Smriti Mandhana: भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना पलाश मुच्छलशी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसली. यावेळी तिच्यासोबत हरमनप्रीत कौरसुद्धा होती. यावेळी स्मृतीने फारच सूचक विधान केले.
Smriti Mandhana Public Video: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना अलीकडेच एका विशेष कार्यक्रमात प्रथमच सार्वजनिकरीत्या दिसली. तिच्या वैयक्तिक आयुष्यात पलाश मुच्छलसोबतचे नाते तुटल्यानंतर हा तिचा पहिलाच सार्वजनिक सहभाग होता.
कार्यक्रमात तिच्या सोबत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील उपस्थित होती. दोघींनीही भारतीय संघातील अनुभव, मानसिक तयारी, जर्सीचे महत्त्व आणि संघातील वातावरण अशा अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.काय म्हणाली स्मृती? कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री व होस्ट मंदिरा बेदी यांनी केले. संवादादरम्यान स्मृती मंधानांनी भारतीय जर्सीच्या बंधाची, तिच्यातील भावना आणि तिच्यातून मिळणाऱ्या उर्जेची सविस्तर चर्चा केली. ती म्हणाली की, क्रिकेट तिच्या आयुष्यातील केंद्रबिंदू आहे. इतर कोणतीही गोष्ट तिला क्रिकेटइतकी आनंद, प्रेम, समाधान किंवा ओळख देऊ शकत नाही. पुढे स्मृती म्हणाली की, “मी नेहमीच सांगते क्रिकेट हे माझं पाहिलं आणि शेवटचा प्रेम आहे. मैदानावर उतरते तेव्हा सगळ्या चिंता, सगळ्या वैयक्तिक गोष्टी, सगळा ताण आपोआप कमी होतो. कारण त्या क्षणी महत्त्वाचं असतं ते फक्त भारतासाठी खेळणं.”भारतीय जर्सीबद्दल केलं प्रेम व्यक्त ती पुढे म्हणाली की, भारतीय जर्सी घालणे हा फक्त खेळाचा भाग नसतो; ती कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा, आशा आणि विश्वास यांचे प्रतीक असते. “जेव्हा मी जर्सी घालते तेव्हा अचानक जबाबदारीची जाणीव वाढते. मला असं वाटतं की माझ्या खांद्यावर देशाचा भार आहे आणि म्हणूनच प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरतो.” VIDEO | Indian cricketer Smriti Mandhana says, I dont love anything more than cricket, wearing Indian jersey gives the motivation and keeps all problems aside. pic.twitter.com/CMFFA3A1Nv— Press Trust of India December 10, 2025संघातील वातावरण, चर्चा आणि मतभेदकार्यक्रमादरम्यान मंदिरा बेदी हिने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की, टीममध्ये कधी मतभेद होतात का? आणि झाले तर ते सोडवतो कोण? स्मृती मंधानांनी या प्रश्नाला अतिशय प्रामाणिक आणि सकारात्मक उत्तर दिलं. ती म्हणाली की, भारतीय महिला संघामध्ये प्रत्येक खेळाडू देशासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करायची तळमळ घेऊनच मैदानात उतरते. त्यामुळे वेगवेगळ्या मते मांडली गेली, विविध स्ट्रॅटेजी सुचवल्या गेल्या तरी त्याला मतभेद मानता येत नाही.ती म्हणाली , “ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा कोणतंही मोठं सामने असोत चर्चा नक्की होतात. कधी आम्ही प्लेइंग-11 ठरवताना, कधी टॉस जिंकल्यावर काय करायचं यावर, तर कधी फील्ड सेटिंगवर. सर्वांकडे विजयाचा वेगळा दृष्टीकोन असतो. हे मतभेद नसून संघाची ताकद आहे. कारण विविध मतांमधूनच सर्वोत्तम निर्णय घेता येतो.”स्मृती आणि हरमनप्रीतचे नातेस्मृतींनी हरमनप्रीत कौरसोबतच्या नात्याबद्दलही सांगितले. ती म्हणाली की, दोघींमध्ये इतकी पारदर्शकता आहे की त्या एकमेकींना मनमोकळेपणाने “नाही” म्हणू शकतात. “कधी कधी मी हरमनकडे जाऊन सांगते‘आपण हा बदल केला पाहिजे.’ आणि अनेकदा ती माझं मत स्वीकारते, तर काहीवेळा उलट मला सांगते की दुसरा पर्याय चांगला आहे. पण या दोन्ही गोष्टींमध्ये कुठेही अहंकार किंवा वाद नसतो.”तिच्या मते, वास्तविक वाद तोच ज्यात स्वार्थ असतो. पण भारतीय महिला संघात प्रत्येक खेळाडूची प्राथमिकता एकच असते ,भारतासाठी विजय.FAQ1. स्मृती मंधाना क्रिकेटबद्दल काय म्हणाली?स्मृती मंधाना म्हणाली की क्रिकेट हेच तिचे पहिले प्रेम आहे आणि तिला क्रिकेटपेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट प्रिय नाही. जर्सी घातली की तिला प्रेरणा मिळते आणि सर्व तणाव दूर होतात.2. भारतीय जर्सी घालण्याबद्दल स्मृतीचे मत काय?तिच्या मते भारतीय जर्सी घालणे म्हणजे कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणे. जर्सी घातल्यावर जबाबदारीची भावना वाढते आणि खेळाकडे अधिक एकाग्रतेने पाहावे लागते.3. संघातील ड्रेसिंग रूममध्ये मतभेद होतात का?स्मृतीच्या मते चर्चा होतात पण ते मतभेद नसतात. सर्व खेळाडूंची एकच इच्छा असते, देशासाठी विजय. त्यामुळे वेगवेगळ्या मतांना ते सकारात्मक दृष्टीने घेतात.
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Smriti Mandhana To Get Married Soon: বিয়ের পিঁড়িতে ন্যাশনাল ক্রাশ স্মৃতি মন্ধানা, বলিউডের হেভিওয়েটের জন্যই ভাঙলেন বাকিদের হৃদয়...Indian cricketer Smriti Mandhana is getting married, do you know who the groom is Bollywood heavyweight
Read more »
Smriti Mandhana: রেকর্ড গড়ে বিশ্বকাপে হাতেই এবার বিয়ের পিঁড়িতে সেনসেশন স্মৃতি! পাত্র কে, কবে বিয়ে... সব ফাঁস...After World Cup Win, Smriti Mandhana wedding is fixed with composer Palash Mucchal on November 20
Read more »
Smriti Mandhanas Wedding: স্থগিত স্মৃতির বিয়ে, পলাশের বিরুদ্ধে প্রতারণার অভিযোগ! প্রকাশ্যে গোপন চ্যাট...Palash Muchhal Cheat On Smriti Mandhana Chat goes viral amid postpone of Smriti Mandhana Wedding
Read more »
Smriti Mandhana and Palash Muchhal Wedding: ৪ দিন আগেই চুমু এক মহিলাকে! বিয়ের দিন সকালে পালিয়ে যান পলাশ মুচ্ছল! হাসপাতালে ভর্তিও নাটক! বিয়ে পুরোপুরি বাতিল স্মৃতির?Smriti Mandhana Wedding Postponed: Smriti Mandhana Fiance Palaash Muchhal Allegedly Caught Kissing A Woman, Ran Away On Wedding Day, what happened on the night before wedding day, wedding totally cancelled?
Read more »
Smriti Mandhana Wedding: হাসপাতাল থেকে ছাড়া পেলেন স্মৃতির বাবা! মেয়ের বিয়ে নিয়ে...Smriti Mandhana Wedding: Smriti Mandhana father discharged from Hospital, but no update about marriage
Read more »
Smriti Mandhana Wedding: এই পরিস্থিতি থেকে বেরিয়ে আসা আমার জন্য সহজ নয়, পলাশের প্রতারণা নিয়ে মুখ খুললেন কোরিওগ্রাফার...Smriti Mandhana Sangeet Choreographer Nandika on cheating claims after Smriti Palaash wedding postponed
Read more »
