Unique Cricket Record: एकाच कसोटी सामन्यात हॅटट्रिक आणि शतक ठोकणे हा क्रिकेट विश्वातील एक मोठा आणि अनोखा विक्रम आहे.
Unique Cricket Record: एकाच कसोटी सामन्यात हॅटट्रिक आणि शतक ठोकणे हा क्रिकेट विश्वातील एक मोठा आणि अनोखा विक्रम आहे.Unique Cricket Record: एकाच कसोटी सामन्यात हॅटट्रिक आणि शतक ठोकणे हा क्रिकेट विश्वातील एक मोठा आणि अनोखा विक्रम आहे.
हा विक्रम जो कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानास्पद आहे. जगातील एकच क्रिकेटपटू हा मोठा टप्पा गाठू शकला आहे. हा विक्रम या खेळाडूची फलंदाजी आणि गोलंदाजी क्षमताच दर्शवत नाही तर त्याची मानसिक ताकद आणि खेळाप्रती समर्पणही दाखवून देतो. हा विक्रम क्रिकेटविश्वातील या खेळाडूच्या महानतेचे प्रतीक आहे.बांगलादेशचा दिग्गज सोहाग गाझी हा एकाच कसोटी सामन्यात शतक करणारा आणि हॅट्ट्रिक करणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. 2013 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या चितगाव कसोटीत सोहाग गाझीने हा विश्वविक्रम केला होता. या सामन्यात सोहाग गाझीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. ज्यामध्ये 10 चौकार आणि 3 षटकार होते. सोहाग गाझीने सामन्याच्या दुसऱ्या डावात कोरी अँडरसन, बीजे वॉटलिंग आणि डग ब्रेसवेल यांची विकेट घेत हॅटट्रिक पूर्ण केली.कामगिरी विजय मिळवून देऊ शकली नाही सोहाग गाझीची ही चमकदार कामगिरी बांगलादेशी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. हा सामना अनिर्णित राहिला. सोहाग गाझीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत बांगलादेशकडून 10 कसोटी, 20 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले. सोहाग गाझीने जुलै 2015 मध्ये बांगलादेशकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 2014 मध्ये गाझीची बॉलिंग ॲक्शन संशयास्पद मानली गेली होती, त्यानंतर त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही. सोहाग गाझीच्या गोलंदाजीवर आयसीसीने बंदी घातली होती.सोहाग गाझी हा बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटू आहे, ज्याने 2012 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मीरपूर येथे आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. सोहाग गाझीने पहिल्याच कसोटी सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. सोहाग गाझीने बांगलादेशकडून 10 कसोटी सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत आणि 325 धावा केल्या आहेत. सोहाग गाझीने 20 एकदिवसीय सामन्यात 22 आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 बळी घेतले आहेत. सोहाग गाझीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 184 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 57 धावा केल्या आहेत.महाराष्ट्र बातम्याविवाहित महिलांनी नेमकं कशा पद्धतीनं नाव लिहावं? सना मलिकांन...
Cricketer Test Match Sports Cricket
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर अखेर कोर्टाची मोहोर? विभक्त होण्याचे कारण सांगितले...Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे.
Read more »
Viral Video: रोहित शर्माचा 'तो' एक इशारा आणि विराटने संपवला भारत विरुद्ध पाक सामना...Champions Trophy IND vs PAK: रविवारच्या भारत आणि पाकिस्तान सामन्यांदरम्यानचा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kolhi) चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Read more »
ठाणे हादरले! आई आणि आजीनेच केली मुलीची हत्या; कारण ऐकून धक्काच बसेलThane Crime News: ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आई आणि आजीनेच चिमुकल्या मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Read more »
चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारतीय संघाने फायदा उचलला? सलग 2 सामने जिंकल्यानंतर मोठा आरोप, ICC त्यांना एकाच ठिकाणी...इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर्स नासीर हुसेन (Nasser Hussain) आणि मायकल आथर्टन (Michael Atherton) यांनी चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये एकाच मैदानावर खेळत असल्याने भारतीय संघाला फायदेशीर ठरत असल्याचं म्हटलं आहे.
Read more »
'तुम्ही केसरच्या नावाखाली....', पान मसाला जाहिरातीवरुन शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला अखेर नोटीस, 'यापुढे...'आयोगाने सर्व कलाकारांना आणि पान मसाला उत्पादक कंपनीला 30 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
Read more »
होळीच्या दिवशी लक्ष्मी-नारायण योग, मेष-कर्कसह 5 राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ13 मार्च हा गुरुवार आहे आणि फाल्गुन पौर्णिमेचा शुभ योगायोग देखील आहे. लिका दहनचा सण देखील साजरा केला जाईल.
Read more »
