Women World Cup: वर्ल्डकप जिंकला तर BCCI भारतीय महिला खेळाडूंना 125 कोटींचं बक्षीस देणार? रिपोर्टमधून झालं उघड

Bcci News

Women World Cup: वर्ल्डकप जिंकला तर BCCI भारतीय महिला खेळाडूंना 125 कोटींचं बक्षीस देणार? रिपोर्टमधून झालं उघड
Women World CupWwcICC
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 101 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Women World Cup Final Prize Money: गतवर्षी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयने भारतीय पुरुष संघाला कामगिरीबद्दल 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं. भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला होता.

Women World Cup Final Prize Money: भारतीय महिला क्रिकेट संघ इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये पोहोचला असून, आता समोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे.

रविवारी नवी मुंबईत होणाऱ्या या सामन्यात जर भारतीय संघ जिंकला तर त्यांच्यावर बीसीसीआयकडून पैशांचा वर्षाव करण्याची तयारी सुरु आहे. बीसीसीआयचे माजी सचिव आणि आता आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी मांडलेल्या समान वेतन धोरणाचे पालन करून, गेल्या वर्षी अमेरिकेत टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला देण्यात आलेल्या रकमेइतकीच रक्कम महिला संघालाही देण्याचा विचार वरिष्ठ अधिकारी करत आहेत असं बोललं जात आहे.भारतीय पुरुष संघाने टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. यानंतर बीसीसीआयने अंतिम सामन्यातील कामगिरीसाठी खेळाडूंसह सपोर्ट स्टाफसाठी 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं. बीसीसीआय पुरुष आणि महिलांना समान वेतन देण्याचे समर्थन करते आणि म्हणूनच अशा अनेक चर्चा आहेत की जर आपल्या मुलींनी विश्वचषक जिंकला तर ते पुरूषांच्या जागतिक विजयाच्या तुलनेत कमी नसेल. परंतु त्यांनी विश्वचषक जिंकण्यापूर्वी घोषणा करणं योग्य नाही, असं बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं आहे.भारतीय महिला संघ 2017 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात लॉर्ड्सवर इंग्लंडकडून 9 धावांनी पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपये बक्षीस दिलं होतं. माजी मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही उत्तम बक्षीस देण्यात आले होतं. त्यातच आता आठ वर्षांनंतर, जर भारतीय महिला संघ जिंकला तर प्रत्येक खेळाडूला बक्षीस रक्कम कमी नाही तर किमान 10 पट जास्त असू शकते.FAQ1) सामन्याची तारीख, वेळ आणि ठिकाण काय आहे?सामना २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता सुरू होईल. ठिकाण: डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई, भारत. राखीव दिवस ३ नोव्हेंबर आहे.2) हेड-टू-हेड रेकॉर्ड काय आहे?विश्व कप सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला गेल्या तीन सामन्यांत पराभूत केले आहे. एकूण वनडे सामन्यांमध्ये भारताने १८ पैकी ११ जिंकले, तर दक्षिण आफ्रिकेने ६ जिंकले.3) पिच आणि हवामानाचा अंदाज काय आहे?डी. वाय. पाटील स्टेडियमची पिच संतुलित आहे, फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी पोषक. सामना दिवसभर चालू असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये थोडा टर्न मिळू शकतो. हवामान: २ नोव्हेंबरला ६३% पावसाची शक्यता , तापमान ३१-३२°से, आर्द्रता जास्त. राखीव दिवसावर ५५% पावसाची शक्यता, पण मोठा व्यत्यय नसावा.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Women World Cup Wwc ICC

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Toota Hai Australia Ka Ghamand: India Stun Australia, March Into Women’s World Cup 2025 Final; Jemimah Scores TonToota Hai Australia Ka Ghamand: India Stun Australia, March Into Women’s World Cup 2025 Final; Jemimah Scores TonIndia stormed into the Women’s ODI World Cup 2025 final after stunning defending champions Australia by five wickets in the semifinal.
Read more »

Jemimah Rodrigues Makes Surprising Revelation After Record Breaking Knock That Ended Australias 15 Match StreakJemimah Rodrigues Makes Surprising Revelation After Record Breaking Knock That Ended Australias 15 Match StreakIndia now faces South Africa in the final on Sunday, aiming to lift their maiden Women’s ODI World Cup trophy.
Read more »

World Records Broken: ऑस्ट्रेलिया को सेमीफाइनल में धूल चटा भारत की बेटियों ने तोड़े एक साथ कई वर्ल्ड रिकॉर्...World Records Broken: ऑस्ट्रेलिया को सेमीफाइनल में धूल चटा भारत की बेटियों ने तोड़े एक साथ कई वर्ल्ड रिकॉर्...- women world cup semi final jemimah rodrigues century in highest chase in odi history list of world records broken by india during historic win over australia
Read more »

Womens World Cup, IND vs AUS: ഇന്ത്യൻ വനിതകൾ ലോകകപ്പ് ഫൈനലിൽ; കരുത്തരായ ഓസ്‌ട്രേലിയയെ 5 വിക്കറ്റിന് തോൽപിച്ചു!Womens World Cup, IND vs AUS: ഇന്ത്യൻ വനിതകൾ ലോകകപ്പ് ഫൈനലിൽ; കരുത്തരായ ഓസ്‌ട്രേലിയയെ 5 വിക്കറ്റിന് തോൽപിച്ചു!Women s World Cup 2025 IND vs AUS SemiFinal: ആദ്യമായി ലോകകപ്പ് കിരീടം ഉയർത്താൻ ഇന്ത്യൻ വനിതാ ടീമിന് ഇനി ഒരു കടമ്പ മാത്രം.
Read more »

Womens World Cup: অজিদের রানের পাহাড় টপকে বিশ্বকাপের ফাইনালে ভারত! বিশ্বরেকর্ড হরমনপ্রীতদের...Womens World Cup: অজিদের রানের পাহাড় টপকে বিশ্বকাপের ফাইনালে ভারত! বিশ্বরেকর্ড হরমনপ্রীতদের...India reaches women world cup final
Read more »

IND W vs AUS W Semi Final: छक्कों से लेकर रनों के पहाड़ तक, टूट गए ये 5 रिकॉर्डIND W vs AUS W Semi Final: छक्कों से लेकर रनों के पहाड़ तक, टूट गए ये 5 रिकॉर्डMost Sixes in Women's World Cup Match: भारतीय महिला क्रिकेट टीम ने महिला विश्व कप सेमीफाइनल में ऑस्ट्रेलिया पर रिकॉर्डतोड़ जीत हासिल की है।
Read more »



Render Time: 2026-04-02 04:51:00