MS Dhoni Team India Coach: धोनीने भारताला 2 वर्ल्ड कप जिंकवून दिले आहेत. तसेच धोनीचं यंदाचं आयपीएलचं पर्व हे त्याचं शेवटचं पर्व असेल अशी जोरदार चर्चा आयपीएल सुरु असताना होती. त्यामुळेच धोनीचा प्रशिक्षकपदासाठी विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
MS Dhoni Team India Coach : धोनीने भारताला 2 वर्ल्ड कप जिंकवून दिले आहेत. तसेच धोनीचं यंदाचं आयपीएलचं पर्व हे त्याचं शेवटचं पर्व असेल अशी जोरदार चर्चा आयपीएल सुरु असताना होती. त्यामुळेच धोनीचा प्रशिक्षकपदासाठी विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेलेली आहे. सोमवारी म्हणजेच 27 मे पर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मागवले होते. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशीची डेडलाइन यासाठी देण्यात आली होती. या पदासाठी कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूकडे बीसीसीआयने स्वत: विचारणा केली नसल्याचं बीसीसीआयचे सचिव अमित शाह यांनी पूर्वीच स्पष्ट केलं आहे. जय शाह यांनी केलेल्या विधानांकडे पाहिल्यास बीसीसीआय भारतीय प्रशिक्षकाच्याच शोधात असल्याचं स्पष्ट होत आहे. अशावेळी आयपीएलचं जेतेपद कोलकाता नाईट रायडर्सला जिंकवून देणाऱ्या गौतम गंभीरचं पारडं अधिक जड वाटत असून तो सुद्धा ही नवी जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं समजतं. मात्र भारतीय प्रशिक्षक पदासाठी आता थेट भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीचं नाव समोर येत आहे.भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या एका निकटवर्तीयाने धोनीचं नाव प्रशिक्षक पदासाठी सुचवलं आहे. कोलहीचे प्रशिक्षक असलेल्या राजकुमार शर्मा यांनी महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षक करता येईल असं म्हटलं आहे. प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या राजकुमार शर्मा यांनी आपली भूमिका मांडताना,"या पदासाठी कोणी कोणी अर्ज केला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मला स्वत:ला असं फार वाटतं की जो कोणी भारतचा प्रशिक्षक होईल तो भारतीय असावा. महेंद्र सिंह धोनीने निवृत्ती घोषित केली तर तो या पदासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. तो फार क्रिकेट खेळला आहे. त्याने अनेक स्पर्धा संघाला जिंकून दिल्या असून त्याचा अनुभव फायद्याचा ठरु शकतो," असं 'न्यूज इंडिया'च्या 'क्रिकेट प्रेडिक्टा' नावाच्या कार्यक्रमात म्हटलं आहे."ड्रेसिंग रुममध्ये सर्वजण धोनीला फार आदर देतील. धोनी फार दिर्घकाळ क्रिकेट खेळला आहे. संघासाठी योग्य नियोजन करणं आणि संघाचं उत्तम व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. धोनी जेव्हा कर्णधार झाला होता तेव्हा संघात अनेक मोठे खेळाडू होते. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, विरेंद्र सहेवाग, राहुल द्रविड, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, गौतम गंभीर, युवराज सिंगसारख्या खेळाडूंचा समावेश होता. असं असतानाही धोनीने उत्तम पद्धतीने संघ हाताळला," असंही राजकुमार शर्मांनी म्हटलं आहे. आता खरोखरच धोनीचा विचार भविष्यात भारतीय प्रशिक्षक म्हणून होतो का हे येणारा काळच सांगेल. धोनीने कर्णधार म्हणून भारताला 2007 साली पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तर 2011 मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला होता.धोनीने यापूर्वी 2021 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं मेंटॉर म्हणून काम पाहिलं होतं. ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती.धोनीने अद्याप आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. 2024 चं आयपीएलचं पर्व धोनीचं शेवटचं पर्व असेल असं म्हटलं जात होतं. मात्र चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्लेऑफ आधीच बाहेर पडला. धोनीने निवृत्तीसंदर्भात कोणतीही भाष्य केलेलं नाही. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वानाथ यांनी थेट धोनी पुन्हा एकदा पुढच्या पर्वामध्ये संघासोबत दिसेल असं म्हटलं आहे.Indian Team Head Coach: टीम इंडियाच्या कोचपदासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नावाने अर्ज, पाहा काय आहे प्रकरण?
MS Dhoni Proposal India Coach Gautam Gambhir Leading Race
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Team India New Coach: राहुल द्रविड़ फिर से टीम इंडिया के कोच बनेंगे या नहीं, आई UPDATEWho Will be Team India New Coach
Read more »
राहुल द्रविड़ की जगह हेड कोच के लिए लिस्ट में फ्लेमिंग, लक्ष्मण समेत इतने नाम, कमेंट में बताएं अपनी पसंदTeam India New Head Coach as Rahul Dravid Replacement
Read more »
Team Indias New Coach Hunt: অনুরোধেও রাহুলের না! মুখ ফেরালেন লক্ষ্মণও! জেরবার জয়রা বাচছেন কাকে?Dravid Declined and Laxman denied, Who IS Going To Be Team India s New Coach
Read more »
Virat Kohli : 'मुझे बताने की जरुरत नहीं...', विराट कोहलीचा सुनील गावस्करांना सणसणीत टोला, नाव न घेता म्हणाला...Virat Kohli Savage Reply to critics : विराट कोहली अन् सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यातील वाकयुद्ध अजूनही थंड होण्याचं नाव घेत नाहीये. विराटने आता गावस्करांना पुन्हा खणखणीत उत्तर दिलंय.
Read more »
किस दिग्गज को होना चाहिए भारतीय क्रिकेट टीम का अगला कोच, वसीम अकरम ने बतायाWasim Akram on Next Coach of Team India
Read more »
Team India Head Coach: 'मौका मिलता है तो...', हेड कोच की भूमिका को लेकर भज्जी के बयान ने मचाई खलबलीHarbhajan singh on Team India Head Coach Position
Read more »
