CSK स्टार उर्विल पटेलचा SMAT 2025 मध्ये धुमाकूळ: 11 चेंडूत 39 धावा!

क्रीडा News

CSK स्टार उर्विल पटेलचा SMAT 2025 मध्ये धुमाकूळ: 11 चेंडूत 39 धावा!
उर्विल पटेलCSKSMAT 2025
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 151 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 81%
  • Publisher: 63%

सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये, चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा स्टार खेळाडू, उर्विल पटेल याने 11 चेंडूत 39 धावा करत गोलंदाजांना अक्षरशः नामोहरम केले. त्याने 5 षटकार आणि 2 चौकार लगावले, ज्यामुळे गुजरातने रोमांचक विजय मिळवला. त्याच्या फलंदाजीतील आत्मविश्वास आणि आक्रमक दृष्टिकोन IPL अनुभवामुळे अधिक स्पष्ट झाला.

CSK Star Destroys Bowlers at SMAT 2025 : भारताच्या स्थानिक टी-20 क्रिकेट मध्ये सध्या एकच नाव सर्वत्र घुमत आहे उर्विल पटेल ! आईपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना ज्याने प्रभावित केले त्या या तरुण यष्टीरक्षक-फलंदाजाने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अशी इनिंग खेळली की हिमाचल प्रदेशचे गोलंदाज बघतच बसले.

11 चेंडूंमध्ये 39 धावा म्हणजे केवळ आक्रमण नाही, तर गोलंदाजीवर केलेला सरळ हल्ला होता.अखेरच्या चेंडूपर्यंत तंगलेला सस्पेन्सहा सामना इतका रोमांचक होता की स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा श्वास जणू शेवटच्या चेंडूपर्यंत अडकून राहिला होता. हिमाचल प्रदेशने 193 धावा करून आव्हान दिलं, आणि गुजरातने त्या आव्हानाचा पाठलाग करताना इतके चढ-उतार पाहिले की निकाल कोणत्या बाजूने जाईल याचा अंदाज शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच नव्हता.शेवटची चेंडू, शेवटचा रनहा विजय इतका नाट्यमय होता की सोशल मीडियावर लगेच हॅशटॅग्स सुरू झाले #GujaratThriller #UrvilStorm गुजरातसाठी कर्णधार म्हणून उतरलेल्या उर्विल पटेलने सुरुवातीलाच संकेत दिला की आज त्याच्या बॅटमधून आग बाहेर पडणार आहे. विकेटवर सेट होण्याचं त्याने मनात सुद्धा आणलं नाही आणि थेट पहिल्याच ओव्हरपासून आक्रमण करायला सुरुवात केली. उर्विलचा इनिंग ब्रेकअप:11 चेंडू39 धावा5 छक्के2 चौकारस्ट्राइक रेट: 350+हे आकडे वाचले तरी एक मिनिट भान हरपते... मग गोलंदाजांची काय अवस्था झाली असेल? त्याने खेळलेले पाचही छक्के असे होते की चेंडू सेकंड-स्टँडपर्यंत जाईपर्यंत कॅमेरा सुद्धा पाठलाग करू शकत नव्हता. त्याच्या शॉट्सची टाइमिंग, बॅक-लिफ्ट आणि पॉवर सगळंच एक्स्ट्रा-ऑर्डिनरी होतं.उर्विलच्या खेळात दिसला मोठा बदल2025 मध्ये जेव्हा तो CSK कडून डेब्यू झाला, तेव्हा फक्त 3 सामन्यांत 68 धावा करून त्याने इतकी चमक दाखवली की 2026 ऑक्शनपूर्वीच टीमने त्याला रिटेन करण्याचा निर्णय घेतला.उर्विलच्या खेळात IPL अनुभवानंतर स्पष्ट फरक दिसू लागला आहे,जास्त आत्मविश्वासअधिक धाडसपरिस्थितीनुसार गिअर बदलण्याची क्षमताआणि महत्त्वाचं म्हणजे स्टार-पॉवरहेच सर्व गुण त्याने या इनिंगमध्ये दाखवले.सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये उर्विलचा दबदबाया टूर्नामेंटमध्ये उर्विल पटेल सध्या सर्वाधिक छक्के ठोकणाऱ्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.त्याची स्पर्धेतील कामगिरी:6 सामने195 धावा18 छक्के1 शतकस्पर्धेत अभिषेक शर्मा, आयुष म्हात्रे यांसारखे धडाकेबाज फलंदाज चांगले खेळत आहेत, पण उर्विल पटेलची आक्रमकता आणि सातत्य यामुळे त्याच्याकडे क्रिकेट तज्ज्ञांचं विशेष लक्ष आहे.मृदुल सुरोचचं धडाकेबाज 88 पण निष्फळहिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना चांगली स्कोर-बोर्ड उभारला.कर्णधार मृदुल प्रवीण सुरोच याने:48 चेंडू88 धावागोलंदाजीत 3 विकेट्सअसा सर्वांगीण पराक्रम केला. तरीही त्याच्या 4 षटकांत 45 धावा जाऊन गेल्या आणि हेच हिमाचलचा पराभव ठरवणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक होते.गुजरातच्या विजयातील इतर हिरोउर्विलने पाया रचला, पण विजयात इतर खेळाडूंचाही मोलाचा वाटा होता:आर्य देसाई – 37 धावासौरव चौहान – 35 धावाहर्षल पटेल – 8 चेंडूंमध्ये नाबाद 12 धावाविशेषतः हर्षल पटेलच्या शेवटच्या क्षणातील नर्व्ह्स-ऑफ-स्टील इनिंगमुळेच गुजरातने सामना जिंकला.उर्विलचा संदेश आक्रमकता माझी ओळख!सामन्यानंतर उर्विलने आपल्या खेळाबाबत बोलताना सांगितले की, जेव्हा मी मैदानात उतरतो, तेव्हा आक्रमक क्रिकेट हा माझा स्वभाव आहे. टीमला सुरुवातीपासून गती देणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. त्याच्या खेळातली निश्चयी वृत्ती पाहून असे वाटते की भविष्यात तो मोठ्या स्तरावर टीम इंडिया ड्रेसिंग रूममध्येही दिसू शकतो.भारताचा उदयोन्मुख सुपरस्टारया खेळीनंतर उर्विलच्या नावाला देशभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. त्याची स्वच्छ मारक क्षमता, शॉट्समधील धार, विकेटकीपिंगची कौशल्ये आणि नेतृत्वगुण हे सर्व पाहता तो भविष्यात भारतीय T20 संघाचा प्रमुख सदस्य होण्याची क्षमता ठेवतो.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

उर्विल पटेल CSK SMAT 2025 टी-20 क्रिकेट गुजरात

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

கிரீன், லிவிங்ஸ்டன் மட்டுமல்ல.. இந்த வீரருக்கும் குறி வைக்கும் CSK!கிரீன், லிவிங்ஸ்டன் மட்டுமல்ல.. இந்த வீரருக்கும் குறி வைக்கும் CSK!CSK: சிஎக்ஸ் அணி எந்தெந்த வீரர்களை மினி ஏலத்தில் குறி வைக்கும் என்பது குறித்து.
Read more »

Aaj Ka Panchang: ये है 06 दिसंबर का पूरा दैनिक पंचांग, आज मिथुन राशि में चंद्रमा, जानें राहुकाल कब तक!Aaj Ka Panchang: ये है 06 दिसंबर का पूरा दैनिक पंचांग, आज मिथुन राशि में चंद्रमा, जानें राहुकाल कब तक!Aaj Ka Panchang 06 December 2025: शनिवार का दिन यानी 06 दिसंबर 2025 का दिन अति शुभ और सकारात्मक है
Read more »

500 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಮಹಾ ಪುರುಷ ರಾಜಯೋಗ.. ಉಕ್ಕಿ ಹರಿಯಲಿದೆ ಬ್ಯಾಂಕ್‌ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್‌! ಈ 3 ರಾಶಿಯವರಿಗೆ ಜಾಕ್‌ಪಾಟ್‌500 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಮಹಾ ಪುರುಷ ರಾಜಯೋಗ.. ಉಕ್ಕಿ ಹರಿಯಲಿದೆ ಬ್ಯಾಂಕ್‌ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್‌! ಈ 3 ರಾಶಿಯವರಿಗೆ ಜಾಕ್‌ಪಾಟ್‌mahapurush yoga 2025 effects: 500 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಮಹಾ ಪುರುಷ ರಾಜಯೋಗ ರೂಪುಗೊಳ್ಳಲಿದ್ದು, ಈ ಮೂರು ರಾಶಿಯವರು ಇದರಿಂದ ಅದೃಷ್ಟವಂತರಾಗಲಿದ್ದಾರೆ.
Read more »

कोलकाता पुलिस कांस्टेबल परीक्षा 2025 के एडमिट कार्ड जारी, ऐसे करें डाउनलोडकोलकाता पुलिस कांस्टेबल परीक्षा 2025 के एडमिट कार्ड जारी, ऐसे करें डाउनलोडकोलकाता पुलिस कांस्टेबल परीक्षा 2025 के एडमिट कार्ड जारी, डायरेक्ट लिंक से करें डाउनलोड
Read more »

SMAT 2025: विराट सुपर हिट तो वैभव हुए फ्लॉप, संजू का अर्धशतक गया बेकार; कप्‍तान रिंकू की पारी नहीं आई यूपी के कामSMAT 2025: विराट सुपर हिट तो वैभव हुए फ्लॉप, संजू का अर्धशतक गया बेकार; कप्‍तान रिंकू की पारी नहीं आई यूपी के कामआयुष म्हात्रे 69 और शार्दुल ठाकुर तीन विकेट की बदौलत मुंबई ने एक और जीत दर्ज कर सैयद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी के नाकआउट में अपनी जगह सुनिश्चित की। छत्तीसगढ़ के 121 रनों के लक्ष्य को मुंबई ने 15.5 ओवर में दो विकेट खोकर हासिल कर लिया। इकाना स्टेडियम में शनिवार को खेले गए मुकाबले में छत्तीसगढ़ की टीम पहले खेलकर 19.
Read more »

ದಿನ ಭವಿಷ್ಯ (07 ಡಿಸೆಂಬರ್ 2025): ಇಂದು 5 ಶಕ್ತಿಶಾಲಿ ರಾಜಯೋಗ.. ಈ 5 ರಾಶಿಯವರಿಗೆ ಡಬಲ್‌ ಜಾಕ್‌ಪಾಟ್‌! ಶ್ರೀಮಂತರಾಗುವ ಸಮಯ..ದಿನ ಭವಿಷ್ಯ (07 ಡಿಸೆಂಬರ್ 2025): ಇಂದು 5 ಶಕ್ತಿಶಾಲಿ ರಾಜಯೋಗ.. ಈ 5 ರಾಶಿಯವರಿಗೆ ಡಬಲ್‌ ಜಾಕ್‌ಪಾಟ್‌! ಶ್ರೀಮಂತರಾಗುವ ಸಮಯ..Rashi Bhavishya today: ಈ 5 ರಾಶಿಯವರು ಇಂದು 07 ಡಿಸೆಂಬರ್ 2025, ಭಾರೀ ಅದೃಷ್ಟವನ್ನು ಪಡೆಯಲಿದ್ದಾರೆ.
Read more »



Render Time: 2026-04-02 21:24:51