रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अर्ध्यापेक्षा अधिक सोनं बँक ऑफ इंग्लंड (Bank of England) आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटकडे (Bank of International Settlement) सुरक्षित ठेवलं आहे.
RBI ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल 6,27,90,45,00,000 किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात ठेवणार हा राष्ट्रीय खजिना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्ध्यापेक्षा अधिक सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटकडे सुरक्षित ठेवलं आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ब्रिटनमधून 100 टनाहून अधिक सोनं परत आणलं आहे आणि ते आपल्या राखीव निधीमध्ये हस्तांतरित केलं आहे. बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी महिन्यात पुन्हा एकदा इतक्याच प्रमाणातील सोनं देशात आणलं जाऊ शकतं. 1991 मध्ये गहाण ठेवण्यात आलेलं हे सोनं पहिल्यांदाच आरबीआयच्या निधीत सामील करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्ध्यापेक्षा अधिक सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटकडे सुरक्षित ठेवलं आहे. यापैकी सुमारे एक तृतीयांश साठा देशांतर्गत ठेवण्यात आला आहे. ब्रिटनमधून सोनं भारतात आणल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेला स्टोरेज कॉस्ट वाचविण्यात मदत होईल, जी बँक ऑफ इंडियाला दिली जाते.RBI कडून जारी करण्यात आलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, 31 मार्च 2024 पर्यंत केंद्र सरकारकडे विदेशी चलन राखीव निधीच्या रुपात 822.10 टन सोनं होतं, जे मागील वर्षी याच काळात 794.63 टनपेक्षा अधिक होतं. 1991 मध्ये, चंद्रशेखर सरकारने पेमेंट बॅलन्सच्या संकटाचा सामना करण्यासाठी सोनं गहाण ठेवलं होते. 4 ते 18 जुलै 1991 दरम्यान, RBI ने 400 मिलियन डॉलर्स उभारण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान यांच्याकडे 46.91 टन सोनं गहाण ठेवलं होतं.आरबीआयने जवळपास 15 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीक़डून 200 टन सोनं खरेदी केलं होतं. 2009 मध्ये युपीए सरकारच्या कार्यकाळात जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा भारताने आपल्या मालमत्तेत विविधता आणण्यासाठी 6.7 अब्ज डॉलर्स किमतीचं 200 टन सोनं खरेदी केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून आरबीआयकडून खरेदी करण्यात आलेल्या स्टॉकमध्ये वाढ झाली आहे.महागाई दर आणि परकीय चलन जोखमींविरूद्ध बचाव म्हणून परकीय चलन मालमत्तेचा आधार वैविध्यपूर्ण करणं हा सोनं खरेदी करण्याचा आरबीयचा मुख्य उद्देश आहे. आरबीआयने डिसेंबर 2017 पासून बाजारातून नियमितपणे सोनं गोळा करण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्यातील सोन्याचा वाटा डिसेंबर 2023 अखेर 7.75 टक्क्यांवरून एप्रिल 2024 अखेर 8.7 टक्क्यांपर्यंत वाढेल.आरबीआय सोनं मुंबईतील मिंट रोड स्थित आरबीआय भवन तसंच नागपूरमधील तिजोरींमध्ये ठेवतं. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार, जागतिक मध्यवर्ती बँकांकडे आतापर्यंत उत्खनन केलेल्या सोन्यापैकी सुमारे 17 टक्के सोने आहे आणि 2023 च्या अखेरीस साठा 36,699 मेट्रिक टन पेक्षा जास्त होईल.पत्नीने जेवायला दिलं नाही, रागात त्याने तिचा जीवच घेतला; नंतर नराधम पतीने केले राक्षसी कृत्य...
Reserve Bank Of India Gold UK United Kingdom
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
राकेश झुनझुनवालांच्या पत्नीने एका दिवसात गमावले तब्बल 800,00,00,000 रुपये; आवडत्या शेअरनेच केलं नुकसानशेअर बाजारातील (Share Market) बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांना तब्बल 800 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या...
Read more »
तब्बल 8 वेळा मत देणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. मतदानाचा हक्क बजावताना एका व्यक्तीने तब्बल 8 वेळा मतदान केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
Read more »
26 कोटींची रोकड, 90 कोटींची बेहिशेबी मालमत्ता अन्...; नाशिकमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलं मोठं घबाडतब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले. यामुळे परिसरातील सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
Read more »
T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
Read more »
महाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडगड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
Read more »
महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
Read more »
