Indian Players Troll Mohsin Naqvi: भारताच्या हक्काची ट्रॉफी आणि मेडल घेऊन पळून गेलेल्या मोहसीन नक्वी यांना भारतीय क्रिकेटर्सने ट्रोल केलंय ते ही अगदी भन्नाट पद्धतीने
Indian Players Troll Mohsin Naqvi: भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या आशिया चषक सामन्यानंतर दुबईच्या मैदानावर मध्यरात्रीनंतर मोठा राडा झाला. भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी संघ एक तास त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये बसून राहिला.
पाकिस्तानी संघाने जवळपास स्वत:ला कोंडूनच घेतलं. त्यानंतर उशीराने सुरु झालेल्या बक्षीस वितरण समारंभासाठी थांबून राहिलेल्या भारतीय संघाने आधी ठरल्याप्रमाणे काहीही झालं तरी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली.नक्वी स्टेजवर असेपर्यंत आम्ही स्टेजवर येणार नाही असं म्हणत भारतीय क्रिकेटर्सने आपली मेडल्सही घेतली नाहीत. मात्र यानंतर नक्वी ट्रॉफी आणि मेडल घेऊन निघून गेले. त्यामुळे वाट पाहूनही भारतीय संघाच्या हाती ट्रॉफी आलीच नाही. मात्र भारतीय संघाचं सेलिब्रेशन थांबलं नाही. मात्र या सेलिब्रेशननंतर भारतीय खेळाडूंनी हक्काची ट्रॉफी नाकारणाऱ्या मोहसीन नक्वी यांना भन्नाट पद्धतीने ट्रोल केलं आहे.ट्रॉफी शिवायही हार्दिकनं ट्रेण्ड सुरुच ठेवला तो असाभारतीय संघाने ट्रॉफी जिंकल्यानंतर सामान्यपणे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जिंकलेल्या ट्रॉफीसहीत पीचवर उभा राहून फोटो काढतो. 2024 च्या टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिकने ट्रॉफी पीचवर ठेऊन आपल्याला काही ठाऊक नसल्याची पोज देत फोटो शूट केलं होतं. त्यानंतर याच वर्षी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये पीचवर चॅम्पियन्स ट्रॉफी ठेवून फोटो काढला होता. मात्र आता आशिया चषक जिंकल्यानंतर भारताने पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तानच्या नक्वींच्या हस्ते चषक स्वीकारलाच नाही. त्यामुळे हार्दिकने त्याचा हा चषकासोबत फोटो काढण्याच्या ट्रेण्डमध्ये खंड पडू न देता अनोख्या पद्धतीने फोटो शूट केलं.नक्वी हे सुद्धा ट्रॉफी घेऊन निघून गेल्याने भारतीय संघाने नो ट्रॉफी सेलिब्रेशन केलं. मात्र आता ट्रॉफी नसतानाच ट्रॉफीसोबतचा फोटो कसा काढायचा हा जुगाड हार्दिकने अगदी भन्नाट पद्धतीने केला. त्याने पिचवर उभं राहून फोटो काढला आणि नंतर बाजूला ट्रॉफीचा इमोजी लावून तो आपल्या इन्स्ट्रामवरुन शेअर केला. सध्या त्याचा हा भन्नाट फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड होतोय. नक्वी यांची हार्दिकने चांगलीच जिरवल्याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. या पोस्टमधून हार्दिकने पाकिस्तानी मंत्र्यांची लाज काढल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. View this post on Instagram A post shared by Hardik Pandya गिल आणि अभिषेकची पोस्टदुसरीकडे भारताचे सलामीवर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मानेही हातात ट्रॉफी पकडल्याचा पोज देत त्यावर ट्रॉफी इमोजी वापरुन इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टला त्यांनी, आम्ही कोण आहोत हे सिद्ध करण्यासाठी ट्रॉफीची गरज नाही, अशी कॅप्शन दिली आहे. सुर्याचा खोचक टोलाभारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवनेही अंतिम सामना जिंकवून देणाऱ्या तिलक वर्मासोबत ट्रॉफी पकडल्याच्या पोजमध्ये फोटो काढून घेत ट्रॉफीचा इमोजी लावून फोटो शेअर केलाय. या पोस्टला सुर्याने, सामना संपल्यानंतर विजेता कोण आहे हे लक्षात ठेवतात ट्रॉफीचा फोटो नाही, असा टोमणा मारला आहे.When the game is done, only the champions will be remembered and not the picture of a pic.twitter.com/0MbnoYABE3— Surya Kumar Yadav September 28, 2025भारताचा नक्वींना इशारादरम्यान, आशिया चषक आणि भारतीय संघाच्या खेळाडूंनी न स्वीकारलेली पदकं नक्वी हे स्वत: सोबत घेऊन गेल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तातडीने भारताने जिंकलेली ट्रॉफी आणि पदकं भारताकडे सोपवावीत असा इशारा दिला आहे.
India Vs Pakistan Final Asia Cup 2025 Asia Cup Final 2025 Asia Cup Final News India Vs Pakistan Asia Cup 2025 India Vs Pakistan Score IND VS PAK Asia Cup 2025 IND Vs Pak PAK Vs IND Asia Cup 2025 IND VS PAK IND VS PAK Match Squad Ind Vs Pak Playing 11 IND Vs PAK Pitch Report Ind Vs Pak Weather Report Ind Vs Pak Scorecard Ind Vs Pak Live Score Asia Cup 2025 IND VS PAK Live Streaming India Vs Pakistan India Asia Cup 2025 Schedule India Asia Cup 2025 Match Dates Shubman Gill Team India Indian Cricket Team India Predicted XI Vs PAK Asia Cup 2025 India Squad Analysis Shubman Gill Asia Cup 2025
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
दिव्यांग डिलीवरी ब्वॉय ने महिला को भेजा ऐसा मैसेज, देख आंखों से छलक पड़े आंसू, देखें Viral PostViral Post: एक दिव्यांग डिलीवरी पार्टनर और महिला ग्राहक की भावुक कहानी सोशल मीडिया पर वायरल हुई, जिसने मेहनत, संघर्ष और इंसानियत की मिसाल पेश की.
Read more »
விஜய்யை கைது செய்ய வேண்டும்-பதிவிட்ட பிரபல நடிகை! ரசிகர்கள் அட்டாக்..Karur Stampede Oviya Shares Arrest Vijay Post : விஜய்யை கைது செய்ய வேண்டும் என்று பதிவிட்ட பிரபல நடிகை! கெட்ட வார்த்தையால் அட்டாக் செய்யும் ரசிகர்கள்..முழு விவரம், இதோ!
Read more »
Chiranjeevi: చరణ్ బాబు ఓ తండ్రిగా నిన్ను చూసి ఎంతో గర్వపడుతున్నా.. చిరంజీవి స్పెషల్ పోస్ట్ వైరల్..!Megastar Chiranjeevi Emotional Post: గ్లోబర్ స్టార్ రామ్ చరణ్.. తన నటనతో కోట్లాది మంది అభిమానాన్ని సంపాదించుకున్నాడు. రామ్ చరణ్ సినీ పరిశ్రమలోకి వచ్చి 18 ఏళ్లు కంప్లీట్ అవ్వడంతో.. మెగా ఫ్యాన్స్ కంగ్రాట్స్ తెలియజేస్తూ కామెంట్స్ పెడుతున్నారు.
Read more »
Speed Post Document Tariff: स्पीड पोस्ट के नए नियम और दर, रजिस्ट्री नहीं डाकघर में अब होगा सिर्फ स्पीड पोस्टSpped Post Document Tariff डाक विभाग की 171 साल पुरानी रजिस्ट्री सेवा बंद हो रही है। डाकघरों में अब सिर्फ स्पीड पोस्ट होगा। रजिस्टर्ड पोस्ट सेवा को स्पीड पोस्ट में मर्ज करने का निर्णय लिया गया है। यह व्यवस्था अक्टूबर से लागू हो रही है। वर्ष 1854 में रजिस्टर्ड पोस्ट सेवा चलन में आया...
Read more »
क्या आनंद महिंद्रा ने सच में खोल दिया भारत की सबसे बड़ी अनदेखी खूबसूरती का राज? जिसे दुनिया अब तक कर रही थी नजरअंदाजAnand Mahindra Viral Post: आनंद महिंद्रा ने सोशल मीडिया पर कोकण क्षेत्र की बारिश में खींची गई खूबसूरत तस्वीरें शेयर करते हुए भारत की अनदेखी प्राकृतिक सुंदरता और पर्यटन क्षमता पर बड़ा संदेश दिया.
Read more »
अमिताभ बच्चन ने बेटे अभिषेक को क्यों दिया भारत की जीत का क्रेडिट? पाकिस्तान के पूर्व क्रिकेटर से जुड़ा है मामलामनोरंजन | बॉलीवुड: Amitabh Bachchan Post Viral: अमिताभ बच्चन ने एशिया कप में भारत की जीत का श्रेय अपने बेटे अभिषेक बच्चन को दिया. उन्होंने ऐसा क्यों किया, चलिए जानते हैं इसके बारे में-
Read more »
