India vs SA T20: भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्व फॉरमॅटमध्ये किमान 10 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
India vs SA T20: भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह मंगळवारी तिन्ही फॉरमॅटमध्ये किमान 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. हा विक्रम करणारा तो एकूण पाचवा खेळाडू आहे. कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 11 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराहने हा टप्पा गाठला.
दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेव्हिस हा त्याचा 100 वा बळी होता. सूर्यकुमार यादवने कव्हरवर त्याचा झेल घेतला. मात्र यावेळी बुमराहने टाकलेल्या चेंडूवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. अम्पायर्सनी फ्रंट-फूट नो-बॉल तपासला, परंतु थर्ड अम्पायरने तो योग्य चेंडू असल्याचं सांगितलं. बुमराहच्या बुटाचा काही भाग क्रिजच्या मागे असल्याने त्यांनी तो निर्णय दिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी हा नो बॉल असल्याचा दावा केला. समालोचन करणाऱ्या मुरली कार्तिकने, नो-बॉल असल्याचं सिद्ध करण्यासाठी कॅमेरा अँगल पुरेसा निर्णायक नव्हता आणि संशयाचा फायदा गोलंदाजाला दिला पाहिजे. तथापि, दुसऱ्या समालोचकाने यावर असहमती दर्शविली. पण जरी हा चेंडू नो बॉल दिला असता तरी, बुमराहने 100 विकेट्सचा भीम पराक्रम केलाच असता. कारण 100 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने केशव महाराजला बाद करत त्याची दुसरी विकेट मिळवली.Fair Ball or No Ball pic.twitter.com/tuBfajx8MI— Richard Kettleborough December 9, 2025सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, हार्दिक पंड्याने तुफान फलंदाजी केली. त्याने 28 चेंडूत नाबाद 59 धावा फटकावल्या आणि मंगळवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 101 धावांनी पराभव केला. क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीतून सावरल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणाऱ्या पंड्याने सहा चौकार आणि चार षटकारांसह भारताला सहा बाद 175 धावांपर्यंत पोहोचवले.Dewald Brevis is not out it’s no ball pic.twitter.com/FYAEjimhOP— Prakash December 9, 2025दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनीही फलंदाजीत महत्वपूर्ण योगदान दिलं. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ 12.3 षटकांत 74 धावांवर गारद झाला. डेवाल्ड ब्रेव्हिस सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेची टी-20 क्रिकेटमधील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. भारताकडून अर्शदीप सिंग , वरुण चक्रवर्ती , जसप्रीत बुमराह , अक्षर पटेल , शिवम दुबे आणि पंड्या अशा सर्वच गोलंदाजांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी आणि लुथो सिपामला यांनी पाच विकेट्स घेतल्या.
India Vs South Africa Jasprit Bumrah
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs SA T20: பிளேயிங் 11ல் குல்தீப் இல்லை? போட்டிப்போடும் இரண்டு வீரர்கள்.. முழு விவரம்!India vs south africa: இந்திய அணியில் ஒரே இடத்திற்கு மூன்று பேர் போட்டிபோடுகின்றனர்.
Read more »
भारत में 10 साल से टी-20 सीरीज नहीं जीती अफ्रीका: शुभमन और हार्दिक वापसी के लिए तैयार; IND vs SA पहला मैच क...India Vs South Africa (IND Vs SA) T20 Match 2025 LIVE Score Latest Update; Follow IND Vs SA T20 playing 11, Pitch Report, Player Performance and Cuttack Stadium Updates On Dainik Bhaskar (दैनिक भास्कर).
Read more »
Ind vs sa: சஞ்சு சாம்சனுக்கு இடம் இல்லை! இந்திய அணியில் 2 அதிரடி மாற்றங்கள்!India s Likely Playing XI For 1st T20I vs South Africa: தென்னாப்பிரிக்காவிற்கு எதிரான முதல் டி20 போட்டியில் கேப்டன் சூர்யகுமார் யாதவ் தலைமையிலான இந்திய அணி, பல புதிய வியூகங்களுடன் களமிறங்க தயாராகியுள்ளது.
Read more »
IND W vs SL W: ਸ਼੍ਰੀਲੰਕਾ ਵਿਰੁੱਧ ਟੀ-20 ਲੜੀ ਲਈ ਭਾਰਤੀ ਮਹਿਲਾ ਟੀਮ ਦਾ ਐਲਾਨ;ਦੋ ਨਵੇਂ ਚਿਹਰੇ ਸ਼ਾਮਿਲIND W vs SL W: ਆਸਟ੍ਰੇਲੀਆ ਵਿਰੁੱਧ ਵਿਸ਼ਵ ਕੱਪ ਸੈਮੀਫਾਈਨਲ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਜ਼ਖਮੀ ਪ੍ਰਤੀਕਾ ਰਾਵਲ ਦੀ ਜਗ੍ਹਾ ਲੈਣ ਵਾਲੀ ਧਮਾਕੇਦਾਰ ਓਪਨਰ ਸ਼ੈਫਾਲੀ ਵਰਮਾ ਵੀ ਟੀਮ ਦਾ ਹਿੱਸਾ ਹੈ।
Read more »
IND vs SA Result: ஹர்திக் பாண்டியாவின் அதிரடி! இனி இந்த வீரருக்கு வாய்ப்பு இல்லை!India vs South Africa 1st T20I: இந்தியா மற்றும் தென்னாப்பிரிக்கா அணிகளுக்கு இடையிலான முதல் டி20 போட்டியில் இந்திய அணி அபார வெற்றி பெற்றுள்ளது.
Read more »
हार्दिक टी-20 में 100 सिक्स लगाने वाले चौथे भारतीय: बुमराह ने विकेट की सेंचुरी लगाई, साउथ अफ्रीका का सबसे छ...Hardik is the fourth Indian to hit 100 sixes in T20Is.
Read more »
