Maharashtra Infrastructure News: नवी मुंबईमध्ये तयार झालेल्या विमानतळापेक्षा दुप्पटीहून मोठं असलेल्या या विमानतळासाठी जमीन संपादित करण्याची प्रतिक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच सरकारला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
Maharashtra Infrastructure News : पुण्यातील विद्यमान लोहेगाव विमानतळावरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या पुरंदर विमानतळ प्रकल्पामध्ये सरकार कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतं.
या प्रकल्पासाठी आतापर्यंत 2250 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र यानंतरही जमीन संपादनासंदर्भातील काम काही शेतकऱ्यांनी संपादनासाठी संमती न दिल्याने रखडलेलं आहे. त्यामुळेच आता या शेतकऱ्यांना डेडलाइन देण्यात आली आहे. दिलेल्या तारखेपर्यंत जमिनीच्या संपादनासंदर्भातील संमती न दिल्यास सक्तीने जमीन संपादित केली जाणार आहे....तर सक्तीने जमीन संपादित करणारपुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला गती मिळाली आहे. एकीकडे 2200 शेतकऱ्यांनी संमती दर्शवलेली असतानाच काही शेतकऱ्यांनी अद्याप संमती दिलेली नाही. मात्र संमती न दिल्यास सक्तीने जमीन संपादित केली जाणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी 2200 शेतकऱ्यांकडून 2250 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. अजून 750 एकर जमीन संपादित करणं अपेक्षित आहे. उर्वरित शेतकऱ्यांना संमतीसाठी केवळ दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. संमती न दिल्यास जमीन सक्तीने जमीन संपादित केली जाणार आहे. सक्तीच्या भूसंपादनात चार पट मोबदला मिळणार आहे. मात्र या शेतकऱ्यांना एक मोठा आर्थिक फटकाही बसणार आहे. या शेतकऱ्यांना चारपट मोबदला मिळणार असला तरी दहा टक्के परतावा मिळणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सात गावांतील शेतकऱ्यांशी थेट चर्चा केली आहे.भूसंपादनामुळे प्रभावित गावे कोणती? खर्च किती होणार?सुरुवातीला वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव ही सात गावे चर्चेत होती. आता सहा गावांमधील जमीनीवर हे विमानतळ असणार आहे. चार गावांच्या विरोधामुळे हा बदल करण्यात आला आङे.प्रगती:मार्च 2025 मध्ये एमआयडीसीने भूसंपादनाची अधिसूचना जारी केली. मे महिन्यामध्ये सहा गावांना शासकीय नोटीस पाठवण्यात आली. ऑगस्ट महिन्यामध्ये संमतीपत्रे गोळा करण्यास सुरुवात झाली आणि पहिल्या टप्प्यात निम्मी जागा संपादित करण्यात आली. सप्टेंबरमध्ये टर्मिनलसाठी 2200 एकर राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.एमआयडीसी सुमारे 3500 कोटी रुपये खासगी संस्थांकडून उभारणार आहे.मोबदला किती मिळणार?शेतकऱ्यांनी एकरी 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे. विकसित भूखंड , बेघर कुटुंबांना निवासी भूखंड तीन पटीत आणि मोबदला चालू किमतीच्या अडीच पट असावा अशी मागणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. वाद आणि विरोधाचे कारण काय? शेतकऱ्यांचा जमीन हक्क, पर्यावरणीय चिंता आणि अपुरा मोबदला हे येथील भूसंपादनातील प्रमुख अडथळे आहेत. एप्रिल 2025 मध्ये आक्रोश मोर्चा आणि लाठीचार्ज झाला. काही गावांनी प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा केली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संमती घेण्यावर भर दिला असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भूसंपादन लवकर सुरू होईल असे सांगितले. एखतपूर-मुंजवडीसारखी काही गावे अटींवर संमती देत आहेत. विरोधामुळे प्रकल्प विलंबित झाला, पण सुधारित प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला असून त्याच्याच मंजुरीची प्रतिक्षा आहे. कसा आहे हा प्रकल्प?पुरंदर विमानतळ हा पुणे शहरासाठी प्रस्तावित ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आहे. हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे आणि देशातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे. हा प्रकल्प 2016 पासून चर्चेत आहे, पण भूसंपादन आणि स्थानिक विरोधामुळे अडथळे आले. सध्या हा प्रकल्प वेग घेत असून, केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. खाली या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली आहे.FAQप्रकल्पाची सुरुवात कशी झाली?2016 मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी ने हा प्रस्ताव मांडला. लोहेगाव विमानतळ ओव्हरसॅच्युरेटेड असल्याने , हा दुसरा विमानतळ आवश्यक ठरला.प्रकल्पाचा उद्देश काय? पुण्याच्या हवाई वाहतुकीची क्षमता वाढवणे, लॉजिस्टिक हब विकसित करणे, रोजगार निर्मिती आणि परिसरातील विकास साधणे. हा विमानतळ पुणे, सासवड आणि परिसराशी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला असेल.विमानतळाचं नेमकं स्थान कुठे आहे? आकार केवढा?पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका . बिबवेवाडी, धानोरी यांसारख्या भागांशी जोडलेला. सुरुवातीला हे विमानतळ 7 हजार एकर प्रस्तावित होते पण आता 3 हजार एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. 3 हजार एकरांवर टर्मिनल आणि दोन धावपट्ट्यांसाठी 2200 एकर राखीव जागा असणार आहे. लॉजिस्टिक हबसाठी टप्प्याटप्प्याने जागा वापरली जाईल. दोन धावपट्ट्या असतील, ज्यामुळे तो आंतरराष्ट्रीय मानकांचा असेल. नवी मुंबई विमानतळापेक्षा हे विमानतळ आकारमानाने मोठं असणार आहे. नवी मुंबई विमानतळ 1300 एकरांवर पसरलेलं आहे.
Infrastructure News Purandar Airport Project Update Farmers Land Forcefully
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Maharashtra Breaking News Today LIVE: दिल्लीनंतर आता मुंबई हायकोर्टाला धमकीचा मेलMaharashtra Breaking News Today LIVE: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, एका क्लिकवर
Read more »
1 लीटर Ghee अब इतने में मिलेगा, 22 सितंबर से हो रहा सस्तामदर डेयरी ने 1 लीटर टिन घी को 750 से घटाकर 720 रुपये कर दिया है. इसी तरह, पाउच और जार घी पर भी 30 रुपये घटाया है.
Read more »
PM Modi Birthday: पीएम मोदी के 75वें जन्मदिन पर सुदर्शन पटनायक ने सैंड आर्ट से दी खास बधाई, सामने आया वीडियोप्रधानमंत्री मोदी के 75वें जन्मदिन पर सैंड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक ने ओडिशा के पुरी बीच पर 750 कमल के फूलों से सुंदर सैंड आर्ट बनाकर खास बधाई दी. यह वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और लोग इसे खूब पसंद कर रहे हैं.
Read more »
कोरोना से इतने दिन संक्रमित रहा ये शख्स कि बन गया वर्ल्ड रिकॉर्ड, आया था खतरनाक अलर्टएक व्यक्ति का COVID-19 संक्रमण 750 दिनों तक चला, जो विश्व रिकॉर्ड है. कमजोर इम्यून सिस्टम के कारण वायरस शरीर में रहा, जिससे ओमिक्रॉन जैसे म्यूटेशन देखे गए. यह लॉन्ग COVID नहीं, बल्कि सक्रिय वायरस था. शोधकर्ताओं ने चेतावनी दी कि ऐसे लंबे संक्रमण नए खतरनाक वैरिएंट बना सकते हैं.
Read more »
China Masters Super 750: सात्विक और चिराग अंतिम-16 में, लक्ष्य सेन पहले दौर में हारकर हुए बाहरChina Masters Super 750 सात्विक साईराज रंकीरेड्डी और चिराग शेट्टी की जोड़ी चाइना मास्टर्स बैडमिंटन टूर्नामेंट के पुरूष डबल्स क्वार्टर फाइनल में पहुंच गई जबकि लक्ष्य सेन पहले दौर में हारकर बाहर हो गए। पिछले सप्ताह हांगकांग ओपन में उपविजेता रहे सात्विक और चिराग ने मलेशिया के जुनैदी आरिफ और राय किंग याप को 42 मिनट में 24-22 21-13 से...
Read more »
खुशखबरी! अब गाय-भैंस का गोबर बेचकर किसान कमाएंगे पैसा; NDDB ने उठाया बड़ा कदमराष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड National Dairy Development Board छह राज्यों - गुजरात गोवा महाराष्ट्र राजस्थान ओडिशा और बिहार में 750 करोड़ रुपये की लागत से 15 संपीड़ित बायोगैस CBG संयंत्र स्थापित कर रहा है। इसके लिए राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड किसानों से गोबर खरीदेगी। यानी किसानों के लिए गोबर आय का साधन के रूप में काम...
Read more »
