GT vs MI: आयपीएल 2025 च्या (IPL 2025) एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स (GT) च्या पराभवानंतर, संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा मुलगा ढसाढसा रडू लागला.
GT vs MI: आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स च्या पराभवानंतर, संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा मुलगा ढसाढसा रडू लागला.आयपीएल 2025 मध्ये शुक्रवारी झालेल्या आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स ने गुजरात टायटन्स ला 20 धावांनी पराभूत केले.
या पराभवासोबत गुजरात टायटन्सचा आयपीएल प्रवास संपुष्टात आला. या पराभवाचं मोठं भावनिक पडसाद मैदानाबाहेरही उमटायला सुरुवात झाली. यावेळी टीमचे हेड कोच आशिष नेहराचा मुलगा सामन्यानंतर स्टेडियममध्येच ढसाढसा रडताना दिसला. नेहराच्या मुलीच्याही डोळ्यांतून पाणी आले, पण तिनं ते लपवण्याचा प्रयत्न केला. या क्षणांना कॅमेऱ्यानं कैद केलं आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक झाले.मुंबई इंडियन्सकडून 20 धावांनी पराभव झाल्यानंतर गुजरात टायटन्स IPL 2025 मधून बाहेर पडली. हे वास्तव लहानग्या नेहरा सिबलिंग्ससाठी पचवणं कठीण गेलं. मोठ्या मुलाचा चेहरा उतरलेला होता, आणि तो त्याच्या भाऊ-बहिणींना धीर देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी, नेहराचा मुलगा पराभव बघून खूप भावनिक झाला आणि स्टँड्समध्येच जोरजोरात रडू लागला. या भावनिक क्षणी, शुभमन गिलची बहिण शहनील गिल पुढे आली. तिने नेहराच्या मुलीचे सांत्वन केले. नेहराच्या कुटुंबासाठी हा क्षण खूपच कठीण होता, कारण त्यांनी संपूर्ण सिजनमध्ये टीमसोबत प्रवास केला होता.229 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सकडून उत्तम खेळाची अपेक्षा होती. पण शुभमन गिल पहिल्याच ओव्हरमध्ये केवळ 1 धाव करून माघारी परतला. टीमला जोस बटलरची अनुपस्थिती जाणवली. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली धारदार कामगिरी दाखवत 4 ओव्हर्समध्ये केवळ 27 धावा देत 1 विकेट घेतली आणि सामन्यावर पकड मजबूत ठेवली.मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे, तर गुजरात टायटन्सचा IPL 2025 प्रवास याच टप्प्यावर थांबला. पण या सामन्यानं भावनांची जी लाट निर्माण केली, ती चाहत्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.महाराष्ट्र बातम्या
IPL 2025 GT Vs MI Aashish Nehra
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
वैभव सूर्यवंशीवर इतके कशाला खर्च केले? RR प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर फलंदाज संतापला; 'तुम्ही गोलंदाजांना...'IPL 2025: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पराभव केल्यानंतर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे.
Read more »
ड्रग्स टेस्टमध्ये फेल झाला कागिसो रबाडा, IPL 2025 दरम्यान लागला बॅन, स्वतः केला खुलासारबाडाने आपली चूक मान्य केली आहे. गुजरात टायटन्सने रबाडाला 10.75 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. तो या सीजनमध्ये फक्त २ सामने खेळू शकला, त्यानंतर अचानक 2 एप्रिल रोजी आयपीएल मध्यात सोडून तो मायदेशी परतला.
Read more »
आज RCB vs KKR: कोलकाता के लिए करो या मरो वाला मैच, बेंगलुरु में बारिश की 84% आशंकाRoyal Challengers Bangalore (RCB) Vs Kolkata Knight Riders (KKR) Match IPL LIVE 2025 Score Update; Follow IPL 2025 Latest News, KKR vs RCB IPL LIVE Updates with Dainik Bhaskar (दैनिक भास्कर) .
Read more »
प्लेऑफ से बाहर हुई लखनऊ सुपर जाएंट्स तो निशाने पर आए ऋषभ पंत, पूर्व क्रिकेटर के बयान से मची खलबलीRishabh Pant, Lucknow Super Giants, IPL 2025, IPL 2025 playoffs, Mohammed Kaif, IPL playoffs, ऋषभ पंत, लखनऊ सुपर जाएंट्स, आईपीएल 2025, आईपीएल, मोहम्मद कैफ, आईपीएल प्लेऑफ
Read more »
एलिमिनेटर आज, MI vs GT: दोनों टीमें प्लेऑफ में दूसरी बार भिड़ेंगी, हारने वाली टीम हो जाएगी बाहरGujarat Titans vs Mumbai Indians IPL Eliminator Match LIVE Score Update; Follow IPL 2025 Latest News, IPL 2025 Eliminator MI vs GT Match Details Updates ON Dainik Bhaskar (दैनिक भास्कर)
Read more »
MI VS GT : कुसल मेंडिसची घोडचूक गुजरातला भारी पडली, एलिमिनेटर सामन्यात फुकटात गमावली विकेटIPL 2025 : मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करून गुजरातला विजयासाठी 229 धावांचे आव्हान दिले. दरम्यान गुजरात टायटन्सचा फलंदाज कुसल मेंडिस याने फुकटात विकेट गमावली.
Read more »
