बढ़ाने पर चर्चा होगी. पाकिस्तानी एयरलाइंस ढाका के लिए उड़ानें शुरू करने की तैयारी में हैं. पाकिस्तान के विदेश मंत्री इसहाक डार 20-21 अप्रैल को ढाका का दौरा करेंगे.
Read more »
कुठे उन्हाची काहिली तर कुठे पावसाचा इशारा; आज महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? वाचा IMD चा इशाराMaharashtra Weather Update: कुठे उन तर कुठे उन्हाची काहिली असा अजब खेळ सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतोय.
Read more »
SSC HSC Result: दहावी- बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार, शिक्षण मंडळाची माहिती10th-12th Exams Results: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी - बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहेत.
Read more »
लख्ख सूर्यप्रकाश नाहीसा होणार; काळ्या ढगांची दाटी होत राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशाराMaharashtra Weather News : जे सांगितलं तेच होतंय...; राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा मारा, कुठे दिसणार सर्वाधिक प्रभाव? तुमच्या जिल्ह्यात आणि शहरात हवामानाची काय स्थिती?
Read more »
