T20 World Cup 2026 Updated Points Table Before India v Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणारा टी-20 वर्ल्डकप 2026 मधील सामना हा स्पर्धेतील 27 वा सामना असणार आहे. सुपर 8 साठी आता केवळ 7 जागा शिल्लक असून एकूण दावेदार मात्र 18 आहेत. याच पार्श्वभूमीवर समजून घेऊयात पॉइण्ट्स टेबलची स्थिती....
T20 World Cup 2026 Updated Points Table Before India v Pakistan: टी-20 वर्ल्डकपमधील जवळपास अर्धे सामने संपले आहेत. 55 पैकी 24 वा सामना काल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडदरम्यान पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट्स राखून न्यूझीलंडचा धुव्वा उडवला असून दुसरीकडे 22 व्या सामन्यात आयर्लंडने ओमानला 96 धावांनी पराभूत करत ओमानला स्पर्धेबाहेर काढलं.
या दोन सामन्यांमुळे सुपर 8 मध्ये पोहचणारा पहिला संघ म्हणून दक्षिण आफ्रिकेचा संघ आणि स्पर्धेबाहेर जाणारा संघ ओमानचा असल्याचं निश्चित झालं आहे. मात्र आज होणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्याआधी स्पर्धेतील 20 दावेदारांपैकी एक सुपर 8 मध्ये गेलेला असताना आणि दुसरा स्पर्धेबाहेर गेलेला असताना इतर 18 संघाची स्थिती काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहेत. याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...कशी आहे रचना?यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकूण 20 संघ खेळत असून त्यांचं चार गटांमध्ये वर्गिकरण करण्यात आलं आहे. या चार गटांमध्ये अव्वल दोन संघ पुढच्या फेरीस म्हणजेच सुपर 8 साठी पात्र ठरणार आहे. प्रत्येक गटात दोन मोठे संघ आणि तीन नवखे संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील संघ आपल्या गटातील इतर चार संघांसोबत एक सामना खेळणार असून त्यानंतर अव्वल दोन संख साखळी फेरीच्या शेवटी सुपर 8 साठी पात्र ठरुन इतर गटातील संघांविरुद्ध मैदानात उतरतील. अ, ब, क, ड असे प्रत्येकी पाच संघांचे चार गट पाडण्यात आलेत. आता 24 सामन्यांनंतर या गटांची स्थिती कशी आहे ते पाहूयात...अ गटभारतीय संघ अ गटात असून दोन विजयांसहीत भारत अव्वल स्थानी आहे. भारताखालोखाल या गटात पाकिस्तानचा संघ असून त्यांनीही दोन विजय मिळवले असले तरी भारताचा नेट रनरेट अधिक आहे. या शिवाय या गटात अमेरिका, नेदरलॅण्ड्स आणि नामिबिया हे संघ आहेत.ब गटब गटामध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ अद्याप एकही सामना पराभूत झालेले नसून दोघे साखळी फेरीत आपल्या गटात अव्वल स्थानी आहेत. ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. ओमान हा स्पर्धेतून बाहेर पडला असून त्यांना तीनपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. क गटक गटामध्ये वेस्ट इंडिजचा संघ सध्या दोन पैकी दोन सामने जिंकून अव्वल स्थानी असून त्या खालोखाल तीनपैकी दोन सामने जिंकणारा इंग्लंडचा संघ आहे. स्कॉटलंड आणि इटली आणि नेपाळचे संघ या ग्रुपमध्ये तळाशी आहेत. ड गटड गटामधून दक्षिण आफ्रिकेचा संघ सुपर 8 साठी पात्र ठरला असून तो सुपर 8 मध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. त्यांनी आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडचा संघ दोन विजयांसहीत दुसऱ्या स्थानी असून तळाच्या तीन संघांमध्ये संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान आणि कॅनडाचे संघ आहेत. युएईनेही एक सामना जिंकला असून अफगाणिस्तान आणि कॅनडाला एकही सामना अजून जिंकता आलेला नाही.सुपर 8 टप्प्यातील सामने 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्यामुळे आता उरलेल्या 18 संघांपैकी 7 जागा कोण मिळवतं हे पाहणं रंजक ठरणार आहे.
Updated Points Table SA Vs NZ INDIA V PAKISTAN Ind V Pak IND Vs Pak
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
आज ईडन गार्डन्स में ENG vs SCO: वेस्टइंडीज से हार चुका इंग्लैंड, यूरोपियन टीम को कभी ICC टूर्नामेंट में हरा...England vs Scotland ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow ENG Vs SCO Playing 11, Eden Gardens Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
NZ vs SA का मुकाबला आज: जीतने वाली टीम टेबल टॉपर बनेगी; अफगानिस्तान के खिलाफ हारने से बचा था साउथ अफ्रीकाNZ vs SA T20 World Cup Ahmedabad match today. Follow latest updates for New Zealand vs South Africa T20 World Cup 2026 match.
Read more »
आयरलैंड को पहली जीत की तलाश: ओमान के खिलाफ कोलंबो में भिड़ंत; कप्तान पॉल स्टर्लिंग घुटने की चोट के कारण टूर्...Ireland Vs Oman ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow IRE Vs OMA Playing 11, Colombo Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
India Vs Pakistan T20 World Cup: বঙ্গোপসাগরে ফুঁসছে ঘূর্ণাবর্ত, প্রবল ঝড়ের আশঙ্কা, বৃষ্টিতে ভেস্তে যেতে পারে ভারত-পাক ম্যাচRain may disrupt India Pakistan T20 World Cup match in Colombo
Read more »
Ind vs Pak Live: भारत और पाकिस्तान के बीच महामुकाबला, टी20 वर्ल्ड कप में होगा घमासानt20 world cup 2026, t20 world cup 2026 live, t20 wc, ind vs pak Live Score, ind vs pak t20 wc, ind vs Pak t20 world cup 2026, india live score, pakistan live score, india vs pakistan, india vs pakistan live score, colombo weather forecast, colombo weather update, premadasa pitch report, भारत बनाम पाकिस्तान, टी20 वर्ल्ड कप, सूर्यकुमार यादव, सलमान...
Read more »
इंडिया-पाकिस्तान मैच में किसकी होगी जीत, कितना रन मारेंगे अभिषेक शर्मा? जानें क्या बता रहे GroK, ChatGPT और...India vs Pakistan T20 World Cup Predictions: टी20 वर्ल्ड कप 2026 में भारत और पाकिस्तान के बीच मैच का सभी को बेसब्री से इंतजार है.
Read more »
