Mumbai Water Cut Update: 14 ते 15 नोव्हेंबर दरम्यान घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, वडाळा, सायन आणि माटुंगा येथे २२ तास पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे.
Mumbai Water Cut Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. दोन दिवसांत मुंबईकरांना पाणीबाणी सहन करावी लागणार आहे. शु्क्रवार 14 नोव्हेंबर ते शनिवारी 15 नोव्हेंबरपर्यंत शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळं मुंबईकरांना जपून पाणी वापरण्याचे अवाहन करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलवाहिन्यांवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे एन, एल, एम पश्चिम व एफ उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून शनिवार, दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळं नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असं अवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची 1200 मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, 1200 मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि 800 मिलिमीटर व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील 300 मिलिमीटर, 600 मिलिमीटर व 900 मिलिमीटर व्यासाच्या एकूण पाच झडपा बदण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून शनिवार, दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. विद्याविहार, ताडवाडी, भक्ती पार्क,टिळक नगर परिसरात पाणीबाणी असणार आहे. घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, वडाळा, सायन आणि माटुंगा येथे 22 तास पाणीपुरवठा बंद असणार आहे.एन विभागः राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगर, विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओ.एन.जी.सी वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर.एन.गांधी मार्ग. एल विभागः न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस.जी बर्वे मार्ग कुर्ला पूर्व, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस वसाहत, कसाई वाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवराई नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही एन पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग तसंच एम पश्चिम विभाग व एफ उत्तर विभाग- शीव परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.वडाळा, सायन, माटुंगा, दादर.. सायन , दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, चुनाभट्टीचा काही भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, आल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सोडा बिल्डिंग्ज , सायन कोळीवाडा-सरदार नगर, संजय नगर, गांधी नगर, गांधी नगरचा काही भाग. गायकवाड नगर, कोरबा मिठागर, वडाळा, आणि भीमवाडीचे प्रवेशद्वार क्र. 4 आणि 5.चेंबूर... टिळक नगर, टिळक नगर स्टेशन रोड, पेस्तोम सागर रोड क्र. 1 ते 6, ठक्कर बाप्पा कॉलनी , शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, इंदिरा नगर, एस.जी. बर्वे मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर, भगवान कॉलनी मार्गावर यशवंत नगर, सम्राट अशोक नगर, राजा मिलिंद नगर, आदर्श नगर, भक्ती पार्क, अजमेरा कॉलनी, एमएमआरडीए एसआरए कॉलनी.
Bmc Water Supply News Today Water Supply News In Mumbai Today BMC Water Supply News Tomorrow Water Cut In Mumbai Today 2025 मुंबईत पाणीकपात मुंबई पाणी कपात 2025
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
SpiceJet Flight Emergency Landing: মাঝ আকাশে তীব্র আতঙ্ক, বিকল ইঞ্জিন! ১৭০-এর বেশি যাত্রী নিয়ে স্পাইসজেট...SpiceJet flight from Mumbai to Kolkata makes emergency landing after engine failure
Read more »
Gold, Silver Rate Today: সোনার দামে বড় লাফ! ফের কতটা দামী হল হলুদ ধাতু? কলকাতায় গয়নার সোনা কত...Today Gold, Silver Rate November 10: Check 18, 22, 24 carat Gold prices in Chennai, Mumbai, Delhi, Kolkata, Bengaluru
Read more »
Bollywood actor Dharmendra in Ventilation: শোলের সুবর্ণজয়ন্তী বর্ষেই সংকটে বীরু! ভেনটিলেটরে কিংবদন্তি অভিনেতা ধর্মেন্দ্র...Bollywood veteran Dharmendra on ventilator support in Mumbai hospital
Read more »
Good News! नव्या वर्षात मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी होणार, मध्य रेल्वेवरील ही 27 स्थानके...Mumbai Local Train Update: मुंबईकरांच्या ताफ्यात आता आणखी एसी लोकल येणार आहेत.
Read more »
Deadly Serial Blasts: হাড়হিম সিরিয়াল ব্লাস্ট! দুপুর ১টা ৩০ থেকে ৩টে ৪০-এর মধ্যে পর পর মারণ বিস্ফোরণে সংখ্যাহীন মৃত্যু! রক্ত, আগুন...Mumbai serial blasts 1993 series of 12 13 bomb blasts across mumbai one of Indias deadliest single day terror attacks left 257 dead 1400 injured
Read more »
Major blasts in India: ভিড়ে ঠাসা ট্রেনে প্রেসার কুকারে পর পর ফাটল বোমা! বাজারে গাড়িতে! মুহূর্তে লাশের সারি... বার বার রক্তাক্ত ভারত, কান্না, হাহাকার...Delhi Blast, Rameshwaram Cafe blast, Mumbai Blast: Timeline of major blasts in India
Read more »
