BJP Slams Sharad Pawar For Criticising Fadnavis: शरद पवारांनी नाशिकमधील जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन भाजपाने आता पवारांवर हल्लाबोल केल्याचं दिसून येत आहे.
BJP Slams Sharad Pawar For Criticising Fadnavis: नाशिकमध्ये आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतीविषयक धोरणांवरुन निशाणा साधणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भारतीय जनता पार्टीने उत्तर दिलं आहे.
संपूर्ण कर्जमाफी, ओला दुष्काळ, पीकविमा, हमीभाव, खतांच्या वाढलेल्या किमती, रोगांचा प्रादुर्भाव, रानटी जनावरांचा हैदोस अशा विविध प्रश्नांसाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चामध्ये सहभागी होऊ पवारांनी जनसमुदायाला संबोधित करताना कठोर शब्दांमध्ये सरकावर टीका केल्यानंतर आता भाजपाने या टीकेला उत्तर दिलंय....म्हणून शेतकरी आत्महत्या वाढू लागल्याआपल्या भाषणामध्ये शरद पवारांनी, आपण बघतो आहोत संकट आहे, शेतकरी आत्महत्या करतोय. पण त्याच्याकडे ढुंकवून बघायला आजचे राज्यकर्ते तयार नाहीत. त्यामुळेच पुन्हा एकदा आत्महत्येचं सत्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्या विदर्भातल्या आहेत, मराठवाड्यातल्या आहेत. जीव का देतो माणूस? शेतकरी जीव देतो, फास गळ्यात टाकतो. कशामुळे एवढी टोकाची भूमिका तो घेतो? त्याचं महत्त्वाचं कारण त्याच्या संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्यामागं उभे राहत नाहीत. त्यामुळे स्वतःचं जे काही असेल अथवा नसेल, ते सर्वस्व जात असेल त्यापेक्षा जीव दिलेला बरा! हा विचार आज शेतकरी करतोय. त्यामुळेच आत्महत्या पुन्हा एकदा वाढायला लागल्या, अशा शब्दांमध्ये परिस्थितीबद्दल भाष्य केलं.शहाणपणा तेव्हा कुठे गायब झाला होता? भाजपाचा सवालपवारांच्या याच टीकेला भाजपा नेते आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत उत्तर दिलं आहे. केशव उपाध्येंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करतायत, पण इतिहासात डोकावलं तर तुमच्या सत्तेच्या काळात केलेल्या हजारो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मे प्रश्न विचारताना दिसतील. आज शेतकऱ्यांच्या मोर्चा काढून जी भाषणे ठोकता, त्यातील शहाणपणा तेव्हा कुठे गायब झाला होता? असा सवाल भाजपाच्या प्रवक्त्यांनी विचारला आहे. जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?पवारांनी केलेल्या याच टीकेला, हेच पवार कृषिमंत्री असताना 55 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वेगळ्या शब्दात मांडायचं तर, पवार साहेबांच्या 50 वर्षाच्या राजकीय आयुष्यात रोज सरासरी 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ज्यांच्या कारकिर्दीचा दिवस शेतकरी आत्महत्येविना सरला नाही त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही? असा सवाल केशव उपाध्येंनी केला आहे.लवासासाठी हजारो एकर शेती...शेतकऱ्यांनी मोर्चा काढला तर त्यांच्या मागण्यांवर बोलण्याऐवजी त्यांच्या नेत्यांची जात काढणारे शरद पवार…, शेतकरी कर्जमाफी केल्याचा डांगोरा पिटत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बाबाजी का ठुल्ला देत बँकांची भरपाई करणारे शरद पवार…, कांद्याचे भाव कधी वाढतील या प्रश्नाचे ‘मी ज्योतिषी नाही’ असे उत्तर देणारे शरद पवार…, लवासासाठी हजारो एकर शेती घेताना ज्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला, तेही शरद पवार…, स्वामीनाथन समितीचा अहवाल सोयीस्कर दाबणारे देखील, शरद पवारच! असा उल्लेख उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. सगळ्याच प्रश्नांची सुरुवातच इथे झाली आणि उत्तरेही इथेच येऊन थांबतात, असंही पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. किती उगाळायचा इतिहासशेतकरीप्रेमाची कितीही सरकारविरोधी भाषणे करा मात्र आपल्या इतिहासाचा हाच भयाण वास्तव चेहरा आहे. किती उगाळायचा इतिहास.. उगाळेल तेवढा काळाच! असा टोला पोस्टच्या शेवटी लगावण्यात आला आहे.
Slams Sharad Pawar Criticising Questioning CM Devendra Fadnavis Farmers Issue
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सरपंच हत्याकांड- महाराष्ट्र के मंत्री धनंजय मुंडे का इस्तीफा: मर्डर का आरोपी उनका करीबी, हत्या के दौरान पीट...Maharashtra Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Update; Follow Devendra Fadnavis, NDA Ajit Pawar Latest News, Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
Dhananjay Munde, Maharashtra Minister, Resigns After Close Aide Named In Beed Sarpanch Murder CaseDhananjay Munde resigned after CM Devendra Fadnavis held a high-level meeting with Deputy CM Ajit Pawar.
Read more »
Maharashtra Politics: Sharad Pawar और Ajit Pawar के बीच पक रही नई सियासी खिचड़ी?Maharashtra Politics: महाराष्ट्र की राजनीति में इन दिनों पुनर्मिलन का दौर चल रहा है. उद्धव ठाकरे और राज ठाकरे के साथ आने की खबर के बाद अब शरद पवार और उनके भतीजे अजित पवार की करीबियों ने भी महाराष्ट्र की सियासत में सनसनी फैला दी है. हाल ही में चाचा-भतीजे की एक बंद कमरे में हुई मुलाकात ने उद्धव ठाकरे वाली शिवसेना को बेचैन कर दिया है.
Read more »
'उडान टप्पू आणि टपोरीपणाचं..', राऊतांचा थेट शरद पवारांवर निशाणा; म्हणाले, 'काही गरज नसताना..'Sanjay Raut Slams Sharad Pawar: महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न; नेमकं राऊत म्हणाले काय जाणून घ्या
Read more »
शरद पवार भाकरी फिरवणार, रोहित पवारांचा 'तो' आग्रह अखेर पूर्ण होणार?Sharad Pawar Live News: राष्ट्रवादी काँग्रेस SP मध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे,
Read more »
Operation Sindoor: पवार मोदींचा उल्लेख टाळत म्हणाले, 'पाकिस्तानी नागरिक...'; राहुल गांधींची 7 शब्दांत प्रतिक्रियाOperation Sindoor Sharad Pawar Rahul Gandhi React: शरद पवारांनी ऑपरेशन सिंदूर वर सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Read more »
