BEST employees strike on Diwali: सध्या सगळीकडे दिवाळी सेलिब्रेशन जोरात सुरु आहे. लागून सुट्ट्या आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यायत. दरम्यान ऐन दिवाळीत मुंबईकरांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येतेय. मुंबईकरांसाठी मुंबईचं जनजीवन असलेल्या बेस्टची सुविधा उद्या नागरिकांच्या सेवेत नसेल.
BEST employees strike on Diwali: ऐन दिवाळीत मुंबईकरांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येतेय.सध्या सगळीकडे दिवाळी सेलिब्रेशन जोरात सुरु आहे. लागून सुट्ट्या आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यायत.
दरम्यान ऐन दिवाळीत मुंबईकरांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येतेय. मुंबईकरांसाठी मुंबईचं जनजीवन असलेल्या बेस्टची सुविधा उद्या नागरिकांच्या सेवेत नसेल. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना टॅक्सी, रिक्षावर अवलंबून राहावे लागणार आहे. उद्यापासून डेपोतून एकही बस न सोडण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.ऐन दिवाळीत बेस्ट प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणारा बोनस यंदा 4-5 दिवस उलटले तरी देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच कर्मचारी आपला संताप व्यक्त करत आहेत. आधीच दिवाळी असल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यात उद्या भाऊबीज असल्याने बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी असेल. पण आगारातून एकही बेस्ट सुटणार नसल्याने मुंबईकरांचे चांगले हाल होणार आहेत.कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून निधीची जुळवाजुळव सुरूच होती. यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. असे असतानाही बोनस देण्याचा मार्ग काही निघताना दिसत नाही. असे असताना आचारसंहिता असल्याने बोनस झाला नसल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. लवकरच बोनस केला जाईल असे आश्वासन देण्यात येत आहे. पण कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहे. 2 नोव्हेंबरच्या दिवसभरात बोनस जमा झाला नाही तर रविवारपासून कर्मचारी आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.भविष्य
Best Employees Employees Strike No Bus On Diwali Best Depot Tomorrow
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..Railway Bonus 2024: रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
Read more »
CNG च्या दरात वाढ, 'या' कारणांमुळे वाढले दरसीएनजीच्या दरात वाढ होणार आहे. याचा बोजा सामान्यांवर पडणार आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेणार?
Read more »
Maharashtra Weather News : ऐन दिवाळीत बदलले हवामानाचे तालरंग; पावसाची हजेरी, अन् थंडीची चाहूलMaharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानाचं बदललेलं रुप पाहायला मिळत आहे. कुठे उकाडा वाढत आहे, तर कुठे पावसाळी ढग चिंतेत भर टाकताना दिसत आहे.
Read more »
ऐन दिवाळीत बंडखोरीचे फटाके; बंडोबांचा थंडोबा करण्यात महायुतीला यश येणार का?BJP tension of Rebel:विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांचं अक्षरक्षः पीक आल्याचं समोर आलंय. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडोबांची संख्या मोठी असल्याचं पाहायला मिळतंय. आपापल्या पक्षाकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून बसलेल्या अनेक नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही.
Read more »
म्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरले नाही तरी मिळणार मुंबईत घर, ऐन दिवाळीत नशीब फळफळलेMumbai Mhada Lottery 2024: मुंबई म्हाडा मंडळाने 2024 साठी घरांची लॉटरी काढण्यात आली होती. आता ज्यांना घराची लॉटरी लागली नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Read more »
पुण्यात ऐन दिवाळीत प्रीपेड रिक्षा बंद, वाहतूक पोलीस याला कसे जबाबदार?बूथ वरील रिक्षांचे करार संपल्यामुळे पुण्यातील प्रीपेड रिक्षा बंद झाल्या आहेत. ऐन दिवाळीत हे झाल्यामुळे पुणेकरांना त्रास होऊ लागला आहे.
Read more »
