'रायगडावरचा वाघ्या कुत्रा फेकून द्या', उदयनराजे भोसले संतापले, म्हणाले 'ही ब्रिटिशांची कुत्री'

Udayanraje Bhosle News

'रायगडावरचा वाघ्या कुत्रा फेकून द्या', उदयनराजे भोसले संतापले, म्हणाले 'ही ब्रिटिशांची कुत्री'
RaigadWaghya Dogवाघ्या कुत्रा
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 103 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Udayanraje Bhosle on Waghya: छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा फेकून द्या असं स्पष्ट मत मांडलं आहे

Udayanraje Bhosle on Waghya: छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा फेकून द्या असं स्पष्ट मत मांडलं आहेरायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद पेटलेला असताना भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा फेकून द्या असं स्पष्ट मत मांडलं आहे. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. तसंच ही ब्रिटिशांची कुत्री असल्याचं विधान केलं आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात आले असता ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. उदयनराजे भोसले यांना रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की,"कसला वाघ्या, ते कुत्रं बघा. भारतात कधी तुम्ही इतक्या लांब कानाचं कुत्रं कधी पाहिलं आहे का? ही सगळी ब्रिटिशांची कुत्री होती ना, ती आली. ही कुत्री ब्रिटीश असेल. दणका देऊन, फेकून द्यायचं. त्यात एवढा काय विचार करायचा". दरम्यान यावेळी त्यांनी राजभवनात शिवस्मारक उभारायला हवं असं मतही मांडलं. राज्यपालांना राहण्यासाठी इतकी मोठी जागा कशाला लागते? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की,"राज्यपाल भवनाची जागा जवळपास 48 एकर आहे. त्या जागेत शिवस्मारक व्हावं. एखाद्या राज्यपालाला राहण्यास किती जागा लागते? 48 एकर म्हणजे थोडी जागा नाही. आणि अरबी समुद्राला लागूनच आहे. त्या ठिकाणी शिवस्मारक व्हावं यासंदर्भात मी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्याची त्यांनी घोषणा करावी"."एका दृष्टीकोनातून आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केलं असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. तीदेखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं", असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत. उदयनराजे यांच्या यांच्या या वक्तव्याचा समाचार ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी घेतला आहे."जे सातारचे महाराज आहेत त्यांना महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1948 साली भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली यावरही आक्षेप आहे. एक नवा शोध उदयनराजे यांच्या माध्यमातून लागत आहे. यासाठी सगळे इतिहासतज्ज्ञ, संशोधक त्यांच्यासमोर फेल ठरले आहेत. उदयनराजे यांनी जो गौप्यस्फोट केला आहे हा महाराष्ट्राचा सामाजिक, शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याला धक्का देणारा आहे," असं ते उपहासात्मकपणे म्हणाले आहेत.महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Raigad Waghya Dog वाघ्या कुत्रा उदयनराजे भोसले

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

रीलबाज अधिकारी, पोलिसांवर कारवाई होणार? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली महत्वाची माहितीरीलबाज अधिकारी, पोलिसांवर कारवाई होणार? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली महत्वाची माहितीDevendra Fadanvis: परिणय फुकेंच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. फडणवीस काय म्हणाले वाचा सविस्तर
Read more »

किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी; कोणी आणि का केलेय ही मागणी?किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी; कोणी आणि का केलेय ही मागणी?किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे.
Read more »

वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या वादात होळकरांच्या वंशजांची उडी; म्हणाले, संभाजीराजे...वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या वादात होळकरांच्या वंशजांची उडी; म्हणाले, संभाजीराजे...Raigad Waghya Dog Memorial : रायगडावरील समाधीचा होळकरांशी नेमका संबंध कधी अन् कसा आला? वंशजांनी उलटली इतिहासाची पानं
Read more »

'...तर 1 मे ला आम्ही 'वाघ्या'चा पुतळा काढणार', संभाजी ब्रिगेडचा इशारा; म्हणाले, 'संभाजी भिडे...''...तर 1 मे ला आम्ही 'वाघ्या'चा पुतळा काढणार', संभाजी ब्रिगेडचा इशारा; म्हणाले, 'संभाजी भिडे...'Waghya Dog Memorial Controversy: संभाजी भिडेंनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीला हटवण्याच्या मागणीला विरोध करत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर संभाजी ब्रिगेडने या वादात उडी घेतली आहे.
Read more »

जिंकताना धोनी वर फलंदाजीला येतो गरज असताना 9 व्या क्रमांकावर! चाहते संतापले; हर्षा भोगलेही म्हणाले..जिंकताना धोनी वर फलंदाजीला येतो गरज असताना 9 व्या क्रमांकावर! चाहते संतापले; हर्षा भोगलेही म्हणाले..Dhoni At Number 9: चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरुच्या संघाने तब्बल 17 वर्षानंतर पराभूत केलं. या सामन्यामध्ये चेन्नईच्या संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Read more »

पोलिसांची कमाल! फक्त महिलेच्या नाकावरुन हत्येचा अख्खा गुन्हा उलगडला, आरोपीचा प्लॅन फसलापोलिसांची कमाल! फक्त महिलेच्या नाकावरुन हत्येचा अख्खा गुन्हा उलगडला, आरोपीचा प्लॅन फसलादिल्लीत एका व्यावसायिकाने पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह गटारात फेकून दिला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून, आरोपीला अटक केली आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 18:25:10