Pahalgam Terrorist Attack Hindu Muslim Divide: पुलवामा येथे सैन्य तुकड्यांना विमान उपलब्ध करून दिले नाही व पहलगाम येथे हजारो पर्यटकांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडले.
Pahalgam Terrorist Attack Hindu Muslim Divide:"पुलवामा येथे सैन्य तुकड्यांना विमान उपलब्ध करून दिले नाही व पहलगाम येथे हजारो पर्यटकांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडले."काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळीबार केल्याचा दावा केला जात आहे.
या हल्ल्यातून बचावलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी धर्म विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचं म्हटलं आहे. यावरुनच सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. या दाव्यांमध्ये सदर दहशतवादी हल्ल्याला हिंदू आणि मुस्लीम रंग दिला जात असल्याचं दिसून येत आहे. याच मुद्द्यावरुन आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलवर निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वपक्षीय बैठकीवरुनही टीका केली आहे."मोदी हे पहलगाम हल्ल्याने हादरले आहेत व सौदी अरेबियाचा दौरा टाकून ते परत आले. राहुल गांधी अमेरिका दौरा टाकून परत येत आहेत. सरकारने ‘पहलगाम’ हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावली हे नेहमीचेच आहे. जे सरकार एरव्ही विरोधकांचे आवाज दडपत असते, कश्मीरपासून मणिपूरपर्यंत कोणत्याच विषयांवर संसदेत चर्चा करायला तयार नाही ते सरकार सर्वपक्षीय बैठक बोलावून काय दिवे लावणार?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं 'सामना'मधून उपस्थित केला आहे."देशाचे गृहमंत्री राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. जनतेच्या जीविताचे रक्षण करण्याबाबत ते अपयशी ठरले. त्यांना हटवा ही सर्वपक्षीय मागणी आहे. त्या मागणीचा विचार सरकार करणार नसेल तर बैठकांचे फार्स हवेतच कशाला? 370 कलम हटवले हे बरेच झाले, पण जम्मू-काश्मीरचा संपूर्ण राज्याचा दर्जा काढून काय मिळवले याचे उत्तर सरकार देणार नाही," अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. "सरकारने प्रचंड सैन्यकपात केली, संरक्षण खात्याच्या आर्थिक तरतुदीत घट केली. हा खेळ खतरनाक आहे. पुलवामा येथे सैन्य तुकड्यांना विमान उपलब्ध करून दिले नाही व पहलगाम येथे हजारो पर्यटकांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडले. आता हल्ला झाला व निरपराध माणसे मारल्यावर लोकांत संताप उसळल्यावर सरकार धावपळ करीत आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे."पहलगामचा हल्ला अमानुष आहे, पण या प्रकरणात हिंदू-मुसलमान संघर्षाची काडी लावणे हे त्यापेक्षा अमानुष आहे. पहलगाम येथील गावकऱ्यांनी जखमी व त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ मदत सुरू केली. सईद हुसैन शाह या स्थानिक तरुणाने दहशतवाद्यांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने अतिरेक्याच्या हातातून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवाद्यांनी त्याला गोळय़ा घालून ठार केले. ‘हे लोक आपले पाहुणे आहेत, त्यांना मारू नका,’ अशी विनवणी सईद करीत होता. अखेर त्यालाही प्राण गमवावे लागले. सईद हिंदू नव्हता तरीही त्याला अतिरेक्यांनी मारले. पहलगाम व आजूबाजूस अडकलेल्या पर्यटकांना स्थानिकांनी मदत केली, असे सर्व पर्यटक सांगत असताना भाजपचा ‘आयटी’ सेल या घटनेतही हिंदू-मुसलमानांचा चुना लावतो हे धक्कादायक आहे," असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल केला आहे.लढाई पाकिस्तानविरोधात आहे, भारतीय राष्ट्रप्रेमी मुसलमानांविरोधात नाही "निवडणुकीत भाजपला मतदान करा, मोदी यांनाच पंतप्रधान करा व तसे केल्यानेच ‘बदला’ पूर्ण होईल, पाकडे बिळात लपतील, असे ज्यांना वाटते त्या सगळ्यांपासून देशाला खरा धोका आहे. बदला पाकिस्तानचा व दहशतवाद्यांचा घ्यायचा आहे. देशातील मुसलमानांना आव्हान देऊन, त्यांच्या मशिदी-मदरशांवर हल्ले करून पहलगामचा बदला पुरा होईल काय? काही लोकांना तसे करण्याची खुमखुमी जडली आहे. लढाई पाकिस्तानविरोधात आहे, भारतीय नागरिक असलेल्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांविरोधात नाही," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे."पहलगाममधील हल्ला हा फक्त पर्यटकांवर झालेला नसून आमच्यावर झाला. आम्ही त्यात घायाळ झाल्याची मानवी भावना कश्मिरी जनतेने व्यक्त केली, याची दखल घ्यावी लागेल. आपली लढाई पाकिस्तानशी आणि दहशतवादी टोळ्यांशी आहे. या लढाईत कोणी भारतीय मुसलमान आणि कश्मिरी जनतेला बदनाम करणार असतील तर देशातील समस्या त्यांना सोडवायच्या नाहीत व पुलवामाप्रमाणे पहलगामचेही राजकारण करायचे आहे, असेच मानावे लागेल. सरकारने आता फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करावा. हिंदू-मुसलमान आपसांत काय ते बघून घेतील," असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे.विश्व
Pahalgam Jammu Kashmir Attack Pahalgam Terrorist Attack Marathi News जम्मू काश्मीर पहलगाम जम्मू काश्मीर हल्ला पहलगाम दहशतवादी हल्ला मराठी बातम्या PM Modi Amit Shah Ajit Doval
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पर्यटकों पर हमला पाक की सेना का काम, जम्मू कश्मीर के पूर्व CM ने हिंदू-मुस्लिमों से की ये अपीलPahalgam Terror Attack पर Former CM Ghulam Nabi Azad ने हिंदू-मुस्लिम से क्या कहा?
Read more »
Pahalgam Terror Attack Live: सर्वदलीय बैठक से पहले गृह मंत्री अमित शाह कर सकते हैं अहम बैठकPahalgam Terror Attack Live Updates: all party meeting on pahalgam attack today pm modi amit shah rajnath singh । सर्वदलीय बैठक से पहले गृह मंत्री अमित शाह कर सकते हैं अहम बैठक । देश
Read more »
Pahalgam Attack: 'अमित शाहांच्या मस्तीमुळे...', ठाकरेंची सेना आक्रमक; म्हणाले, 'हिंदू मेल्यावर...'Pahalgam Terror Attack: कश्मिरी पंडितांची घर वापसी झाली नाहीच, उलट उरलेले हिंदूही पलायन करीत आहेत, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Read more »
Pahalgam Terrorist Attack: भारत ने पाकिस्तानी राजनयिकों को किया तलब, सौंपा पर्सोना नॉन ग्राटा नोटIndia gives Persona non grata to Pakistani Diplomats amid Pahalgam Terrorist Attack Pahalgam Terrorist Attack: भारत ने पाकिस्तानी राजनयिकों को किया तलब, सौंपा पर्सोना नॉन ग्राटा नोट देश
Read more »
Pahalgam Terror Attack के बाद भारत में Pakistan का X Account ब्लॉक, Embassy के बाहर भी सन्नाटाPahalgam Terror Attack के बाद भारत में Pakistan का X Account ब्लॉक, Embassy के बाहर भी सन्नाटा Pahalgam PakistanXAccountBlocked PakistanEmbassy AmitShah jammuattack terrorattack jammukashmir pmmodi rahulgandhi amitshah
Read more »
Pahalgam Attack: जम्मू-कश्मीर जाएंगे राहुल गांधी; हिंदू संगठन करेंगे देशव्यापी प्रदर्शन; दिल्ली के 700 बाजार बंदRahul Gandhi Kashmir Visit RSS Nation protest hindu saints on Jantar Mantar Pahalgam Attack: जम्मू-कश्मीर जाएंगे राहुल गांधी; हिंदू संगठन करेंगे देशव्यापी प्रदर्शन; दिल्ली के 700 बाजार बंद
Read more »
