T20 World Cup 2026 IND VS NAM : भारताने 7 फेब्रुवारी यूएसए विरुद्ध वर्ल्ड कप 2026 मधील पहिला सामना खेळला आणि तो जिंकला. आता टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पुढील सामना कोणत्या संघाविरुद्ध असणार याची चाहत्यांना उत्सुकतता आहे.
T20 World Cup 2026 : 7 फेब्रुवारी पासून टी 20 वर्ल्ड कप 2026 ला सुरुवात झालीये. पहिल्या दिवशी एकूण चार सामने खेळवण्यात आले असून यातील एक सामना स्पर्धेचे यजमान आलेल्या भारताने खेळला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध यूएसए यांच्यात सामना रंगला होता ज्यात भारताने 29 धावांनी विजय मिळवला.
यासह भारताने त्यांच्या वर्ल्ड कप 2026 च्या प्रवासाला विजयाने सुरुवात केली. सध्या स्पर्धेत सहभागी असलेले 20 संघ हे ग्रुप स्टेज सामने खेळत आहेत. अशातच यूएसएला पराभूत केल्यावर टीम इंडियाचा पुढील सामना कोणासोबत असणार याविषयी जाणून घेऊयात. टीम इंडियाचा पुढचा सामना कधी? 12 फेब्रुवारी टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. ग्रुप ए मध्ये भारतासोबत असलेल्या नामिबिया विरुद्ध हा सामना असेल. नामिबिया संघाविरुद्ध असणारा हा सामना गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडेल. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. कसा आहे भारत विरुद्ध नामिबियाचा हेड टू हेड रेकॉर्ड?टीम इंडिया खूप कमी वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नामिबिया सोबत खेळली आहे. 2021 च्या टी 20 वर्ल्ड कप दरम्यान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर होते. तेव्हा टीम इंडियाने नामिबियाचा पराभव केला होता. यात 9 विकेट्सने टीम इंडियाचा विजय झाला. तर वनडे क्रिकेटमध्ये सुद्धा नामिबियाने भारताविरुद्ध फक्त एक सामना खेळलाय. 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही संघ समोरासमोर आले होते मात्र भारताने तब्बल 181 धावांनी विजय मिळवला होता. नामिबियाच्या तुलनेत भारतीय संघ हा वरचढ आहे. मात्र 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ एकमेंकांविरुद्ध कसे परफॉर्म करतात हे पाहणं महत्वाचं असेल. हेही वाचा : फोर्स मेज्योर क्लॉज नेमका काय आहे? ज्याच्या आडून IND VS PAK मॅच खेळणं टाळतोय पाकिस्तान कुठे पाहता येणार वर्ल्ड कप सामने? टी 20 वर्ल्ड कप 2026 चे सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील तर मोबाईल यूजर्स हे सामने जिओ हॉटस्टारच्या वेबसाईट तसेच एप्लिकेशनच्या माध्यमातून पाहू शकतात. तसेच बुक माय शोवर या सामन्यांची तिकिटं सुद्धा उपलब्ध आहेत. टीम इंडियाच्या ग्रुप स्टेज सामन्यांचं वेळापत्रक : 7 फेब्रुवारी भारत विरुद्ध यूएसए - भारताचा 29 धावांनी विजय 12 फेब्रुवारी भारत विरुद्ध नामिबिया 15 फेब्रुवारी भारत विरुद्ध पाकिस्तान 18 फेब्रुवारी भारत विरुद्ध नेदरलँड
IND VS NAM Cricket Marathi News Team India Suryakumar Yadav
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
WI vs SCO Highlights: हेटमायर की विस्फोटक फिफ्टी, शेफर्ड की कातिलाना बॉलिंग, वेस्टइंडीज ने जीता टी20 विश्व कप का पहला मैचT20 World Cup 2026: वेस्टइंडीज ने टी20 विश्व कप 2026 में अपने पहले मुकाबले को जीत लिया है। शिमरोन हेटमायर ने विस्फोटक फिफ्टी के बाद रोमारियो शेफर्ड ने हैट्रिक विकेट चटकाया।
Read more »
IND vs USA , T20 World Cup 2026: সূর্যর তেজ-সিরাজের আগুনে ভস্মীভূত ট্রাম্পের দেশ, ডিফিট হিস্ট্রি, রিপিট হিস্ট্রি মিশন শুরু বিশ্বচ্যাম্পিয়নদের...Suryakumar Yadav leads India to victory against USA T20 World Cup 2026
Read more »
श्रीलंका का पहला मैच आज आयरलैंड से: चोटिल ईशान मलिंगा टूर्नामेंट से बाहर; आयरलैंड होम टीम को अब तक नहीं हरा...ri Lanka Vs Ireland ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow SL Vs IRE Playing 11, Colombo Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
इंग्लैंड-नेपाल के बीच पहला इंटरनेशनल मुकाबला आज: हैरी ब्रूक की कप्तानी में उतरेगी इंग्लिश टीम; अफगानिस्तान ...; England Vs Nepal ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow ENG Vs NEP Playing 11, Mumbai Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
श्रीलंका का पहला मैच आज आयरलैंड से: चोटिल ईशान मलिंगा टूर्नामेंट से बाहर; आयरलैंड होम टीम को अब तक नहीं हरा...ri Lanka Vs Ireland ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow SL Vs IRE Playing 11, Colombo Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
AFG vs NZ Live Score: न्यूजीलैंड की प्लेइंग 11AFG vs NZ T20 World Cup 2026 Live Score Today Match: टी20 वर्ल्ड कप 2026 में आज यानी कि 08 फरवरी को कुल तीन मुकाबले खेले जाएंगे।
Read more »
