Supriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर Supriya Sule on Ajit Pawar : मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं.
पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार म्हणाले आहेत.मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी देणं चूक होती अशी कबुली दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात आगामी काळातील राजकारणावर याचे पडसाद उमटणार का? अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी यावर जास्त भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यांना दोन शब्दांत यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले होते. जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी आपली नाराजी जाहीर करत शरद पवारांची साथ सोडली आणि महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर अनेक गंभीर आरोप केले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिलं होतं. यामुळे लोकसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र असेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यातच सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात निवडणुकीत उतरवल्याने बारामती मतदारसंघाची लढत हायव्होल्टेज ठरली होती. मात्र आता अजित पवारांनी ही आपली चूक होती असं म्हटलं आहे.अजित पवारांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न विचारलं असता त्यांनी कबुली देत म्हटलं की, “सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली".पुढे ते म्हणाले,"मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं”.सुप्रिया सुळेंना प्रसारमाध्यमांनी यावर प्रतिक्रिया विचारली असता त्या रामकृष्ण हरी इतकंच म्हणत जास्त भाष्य करणं टाळलं."एकतर मी हे विधान ऐकलेलं किवा वाचलेलं नाही. तुमच्याकडूनच मी हे ऐकत नाही. त्यामुळे रामकृष्ण हरी".'माझ्याकडून चूक झाली,' सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अजित पवारांनी दिली कबुली; 'राजकारण घरात...'
Devendra Fadnavis Sunetra Pawar Supriya Sule NCP Sharad Pawar
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचलीAjit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
Read more »
'76000 कोटी रुपये...'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तरNirmala Sitharaman On Not Taking Maharashtra Name: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचा साधा उल्लेखकही केला नाही या आरोपावर अर्थमंत्र्यांनी थेट राज्यसभेत उत्तर दिलं आहे.
Read more »
Maharastra Politics : पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?Maharastra Politics : अजित दादांचा एक आमदार थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं एकच खळबळ उडालीय. खरंच अजित पवार गटाला धक्का बसणार की काही वेगळं कारण होतं. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..
Read more »
'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोपAnil Deshmukh Uddhav Thackeray Jail: फडणवीसांनी ठाकरेंबरोबरच अजित पवारांच्या मुलाला अडकवण्यासाठी कट केला होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Read more »
महाराष्ट्रासह इतर राज्यांना काहीच का दिलं नाही? अर्थमंत्री म्हणाल्या, ‘काँग्रेसने 2004 ला असंच…’Nirmala Sitharaman On Budget allocation : केंद्रिय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला आणि इतर राज्यांना काहीच मिळालं नाही, असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना अर्थमंत्र्यांनी खणखणीत उत्तर दिलं.
Read more »
अजित पवार अॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णयAjit Pawar : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून उभं करण्यात आलं होतं. पण पूर्ण ताकद लावल्यानंतरही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.
Read more »
