माझा जीव गेला तरी चालेल पण मी मराठी बोलणार नाही . महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादावर भोजपुरी अभिनेत्याचं वादग्रस्त विधान.
Bhojpuri Actor : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. अशातच मराठी भाषिकांच्या वादात भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांनी उडी मारली आहे. नुकतेच त्यांनी मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.
पवन सिंह यांच्या वक्तव्यानंतर प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, पवन सिंह यांनी माझा जीव गेला तरी चालेल पण मी मराठी बोलणार नाही असं हिंदी-मराठी वादावर विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे देशात पुन्हा एकदा मराठी भाषेबाबतचा वाद निर्माण झाला आहे. पवन सिंह नेमकं काय म्हणाले? सध्या महाराष्ट्रात हिंदी-मराठी असा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अशातच भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांनी वादग्रस्त विधान करून या वादात उडी मारली आहे. माझा जीव गेला तरी चालेल पण मी कधीच मराठी बोलणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या भोजपुरी या मातृभाषेचा अभिमान असल्याचं देखील म्हटलं आहे. त्यासोबतच कधीही कोणाच्याही दबावाखाली येऊन मी मराठी कधीच बोलू शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, भारत हा एक स्वतंत्र देश आहे. या देशात प्रत्येकाला स्वत:ची भाषा बोलण्याचा अधिकार आहे. एखाद्यावर भाषा लादणं हे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. यामुळे समाजात द्वेष पसरतो. भारतात सर्वत्र हिंदी बोलण्याचा अधिकार आहे. माझा जन्म बंगालमध्ये झालाय. मला बंगालीही येत नाही. मला वाटते की मी बंगाली शिकू शकणार नाही त्यामुळे मी ती बोलत नाही. मला हिंदी बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रात राहता मग तुम्हाला मराठी यायला पाहिजे हे काय आहे? असं विधान त्यांनी एका मुलाखतीत केलं आहे. राज ठाकरेंच्या पक्षाकडून हिंदी भाषिकांवर होणारे हल्ले चुकीचे पवन सिंह यांनी राज ठाकरे यांच्या पक्षाकडून हिंदी भाषिकांवर होणाऱ्या हल्ल्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हे हल्ले आणि अन्याय अत्यंत चुकीचे आहेत. मी मुंबईत काम करण्यासाठी जाईन, राज ठाकरे काय करतील ते मला मारतील का? मला मरण्याची भीती वाटत नाही. माझा जीव गेला तरी मी मराठी बोलणार नाही. मला मराठी येत नाही, मी ती बोलत नाही, तुम्ही मला मारू शकता असं पवन सिंह यांनी म्हटलं आहे.
Pawan Singh Controversial Statement On Marathi La Pawan Singh Latest पवन सिंह पवन सिंह बातमी पवन सिंह वक्तव्य राज ठाकरे मनसे मराठी वाद
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
...तर लवकरच पेट्रोल 150 रुपये लिटर दराने मिळणार? सर्वासामान्यांना दुहेरी फटका कारण...Israel Iran War Conflict: इस्रायल आणि इराणमध्ये सुरु झालेल्या संघर्षामुळे तुमचा रिकामा होणार असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, पण हे खरं आहे.
Read more »
ठाकरे बंधूंची युती झाल्यास मुंबईवर त्यांचं राज्य? काय सांगतो सर्व्हे?मराठी माणसांसाठी ठाकरे कुटुंबानं जो संघर्ष केलाय त्याची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही असं म्हणत राऊतांनी मोदी-शाहांवर टीका केलीय.
Read more »
मराठी लोगों के दबाव के कारण ही सरकार ने फैसला वापस लिया : राज ठाकरेमराठी लोगों के दबाव के कारण ही सरकार ने फैसला वापस लिया : राज ठाकरे
Read more »
उद्धव और राज ठाकरे मराठी मुद्दे पर दिखा रहे बनावटी चिंता : भाजपा विधायक अमित साटमउद्धव और राज ठाकरे मराठी मुद्दे पर दिखा रहे बनावटी चिंता : भाजपा विधायक अमित साटम
Read more »
'मुंबईत येऊन तुझी हेकडी बाहेर काढेन' आता पप्पू यादवांकडून राज ठाकरेंना आव्हान!Pappu Yadav Challange: महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादाचा परिणाम आता बिहारमध्येही दिसू लागलाय. पूर्णियाचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला केल्याबद्दल राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.
Read more »
'भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची रखेल करायचीये'; राऊत म्हणाले, 'फडणवीस, शिंदे, अजित पवारांचे आर्थिक...'Sanjay Raut On Mumbai Issue: भारतीय जनता पक्षाला संयुक्त महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, मराठी अस्मिता या सगळ्यांशी घेणे-देणे नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
Read more »
