India vs Namibia,T20 World Cup 2026: टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि नामीबिया यांच्यातील ग्रुप ‘A’ सामना दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे. हा या स्पर्धेतील टीम इंडियाचा दुसरा सामना असेल. मात्र या लढतीपूर्वी भारतीय संघाने आपलं नियोजित सराव सत्र टाळण्याचा निर्णय घेतला आहे.
Why India cancel practice session ahead of 2nd t20 world cup 2026 match: टी20 वर्ल्ड कप 2026 मधील ग्रुप ‘A’ मध्ये भारत आणि नामीबिया यांच्यातील सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा या स्पर्धेतील भारतीय संघाचा दुसरा सामना असेल.
मात्र या लढतीपूर्वी टीम इंडियाने दिल्लीत आपलं पहिलं नियोजित सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नामीबियाविरुद्धच्या सामन्याआधी, सोमवारी अरुण जेटली स्टेडियमवर ठेवण्यात आलेलं ऑप्शनल ट्रेनिंग सेशन भारतीय संघाने टाळलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या निर्णयामागचं ठोस कारण अद्याप अधिकृतरीत्या सांगण्यात आलेलं नाही. मात्र मैदानाच्या उपलब्धतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण 10 फेब्रुवारी रोजी नामीबिया आणि नेदरलँड्स हे दोन्ही संघ याच मैदानावर सराव करणार आहेत. नामीबिया संघ सकाळच्या सत्रात, तर नेदरलँड्स संघ संध्याकाळच्या सत्रात सराव करेल.काय आहे अधिकृत निवेदनात?दरम्यान, बीसीसीआयने नंतर अधिकृत निवेदन जाहीर करत स्पष्ट केलं की हा भारतीय संघासाठी विश्रांतीचा दिवस होता. त्यामुळे कोणताही सराव किंवा पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली नव्हती. मंगळवारी संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत टीम इंडिया अरुण जेटली स्टेडियमवर सराव करणार आहे.हे ही वाचा: पाकिस्तानची कुरघोडी? भारताविरुद्ध T20 World Cup सामना खेळण्यासाठी ICC समोर ठेवल्या तीन मोठ्या अटी गंभीरच्या घरी जेवणाचा कार्यक्रम याआधी रविवारी रात्री संपूर्ण भारतीय संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी एकत्र जेवणासाठी जमला होता.हे ही वाचा: Under 19 World Cup जिंकूनही टीम इंडियाला ICC कडून प्राइज मनी नाही, कारण काय? जाणून घ्याविजयासह भारतीय संघाची दमदार सुरुवातसूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मुंबईत अमेरिकेविरुद्ध शानदार विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला. मात्र सामन्याच्या पहिल्या टप्प्यात अमेरिकेने भारतीय संघाला चांगलंच अडचणीत टाकलं होतं. एका टप्प्यावर भारताची अवस्था 77 धावांत 6 विकेट अशी झाली होती.अशा परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवने जबाबदारी घेत 49 चेंडूंमध्ये नाबाद 84 धावांची झुंजार खेळी केली आणि भारताचा स्कोअर 20 षटकांत 9 बाद 161 धावांपर्यंत नेला.हे ही वाचा: विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये वाद? BCCI सेक्रेटरीने देवजीत सैकियांनी अखेर सोडले मौनलक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघ 20 षटकांत 8 बाद 132 धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेवटच्या क्षणी संघात सामील झालेल्या मोहम्मद सिराजने 29 धावांत 3 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्तीला एक यश मिळालं.
T20 World Cup 2026 Team India India Vs Namibia
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs USA , T20 World Cup 2026: সূর্যর তেজ-সিরাজের আগুনে ভস্মীভূত ট্রাম্পের দেশ, ডিফিট হিস্ট্রি, রিপিট হিস্ট্রি মিশন শুরু বিশ্বচ্যাম্পিয়নদের...Suryakumar Yadav leads India to victory against USA T20 World Cup 2026
Read more »
श्रीलंका का पहला मैच आज आयरलैंड से: चोटिल ईशान मलिंगा टूर्नामेंट से बाहर; आयरलैंड होम टीम को अब तक नहीं हरा...ri Lanka Vs Ireland ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow SL Vs IRE Playing 11, Colombo Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
इंग्लैंड-नेपाल के बीच पहला इंटरनेशनल मुकाबला आज: हैरी ब्रूक की कप्तानी में उतरेगी इंग्लिश टीम; अफगानिस्तान ...; England Vs Nepal ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow ENG Vs NEP Playing 11, Mumbai Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
श्रीलंका का पहला मैच आज आयरलैंड से: चोटिल ईशान मलिंगा टूर्नामेंट से बाहर; आयरलैंड होम टीम को अब तक नहीं हरा...ri Lanka Vs Ireland ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow SL Vs IRE Playing 11, Colombo Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
AFG vs NZ Live Score: न्यूजीलैंड की प्लेइंग 11AFG vs NZ T20 World Cup 2026 Live Score Today Match: टी20 वर्ल्ड कप 2026 में आज यानी कि 08 फरवरी को कुल तीन मुकाबले खेले जाएंगे।
Read more »
PAK vs USA: टी20 वर्ल्डकप 2026 में कब और कहां भिड़ेंगे पाकिस्तान-अमेरिका, पिछली बार हुआ था बड़ा उलटफेरT20 World Cup 2026, PAK vs USA: पाकिस्तान और अमेरिका टी20 वर्ल्डकप 2026 में एक ही ग्रुप में हैं, आइए आपको बताते हैं दोनों टीमों का मुकाबला कब और कहां खेला जाएगा.
Read more »
