'...हे लज्जास्पद आहे'; कट्टर प्रतिस्पर्धाचं विराटच्या निवृत्तीसंदर्भात धक्कादायक विधान

Ben Stokes News

'...हे लज्जास्पद आहे'; कट्टर प्रतिस्पर्धाचं विराटच्या निवृत्तीसंदर्भात धक्कादायक विधान
Ben Stokes Vs Virat KohliVirat KohliRetirement

Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा पहिलाच परदेश दौरा इंग्लंडमध्ये असणार आहे.

Virat Kohli Test Retirement : विराट कोहलीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा पहिलाच परदेश दौरा इंग्लंडमध्ये असणार आहे.इंग्लंडमध्ये पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या भारताच्या मालिकेआधीच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

मात्र विराटने निवृत्ती घेतल्याचं जाहीर केल्यानंतर इंग्लंडच्या संघातील त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या एका खेळाडूने विराट किती महान फलंदाज आहे आणि तो विरोधक म्हणून कसा आहे याबद्दल फारच भावनिक विधान केलं असून सध्या या खेळाडूने केलेलं विधान व्हायरल होत आहे.ज्या खेळाडूने विराटबद्दल भावनिक विधान केलं आहे त्याचं नाव आहे बेन स्ट्रोक्स! विराट कोहलीने अमर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी दिलेलं योगदान आणि या दिर्घ प्रकाराच्या क्रिकेटला नवसंजीवनी देण्यासाठी केलेल्या सर्व कष्टाची आठवण काढत बेन स्ट्रोक्सने विराटचं कौतुक केलं आहे. मला विराटविरुद्ध खेळायला फार आवडायचं, असंही बेन स्ट्रोक्स म्हणाला. तसेच आपण विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याला मेसेज केल्याचंही बेन स्ट्रोक्स म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्यामंध्ये तू खेळणार नाहीस हे फारच निराशाजनक असल्याचं, मी त्याला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलंय, असं बेन स्ट्रोक्सने सांगितलं."मैदानावरील झुंजार वृत्तीची भारतीय संघाला नक्कीच कमतरता जाणवले. त्याचा स्पर्धात्मक स्वभाव, जिंकण्याची इर्षा कौतुकास्पद होती. त्याने 18 नंबरच्या जर्सीला कायमचं स्वत:चं करुन घेतलं. कदाचित आता कोणत्या ही भारतीय खेळाडूच्या पाठीवर हा क्रमांक दिसणार नाही. तो फार दिर्घकाळ उत्तम क्रिकेट खेळला. आता तुझ्याविरुद्ध खेळता येणार नाही आमच्यासाठी हे लज्जास्पद आहे. मला विराटविरुद्ध खेळायला आवडतं. आम्ही कायमच एकमेकांविरुद्धच्या स्पर्धेचा आनंद घेतला आहे. यामागील कारण म्हणजे मैदानावरील आमची मानसिकता सारखीच असते. आमची मानसिकता युद्धाची असते," असं बेन स्ट्रोक्सने विराटबद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानेच हा व्हिडीओ शेअर केला आहे."विराट फारच भन्नाट खेळाडू आहे. त्याला अनेक विशेषणं देता येतील. यात काहीच शंका नाही की भारताबरोबरच त्याचे इथे अनेक चाहते आहेत आणि त्याच्यावर दोन्ही देशांमधून कौतुकाचा वर्षाव होत असतो. त्याने इंग्लंडमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उठून दिसणारी आहे. विराटबद्दल मला कायम एक गोष्ट लक्षात राहील ती म्हणजे तो कव्हरमध्ये ज्या ताकदीने चेंडू टोलवायचा ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. त्याने लगावलेला कव्हर ड्राइव्ह दिर्घकाळ माझ्या लक्षात राहील," असंही बेन स्ट्रोक्सने म्हटलं.महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ben Stokes Vs Virat Kohli Virat Kohli Retirement Virat Kohli Retirement Test Cricket

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू असताना जखमी मुलाला पाठीवर घेऊन जाणारा सज्जाद; त्यानंच सांगितलं नक्की काय घडलं?दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू असताना जखमी मुलाला पाठीवर घेऊन जाणारा सज्जाद; त्यानंच सांगितलं नक्की काय घडलं?पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सज्जाद भट्टचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
Read more »

पत्नी आणि लाडक्या लेकीला संपवले, नंतर नवऱ्यानेही उचललं धक्कादायक पाऊल, कारण वाचून तुमचंही मन हळहळेल...पत्नी आणि लाडक्या लेकीला संपवले, नंतर नवऱ्यानेही उचललं धक्कादायक पाऊल, कारण वाचून तुमचंही मन हळहळेल...Ulhasnagar Crime News: पत्नी, मुलीची हत्या करून वडिलांनी जीवन संपल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर येथे घडली आहे.
Read more »

सूरतमधील 13 वर्षीय विद्यार्थ्याचं 23 वर्षीय शिक्षिकेकडून अपहरण, नंतर केला गर्भपात; पोलिसांना वेगळाच संशयसूरतमधील 13 वर्षीय विद्यार्थ्याचं 23 वर्षीय शिक्षिकेकडून अपहरण, नंतर केला गर्भपात; पोलिसांना वेगळाच संशयGujrat Crime News: गुजरातमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडली आहे.
Read more »

'मला तिने सांगितलं होतं की...', YouTuber ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा, 'ती घरात असताना...''मला तिने सांगितलं होतं की...', YouTuber ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा, 'ती घरात असताना...'Youtuber Jyoti Malhotra Arrest: ज्योती मल्होत्राने यूट्यूब व्हिडिओ बनवले होते आणि पाकिस्तानला भेट दिली होती, असा दावा हरीश मल्होत्रा यांनी केल्यानंतर हे विधान करण्यात आलं आहे.
Read more »

Sara Tendulkar Break Up: पालकांना भेटल्यावर 'या' अभिनेत्याने साराबरोबरचं नातं तोडलं; घटनाक्रम समोरSara Tendulkar Break Up: पालकांना भेटल्यावर 'या' अभिनेत्याने साराबरोबरचं नातं तोडलं; घटनाक्रम समोरSara Tendulkar Break Up: साराचं नाव शुभमन गिलबरोबर जोडलं जात असलं तरी तिच्या खऱ्या प्रेमकथेचा धक्कादायक अंत झाल्याची माहिती समोर येत आहे.
Read more »

Indigo विमान आकाशात उडत असताना कोसळली वीज ; अन् त्यानंतर विमानाचं..., पाहा अंगावर काटा आणणारा VIDEOIndigo विमान आकाशात उडत असताना कोसळली वीज ; अन् त्यानंतर विमानाचं..., पाहा अंगावर काटा आणणारा VIDEOगेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. अशातच श्रीनगरमध्ये इंडिगोच्या विमानावर वीज कोसळल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Read more »



Render Time: 2026-04-12 17:21:11