Navi Mumbai News : नवी मुंबईतील एका महत्त्वाच्या परिसरात तब्बल 72 हजार कुटुंबांना त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे आणि तेही मोफत...कोण आहेत लाभार्थीपासून जाणून घ्या A ते Z जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Navi Mumbai News : प्रत्येकाला वाटतं आपलं हक्काचे घर असावं. पण गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या वाढलेल्या किंमतीमुळे घर घेणे हे सर्वसामान्याच्या आवाका बाहेर गेलं आहे. अशात राज्य सरकारकडून प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबईनंतर नवी मुंबईचा मोठ्या झपाट्याने विकास होतोय. नवी मुंबईतील बेलापूरमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला हिरवा कंदील मिळणार असून पात्र 72 कुटुंबांना आता त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. इतर रहिवाशांनाही नाराज होण्याची गरज नाही कारण त्यांनाही घरं मिळणार आहे. पण त्यांना यासाठी फक्त 2.5 लाख मोजावे लागणार आहे.गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक घेण्यात आली. ज्यात पंकज भोयर यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला. तर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी या प्रकल्पाबद्दल जाहीर केलं. त्या म्हणाल्यात की, बेलापूर मतदारसंघातील 72,665 कुटुंबांच्या आयुष्यात आता अच्छे दिन लवकरच येणार आहेत.नवी मुंबईत 72 हजार घरं आणि ती ही अगदी Free... राज्य सरकारने बेलापूर मतदारसंघातील झोपडीधारकांसाठी दोन मुख्य श्रेणी निश्चित केल्या आहेत. 72,665 कुटुंबांना पूर्णपणे मोफत घरं मिळणार आहे. तर बाकी लोकांना सवलतीच्या दरात घर मिळाली आहेत. मोफत घरं हे ज्या झोपडीधारकांचं पुरावे सन 2000 पूर्वीचे आहेत, त्यांना हक्काचे घर मोफत राज्य सरकार देणार आहे. तर जे कुटुंब 2000 ते 2011 या कालावधीतील आहेत, त्यांना राज्य सरकार फक्त 2.5 लाखांमध्ये घर देणार आहेत.या प्रकल्पासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सर्व पात्र झोपडीधारकांचे बायोमेट्रिक आणि डीएसआर तयार करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यासोबत मिळालेल्या माहितीनुसार तुर्भेमधील शिवाजी नगर भागात जीबीआर प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आला आहे. ही प्रक्रिया आता प्रगत टप्प्यावर पोहोचली असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय या योजनेचा लाभ कसा घ्यावा, यासाठी राज्य सरकार लवकरच नागरिकांसाठी मोठा मार्गदर्शन मेळावा आयोजित करणार आहे. लाभार्थी कोण पाहिलं का?या निर्णयाचा सर्वाधिक फायदा नवी मुंबईतील तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे, असं मंदा म्हात्रे यांनी सांगितलं. शहराच्या नियोजित विकासामध्ये या प्रकल्पामुळे नवी मुंबईचे रूप पालटणार असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Navi Mumbai Slum Housing Scheme Housing For Navi Mumbai Slum Dwellers Belapur तुर्भे शिवाजी नगर पुनर्विकास झोपडीधारकांसाठी सरकारी योजना नवी मुंबई
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Yogyasree Scheme Explainer: রাজ্য সরকারের বিরাট উদ্যোগ! যোগ্যশ্রী প্রকল্পে এবার মিলবে ৩০০০ টাকা, সঙ্গে... কারা পাবেন? কী যোগ্যতা? সব তথ্য এখানে...Yogyasree Scheme of West Bengal govt college students and job seeker will get 3000 rupees and free coaching
Read more »
China opens doors to 50 countries visa-free – Pakistan left out, what about India?The new rule lets people from selected countries travel to the country without a visa for a short stay starting from the 2026 Spring Festival, which celebrates the beginning of the Lunar New Year. This year, the festival began on February 17.
Read more »
बिहार के नक्सल प्रभावित क्षेत्रों में विकास कार्यों में तेजी: 1814 किमी सड़क, 72 पुलों का निर्माण पूराबिहार के नक्सल प्रभावित क्षेत्रों में सड़क कनेक्टिविटी परियोजना की समीक्षा हुई। केंद्र सरकार की बैठक में पथ निर्माण विभाग के सचिव पंकज कुमार पाल ने बताया कि औरंगाबाद, गया सहित आठ जिलों में 1814 किलोमीटर सड़क और 72 पुलों का निर्माण पूरा हो चुका है। शेष 24 किलोमीटर सड़क और तीन पुलों का कार्य मार्च तक पूरा कर लिया जाएगा, जिससे इन क्षेत्रों का विकास...
Read more »
बिहार के आखिरी नक्सली सुरेश कोड़ा ने हथियार डाले: एपस्टीन से नाम जुड़ने के चलते AI समिट से हटे बिल गेट्स,...feb 20 current affairs bihar naxal free state bill gates leaves ai summit
Read more »
Free Bus Scheme Smart Cards: మహిళలకు శుభవార్త..ఉచిత బస్సులో కీలక మార్పులు..బడ్జెట్లో భారీగా నిధులు!Mahalakshmi Free Smart Cards: తెలంగాణలో మహిళలకు అత్యంత ప్రజాదరణ పొందిన మహాలక్ష్మి ఉచిత బస్సు ప్రయాణ పథకం అమలులో ప్రభుత్వం మరో కీలక అడుగు వేసింది. రాష్ట్రవ్యాప్తంగా మహిళలకు ఉచిత ప్రయాణ సౌకర్యాన్ని మరింత మెరుగుపరిచేందుకు తెలంగాణ రాష్ట్ర రోడ్డు రవాణా సంస్థ (TGSRTC) భారీ ప్రణాళికలను సిద్ధం చేసింది.
Read more »
लखनऊ में 5 CHC बनेंगे ट्रॉमा सेंटर: 24 घंटे मिलेगा मरीजों को इलाज, 82 प्राइवेट हॉस्पिटल में घायलों को मिलेग...Lucknow hospitals free treatment accident victims. Follow latest updates on 82 private hospitals providing free treatment to accident victims in Lucknow.
Read more »
