अहिल्यादेवींच्या जयंतीचं अजित पवारांना निमंत्रण देणार नाही अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे
'मी अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार नाही,' भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य, कारण विचारलं तर म्हणाले 'किरकोळ.'Updated: Apr 16, 2025, 02:33 PM IST भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार नकोसे झाले आहेत का अशी चर्चा सुरु झाली आहे.
'मी अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार नाही,' भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य, कारण विचारलं तर म्हणाले 'किरकोळ...'Updated: Apr 16, 2025, 02:33 PM IST भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार नकोसे झाले आहेत का अशी चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण अहिल्यादेवींच्या जयंतीचं अजित पवारांना निमंत्रण देणार नाही अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी हा सरकारी कार्यक्रम नसल्याचा युक्तिवाद केला आहे. मात्र तरीही त्यांच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 300 व्या जयंतीनिमित्त तब्बल 50 हजार धनगरी ढोल वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे. पुण्यात मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार आहे. अमित शाह यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. कोणाकोणाला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं हे त्यांनी सांगितलं .मात्र यात अजित पवारांचं नाव त्यांनी घेतलं नाही. याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आपण अजित पवारांना बोलावणार नसल्याचं स्पष्ट केलं. "अमित शाहजी येणं आम्हाला अपेक्षित आहेत, तसंच देवाभाऊ आहेत. एकनाथ शिंदे यांना आम्ही निमंत्रण देणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा यांनाही बोलावणार आहोत. सांस्कृतिक मंत्री महोदयांना आणि इतरांनाही बोलावणार आहे," असं गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. अजित पवारांना बोलावलं नाही का? असं विचारलं असता त्यांनी नाही असं उत्तर दिलं.यामागील कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की,"हा सरकारचा नाही, तर धनगरांचा कार्यक्रम आहे. धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे. सरकारची कोणतीही मदत घेऊन आम्ही हा कार्यक्रम करत नाही. हा पूर्णपणे धनगर समाजाचा कार्यक्रम आहे". आम्ही एक रचनात्मक कार्यक्रम करत आहोत. ही किरकोळ बाब आहे. तुम्ही उगाच राजकीय प्रश्न विचारु नका असं म्हणत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.
Gopichand Padalkar Ajit Pawar NCP
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सांगली जिल्ह्यात अजितदादांची पावर वाढणार! चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणारसांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.
Read more »
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नदीच्या मधोमध असलेलं रहस्यमयी बेट! याचा शोध कधी लागला कुणालाच माहित नाहीमहाराष्ट्रात एक अनोखं बेट आहे जे समुद्रात नाही तर नदी पात्रात आहे.
Read more »
...तर रोहित शर्माला रोज 20 किलोमीटर पळायला लावेन; योगीराज सिंग असं का म्हणाले?Rohit Sharma Run 20 KMs Everyday: रोहित शर्मा आणि विराट कोहलीला वारंवार वगळण्यासंदर्भातील चर्चेवरुन संताप व्यक्त करताना दोघांची पाठराखण केली आहे.
Read more »
IPL 2025 : प्रथम स्थानी असलेली SRH थेट टॉप-5 मधून बाहेर, पंतच्या टीमने पलटला संपूर्ण Points Tableलखनऊ सुपर जाएंट्सच्या विजयाने सनरायजर्स हैदराबादच्या केवळ पहिल्या स्थानालाच धक्का बसला नाही तर ते थेट टॉप 5 मधून बाहेर गेले आहेत.
Read more »
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार संभाजीराजे नाही तर 'या' व्यक्तीने केले; विश्वास पाटील यांनी सांगितला इतिहाससंभाजीराजे यांनां छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार का करता आले नाही? कुणी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार? विश्वास पाटील यांनी सांगितला इतिहास.
Read more »
साखरपुडा जय पवारांचा चर्चा मात्र रोहित पवारांच्या सासऱ्यांची; 123 कुटुंबांनी एकत्र येऊन विकसित केलेले महाराष्ट्रतील एकमेव शहरमहाराष्ट्रत असे शहर आहे जे सरकारने नाही 123 कुटुंबांनी एकत्र येऊन विकसित केले आहे. आमदार रोहित पवार हे या शहराचे जावई आहेत.
Read more »
