Maharashtra Weather News : मान्सून येणार हे तर निश्चित. मात्र त्याआधी हवामान वाढवणार चिंता. असे काही बदल होणार की म्हणाल पुरे झाला हा निसर्गाचा कोप!
Maharashtra Weather News : मान्सून येणार हे तर निश्चित. मात्र त्याआधी हवामान वाढवणार चिंता. असे काही बदल होणार की म्हणाल पुरे झाला हा निसर्गाचा कोप!ताशी 50 ते 60 किमी इतक्या वेगानं वारे वाहतील: अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमानास सुरुवात झाली असून, या वाऱ्यांचा एकंदर वेग पाहता यंदाच्या वर्षी केरळात हे वारे मे महिन्यातच दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मान्सूनचं आगमन ठरल्याप्रमाणं होत असतानाच इथं महाराष्ट्राच मात्र हवामान बदलानी नागरिकांच्या आणि प्रामुख्यानं बळीराजाच्या चिंतेत भर टाकली आहे. पुढील 24 तासांसाठी राज्याच्या पश्चिम, मध्य आणि विदर्भ क्षेत्रातील काही भागांना वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या भागात गारपिटीचाही तडाखा बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं सातारा आणि कोल्हापूर इथं जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, पुण्यात आकाश अंशत: ढगाळ असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अरबी समुद्राच्या मध्यापासून ते थेट गुजरातपर्यंत आणि मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याच कारणानं मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही आकाश झाकोळलेलं दिसून येत आहे. तर, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भाच्या बहुतांश भागांवरही या वादळी पावसाची वक्रदृष्टी असेल असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं देत नागरिकांना सतर्क केलं आहे.देश स्तरावर केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या भागांसह उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यादरम्यान ताशी 50 ते 60 किमी इतक्या वेगानं वारे वाहतील असाही इशारा देण्यात आला आहे. देशाच्या दक्षिणेकडे 11 ते 15 मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस जोर धरणार असून, त्यामुळं तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशी राज्य प्रभावित होतील. सध्या मोसमी वारे निकोबार बेटांवर दाखल झाले आहेत. ज्यामुळं 27 मेपर्यंत मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचणार असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्य म्हणजे मागील 17 वर्षांत प्रथमच मान्सून 4 दिवस आधी केरळात येणार असून, 6 जूनपासून मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवास सुरू होण्यास पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. ज्यामुळं यंदा तीन दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल होईल. तत्पूर्वी मात्र वादळी पाऊस आणि गारपीटसदृश्य वातावरणामुळं मान्सूनची पार्श्वभूमी तयार होईल असं म्हणणं गैर नाही.भविष्य
Rain Strong Wind Haistorm Unseasonal Rain Mumbai Winter Temprature Unseasonal Rain Hailstorm Cold Wave Winter Vibes Maharashtra Konkan Vidarbha Marathwada Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्रात मोठा शिक्षक भरती घोटाळा; 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होणार?झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे. नागपूर जिल्ह्यात 580 बोगस शिक्षक नियुक्तीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बोगस शिक्षक भरतीप्रकरणी नागपूर पोलिसांचं पथक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात चौकशीसाठी गेलं. तिथे त्यांनी उपसंचालक उल्हास नरड यांच्या कार्यालयाची झडतीही घेतली.
Read more »
महाराष्ट्रावर अवकाळी संकट! 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता, तर उन्हाची काहिली...Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काय आहे हवामान विभागाचा अंदाज
Read more »
मुंबई, उपनगरसह ठाण्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरीमुंबई, उपनगरासह ठाण्यात अचानक अवकाळी पावसाने एन्ट्री मारल्यामुळे सर्वसामान्यांची धावपळ झाली. उपनगरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या.
Read more »
गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊसMaharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील 24 तासांपासून बहुतांश भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली आणि नागरिकांचा गोंधळच उडाला.
Read more »
पुढील 24 तासांमध्ये थैमान! स्टेटसमध्ये फोटो पोस्ट करताय तो हा मान्सून नाही; या वादळी पावसाला म्हणायचं तरी काय?Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Read more »
Monsoon 2025 : तणावग्रस्त परिस्थितीत सुखावणारी बातमी; मान्सून ‘या’ दिवशी केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी?Monsoon 2025 : यंदाच्या वर्षी उकाड्यानं देशाच्या बहुतांश भागांमध्ये नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पाडली. मात्र आता काही हा उकाडा फार दिवस तग धरणार नाही, कारण आता चाहूल लागलीये मान्सूनची...
Read more »
