Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोर

Lawrence Bishnoi News

Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोर
Mumbai PoliceLawrence Bishnoi CustodyBaba Siddique
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 121 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

गृहमंत्रालयाने (Home Ministry) दिलेला आदेश ऑगस्ट महिन्यापर्यंतच लागू होणं अपेक्षित होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार या आदेशाची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.

Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोर गृहमंत्रालयाने दिलेला आदेश ऑगस्ट महिन्यापर्यंतच लागू होणं अपेक्षित होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार या आदेशाची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने घेतली आहे. मात्र यानंतरही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईचा ताबा मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या जेलमध्ये असून मुंबई पोलिसांना त्याचा ताबा मिळालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये सलमान खानच्या घऱाबाहेर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी साबरमती जेलमध्ये असणाऱ्या बिष्णोईचा ताबा मिळवण्यासाठी अनेक अर्ज दाखल केले. मात्र हे सर्व अर्ज फेटाळण्यात आले. गृहमंत्रालयाने बिष्णोईचं प्रत्यार्पण करण्यापासून रोखलं असल्याने हे अर्ज फेटाळत नकार देण्यात आला. लॉरेन्स बिष्णोईला ऑगस्ट 2023 मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दिल्लीच्या तिहार जेलमधून साबरमती जेलमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी गृहमंत्रालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता च्या कलम 268 अन्वये आदेश जारी केला होता. त्यानुसार, कोणतंही राज्य किंवा यंत्रणा एका वर्षांसाठी त्याच्या कोठडीची मागणी करू शकत नाही. हे कलम सरकारला कैद्यांच्या हालचालींवर बंदी घालण्याचा अधिकार देतं. जेव्हा असं केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. हा आदेश यावर्षी ऑगस्टपर्यंत लागू होणार होता, मात्र तो आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बिष्णोई टोली चर्चेत आली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी त्यांनी घेतली होती. या टोळीच्या दैनंदिन कारवाया बिष्णोईचा भाऊ अनमोल आणि गुंड गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा चालवता. या टोळीने काळविटाच्या शिकारीत सहभागी असल्याने सलमान खानला ठार मारणार असल्याचं म्हटलं आहे. सलमान खानने 1998 मध्ये काळविटाची शिकार केली होती. बिष्णोई समाजात काळवीटला पवित्र मानलं जातं. लॉरेन्स बिष्णोईने 2018 मध्ये कोर्टात हजर केलं असता सांगितलं होतं की,"आम्ही जोधपूरमध्ये सलमान खानला ठार करणार आहोत. आम्ही कारवाई केल्यावर सर्वांना कळेल. मी आतापर्यंत काहीही केलेले नाही. माझ्यावर विनाकारण गुन्ह्यांचे आरोप होत आहेत". या टोळीतील एका सदस्याने सिद्दींकीच्या हत्येतही त्याचाच हात असल्याचं म्हटलं आहे. लोणकरने दावा केला की सिद्दीकींचा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याने, तसंच सलमान खानच्या जवळचा असल्याने ठार करण्यात आलं. सलमान खनच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एक अनुज थापन याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे त्यचा बदला घेत असल्याचाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पोलीस याची वैधता तपासत आहेत.मनोरंजन

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Police Lawrence Bishnoi Custody Baba Siddique Salman Khan Gujarat

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

चपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारणचपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारणShocking News: एकाच दिवशी त्या घरातील 13 जणांचा मृत्यू झाला. उपचारासाठी या 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घरातील केवळ एक तरुणी वाचली.
Read more »

Baba Siddique हत्या मामले में लॉरेन्स बिशनई गिरोह का संदेहBaba Siddique हत्या मामले में लॉरेन्स बिशनई गिरोह का संदेहमंबई पुलिस पूर्व मंत्री बाबा सिद्दीक की हत्या की जाँच कर रही है और इस मामले में लॉरेन्स बिशनई गैंग के शामिल होने की संभावना पर ध्यान दे रही है। क्योंकि बॉलीवुड अभिनेता सलमान खान के साथ सिद्दीक के निकट संबंध थे, जो पहले ही लॉरेन्स बिशनई से संबंधित लोगों द्वारा जान से मारने की धमकी का सामना कर चुके हैं।
Read more »

Baba Siddique पर गिद्ध की तरह नजरें गड़ाए हुए थे शूटर, 25 दिन से कर रहे थे रेकी, जानें मर्डर की Inside StoryBaba Siddique पर गिद्ध की तरह नजरें गड़ाए हुए थे शूटर, 25 दिन से कर रहे थे रेकी, जानें मर्डर की Inside StoryBaba Siddique Murder: How jailed Lawrence Bishnoi plotted murder of Baba Siddiqui? जानें- Baba Siddique के मर्डर की Inside Story | एक्सप्लेनर | महाराष्ट्र समाचार
Read more »

सलमान खान, सगुनप्रीत सिंह आणि... 'हे' आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे टॉप 5 टार्गेट, NIA तपासात समोरसलमान खान, सगुनप्रीत सिंह आणि... 'हे' आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे टॉप 5 टार्गेट, NIA तपासात समोरLawrence Bishnoi Top Five Targets : मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण यानिमित्ताने लॉरेन्स बिश्नोईबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Read more »

Exclusive : सलमान और मुंबई में दहशत, दाऊद को संदेश... : बाबा सिद्दीकी हत्याकांड में NDTV का बड़ा खुलासाExclusive : सलमान और मुंबई में दहशत, दाऊद को संदेश... : बाबा सिद्दीकी हत्याकांड में NDTV का बड़ा खुलासाBaba Siddique Murder Case SUPER EXCLUSIVE | बाबा सिद्दीकी हत्याकांड NDTV का बहुत बड़ा खुलासा
Read more »

Baba Siddique Murder Case SUPER EXCLUSIVE | बाबा सिद्दीकी हत्याकांड NDTV का बहुत बड़ा खुलासाBaba Siddique Murder Case SUPER EXCLUSIVE | बाबा सिद्दीकी हत्याकांड NDTV का बहुत बड़ा खुलासाBaba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी की हत्या का मकसद सलमान खान (Salman Khan) और मुंबई में दहशत पैदा करना और अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) तक संदेश पहुंचाना था.
Read more »



Render Time: 2026-04-02 17:20:59