Gautam Gambhir on Bangalore Stampede: आरसीबीने विजयी परेड काढायलाच नको होती असं परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मांडलं आहे.
Bangalore Stampede: 'रोड शोची गरजच काय?', 11 जणांच्या मृत्यूमुळे गौतम गंभीर RCB वर संतापला, म्हणाला 'तुम्हाला बंद दरवाजाच्या आत.' Gautam Gambhir on Bangalore Stampede: आरसीबीने विजयी परेड काढायलाच नको होती असं परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने मांडलं आहे.
Bangalore Stampede: 'रोड शोची गरजच काय?', 11 जणांच्या मृत्यूमुळे गौतम गंभीर RCB वर संतापला, म्हणाला 'तुम्हाला बंद दरवाजाच्या आत...' Gautam Gambhir on Bangalore Stampede: आरसीबीने विजयी परेड काढायलाच नको होती असं परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने मांडलं आहे.Gautam Gambhir on Bangalore Stampede: आरसीबीच्या आयपीएल 2025 हंगामताील विजयी सेलिब्रेशनमुळे 11 जणांना जीव गमवावा लागल्यानंतर सर्व स्तरातून टीका होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही परखड मत मांडलं असून, आरसीबीने विजयी परेड काढायलाच नको होती असं म्हटलं आहे. असे कार्यक्रम बंद दरवाजाआड व्हायला हवेत असंही मत त्याने मांडलं आहे. 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएल जिंकल्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आनंद काही क्षणातच दुःखात रुपांतरित झाला. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सायंकाळी 5 वाजता विधान सौधात विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्यासह आरसीबी संघातील सदस्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर नियोजित बस परेड झाली. जिथे हा कार्यक्रम होणार होता त्या परिसरात लाखो लोक जमले होते. या कार्यक्रमात 11 जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास 50 जण जखमी झाले. भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, त्याआधी गौतम गंभीरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला बंगळुरुतील दुर्घटनेबद्दल विचारलं असता म्हणाला की,"आपल्याला रोड शोची गरज आहे, असं मला कधीच वाटत नव्हते. मी जेव्हा खेळत होतो तेव्हाही माझं हेच मत होतं. 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतरही आपण रोड शो करू नयेत असं माझं म्हणणं होतं. लोकांचं जीवन खूप महत्वाचं आहे आणि मी तेच म्हणत राहीन. भविष्यात आपण अशा प्रकारचे रोड शो न करण्याबद्दल थोडेसे जागरूक राहू शकतो आणि कदाचित ते बंद दरवाजाआड करू शकतो. जे घडले ते खूप दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या प्रति मला वाईट वाटत आहे"."भविष्यात असं काही होऊ नये अशी आशा आहे. कारण आपण सर्वजण जबाबदार नागरिक आहोत. आपण सर्वांनी याची काळजी घ्यायला हवी. जर आपण रोड शोसाठी तयार नसू, तर तो करु नये. तुम्ही 11 लोकांना गमावू शकत नाही," असंही तो म्हणाला. भारताचे दिग्गज क्रिकेटर कपिल देव यांनीही यावर भाष्य केलं आहे."मला खूप वाईट वाटत आहे. मला वाटतं आपण एकमेकांकडून शिकलं पाहिजे. पुढच्या वेळी असं काहीतरी घडेल तेव्हा लोकांनी अधिक जागरूक राहायला हवं. लोक चुका करतात," असं कपिल देव यांनी आर्चे ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या कॉर्पोरेट कार्यक्रमादरम्यान पीटीआयला सांगितलं. 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय कर्णधाराने संघांना आणि इतर भागधारकांना अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करताना संयम राखण्याचं आवाहन केलं."चूक इतकी मोठी नसावी की तुम्ही मजा करत असता आणि जीव गमवावा लागतो. भविष्यात, जर कोणताही संघ जिंकला तर संयम राखा. आनंद साजरा करण्यापेक्षा जीव जास्त महत्त्वाचे आहेत," असं ते पुढे म्हणाले.
Royal Challengers Bengaluru Gautam Gambhir IPL 2025 England Vs India 2025 Cricket Zee Sports Gautam Gambhir Virat Kohli
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'तुम्हाला जर त्याला कर्णधार करायचा नसेल...,' आर अश्विन BCCI वर संतापला, 'तो राष्ट्रीय संपत्ती असताना...'रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता त्याच्या जागी शुभमन गिलकडे (Shubhman Gill) कर्णधारपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. मात्र यावरुन आर अश्विनने नाराजी जाहीर केली आहे.
Read more »
श्रेयस अय्यरला टेस्ट टीममधून का वगळलं? गंभीरचं मोजून 3 शब्दात उत्तर; म्हणाला, 'मी...'Gautam Gambhir On Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला संघातून वगळण्यामागे गौतम गंभीर असल्याची जोरदार चर्चा सुरु असताना गंभीर काय म्हणालाय जाणून घ्या...
Read more »
'RCB अजूनही...', Playoffs च्या पहिल्या मॅचआधीच प्रचंड संतापला AB de Villiers; कारण...IPL 2025 RCB AB de Villiers Angry: अनेक पर्वांमध्ये आरसीबीच्या संघाकडून खेळलेला दक्षिण आफ्रिकेचा हा माजी क्रिकेटपटू चांगलाच संतापला
Read more »
मैदानाबाहेर चेंगराचेंगरीत 11 मृत्यू होऊनही विराट कोहलीचं खेळाडूंसह सुरु होतं सेलिब्रेशन, IPL चेअरमन म्हणाले 'त्यांना साधी...'IPL Chairman on Bangalore Stampede: मैदानात आरसीबीच्या विजयाचं सेलिब्रेशन सुरु असताना, मैदानाबाहेर नेमकं काय घडत आहे याची अधिकाऱ्यांना कल्पना नव्हती असा दावा आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी केला आहे.
Read more »
IPL 2025: '11 लोगों की जाने...आप रोड शो के लिए तैयार नहीं थे तो नहीं करनी थी', RCB पर भड़के गौतम गंभीरबेंगलुरु के चिन्नावस्वामी स्टेडियम के बाहर मची भगदड़ के मामले में अब टीम इंडिया के हेड कोच गौतम गंभीर का बयान सामने आया है. गौतम गंभीर ने कहा. खेल समाचार | IPL
Read more »
विराट कोहली की टीम को गौतम गंभीर ने जमकर लताड़ा, बोले- कर नहीं सकते तो करना नहीं चाहिए, रोड शो के हमेशा खिल...आईपीएल 2025 की विजेता रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु की विक्ट्री परेड में भगदड़ से 11 फैंस की मौत पर कोच गौतम गंभीर ने दुख जताया और रोड शो की आवश्यकता पर सवाल उठाया.
Read more »
