Maharashtra Politics Real Shivsena: अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावरुन खोचक शब्दांमध्ये ठाकरेंच्या प्रवक्त्यांनी टोला लगावलाय.
Maharashtra Politics Real Shivsena : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावरुन खोचक शब्दांमध्ये ठाकरेंच्या प्रवक्त्यांनी टोला लगावलाय.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानांचा समाचार घेतला आहे.
आज पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी अमित शाहांच्या 'एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी शिवसेना आहे,' या विधानावरुन खोचक भाष्य केलं. तसेच राऊत यांना बोलबच्चन म्हणणाऱ्या फडणवीसांनाही त्यांनी उत्तर दिलं आहे."एकनाथ शिंदे यांचा परिचय अमित शहांपेक्षा आम्हाला जास्त आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना म्हणणं म्हणजे अमेरिका जो रिपब्लिकन पक्ष आहे तो रामदास आठवले यांचा आहे असं म्हणण्यासारखा आहे. अमेरिकेत रिपब्लिकन पार्टी आहे. ट्रम्प त्याच पक्षाचे आहेत तर तो अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष हा इथे रामदास आठवले किंवा त्यांच्या सरकारमध्ये आहेत तो त्यांचा पक्ष! अमित शहा यांच्याकडे फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. अमित शाह मुंबई येतात महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारचे विधान करतात. महाराष्ट्राच्या अस्मितेवरती खपली काढण्यासारखी विधानं करतात. महाराष्ट्राच्या जखमेवर महाराष्ट्राच्या मराठी माणसाची एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला. त्या जखमेवर अमित शहा येथे मीठ चोळण्यासाठी येतात आणि मला दुःख वाटत आहे यांच्या अवतीभवती असलेली बेईमान माणसं त्यांच्या वक्तव्या टाळ्या वाजवतात."अमित शहा यांनी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचे वक्तव्य करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला अमित शहा यांनी काल अशा प्रकारचा वक्तव्य करून पुन्हा एकदा मराठी एक जुटीचा अपमान केला मराठी माणसाचा अपमान केला," असंही राऊत म्हणाले."एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहा यांच्या मालकीचा आहे. शिंदे यांनी ते वारंवार सिद्ध केलं आहे. इतकं कारुनसुद्धा शिवसेना उभी आहे हे अमित शहा यांचं फर्स्टस्ट्रेशन आहे," असं राऊत म्हणाले."इतका प्रयत्न करून सुद्धा महाराष्ट्राला तुम्ही काय सिद्ध केलं? एकनाथ शिंदे यांनी काय सिद्ध केलं? एकनाथ शिंदे यांची ओळख ही लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री बहुतेक शाहसुद्धा त्यातले आहेत," असा टोला राऊतांनी लगावला."बोलबच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदींपासून घेतलीये. नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत."त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते. त्यांच्याशी थोडेफार गुण आमच्यात आले असतील. स्वतः देवेंद्र फडणवीस हे जुनियर बोलबच्चन. त्यांना अजून जमत नाही आणि आता नरेंद्र मोदी हे उघडे पडायला लागले आहेत. लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीत," असा टोला राऊतांनी लगावला आहे."प्रेसिडेंट ट्रम्प काल 18 वेळा सांगितलं भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध मी थांबवलं. नरेंद्र मोदी बोलबच्चन असले तरी त्यांची दातखिळी अजून त्या विषयावर अद्याप बसलेली आहे," असा टोला राऊत यांनी लगावला.स्पोर्ट्स
Sanjay Raut Amit Shah Devendra Fadnavis Takes Dig Eknath Shinde PM Modi Real Shivsena
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर लग्न करू पाहणाऱ्या सर्वच मुलींना अजित पवारांची कळकळीची विनंती, म्हणाले...Ajit Pawar Speech On Vaishnavi Hagawane Death Case: लग्न करणाऱ्या सर्वच मुलींना मी एकच सांगतो की... कळकळीची विनंती करत अजित पवार असं का म्हणाले?
Read more »
'मोदींचे सर्व राजकारण ‘नकली’ असल्याने...', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'सोफिया कुरेशी भाजपाला..'Sanjay Raut Slams PM Modi: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी हिंदुत्वाच्या राजकीय विचारांचा स्पर्शही त्यांना झालेला दिसत नाही, असं राऊत म्हणाले आहेत.
Read more »
ईरानी संसद के अध्यक्ष ने अमेरिकी परमाणु समझौते पर उठाए सवाल, कहा, ' प्रस्ताव में विरोधाभास'ईरानी संसद के अध्यक्ष ने अमेरिकी परमाणु समझौते पर उठाए सवाल, कहा, ' प्रस्ताव में विरोधाभास'
Read more »
'मोदी सरकार ने संविधान के हर पन्ने पर तानाशाही की स्याही रगड़ने में गंवाए पिछले 11 साल', खड़गे का केंद्र पर हमलाकांग्रेस अध्यक्ष ने X पोस्ट पर कहा कि मोदी सरकार पिछले 11 वर्षों में मोदी सरकार ने भारतीय लोकतंत्र, अर्थव्यवस्था और सामाजिक ताने-बाने को गहरा आघात पहुँचाया है।
Read more »
6 महिन्यांत अमेरिकेला ट्रम्प नकोसे! देशभरात लाखो लोक रस्त्यावर उतरले; संघर्ष चिघळलाProtests Across USA: लोक रस्त्यावर उतरले असून लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न दिसून येत आहे.
Read more »
Exclusive : 'सुनील तटकरेंनी मला पाडण्यासाठी...'; भरत गोगावले यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'त्यांनी मोठं मनं ...'Bharat Gogavale on Sunil Tatkare : सुनील तटकरे यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.
Read more »
