'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन हल्लाबोल

Uddhav Thackeray Shivsena News

'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन हल्लाबोल
Slamsm BJPPM ModSanjay Rathod
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 134 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 74%
  • Publisher: 63%

PM Modi Sanjay Rathod Pooja Chavan: देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती, अशी आठवण ठाकरेंच्या पक्षाने करुन दिली आहे.

PM Modi Sanjay Rathod Pooja Chavan :"देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती," अशी आठवण ठाकरेंच्या पक्षाने करुन दिली आहे.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान भाषणात केलेल्या विधानांवरुन कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

शनिवारी पंतप्रधान मोदींनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर निशाणा साधला. मात्र या भेटीदरम्यान मोदींसोबत यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोडही उपस्थित होते. मोदींनी भाषणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भात केलेल्या विधानांचा समाचार घेतानाच राठोड यांच्या मुद्द्यावरुन ठाकरेंनी टीकास्र सोडलं आहे."महाराष्ट्रात ललित पाटील प्रकरण गाजले. या ललित पाटीलशी ‘मिंधे-फडणवीस’ मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा थेट संबंध आहे. ललित पाटीलला ससून इस्पितळातून पळून जाण्यासाठी या मंत्र्यांची मदत होती. महाराष्ट्राचे मोदीपुरस्कृत सरकार ‘ड्रग्ज’च्या पैशांनी बरबटले आहे व मोदी-शहा या सरकारचे संरक्षक कवच बनले आहेत, पण पंतप्रधान मोदी दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान शिकवत आहेत," असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे. "अकोल्यातील सभेत त्यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या पैशांतून काँग्रेस निवडणूक लढवत आहे. दिल्लीत हजारो कोटींचे अमली पदार्थ पकडण्यात आले. त्या प्रकरणी मुख्य आरोपी काँग्रेसचा एक नेता आहे. युवा वर्गाला व्यसनाच्या नादी लावून आलेल्या पैशांमधून काँग्रेसला निवडणुका लढवायच्या आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य गंभीर आहे व या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास व्हायलाच हवा. पंतप्रधानांना देशातील युवकांच्या व्यसनाधीनतेची चिंता आहे हे ऐकून बरे वाटले, पण तरुण वैफल्यग्रस्त होऊन व्यसनाधीन का बनत आहे? याचे उत्तरही पंतप्रधानांनी द्यायला हवे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे."मोदी काल पोहरादेवीत होते. त्या व्यासपीठावर मिंधे सरकारमधील एक मंत्री संजय राठोड मोदींच्या चरणाशी बसले होते. या महाशयांवर खून, विनयभंग, बळजबरी असे आरोप पूजा चव्हाण या तरुणीने केले व एक दिवस तिने आत्महत्या केली. ही नक्की हत्या की आत्महत्या, हे रहस्य आहे. देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती. राठोड यांचे त्या तरुणीकडे जाणे-येणे होते, असे आरोपही तेव्हा झाले होते. त्या महिलेच्या घरात नशेचे अनेक साहित्य मिळाले व तेच महाशय मंत्री म्हणून काल मोदींच्या चरणाशी बसले. यास ढोंग नाही तर काय म्हणायचे?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.हरयाणाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन महात्मा राम रहिमने केले, त्यावर मोदी... "हरयाणा निवडणुकीच्या प्रचारात मदत व्हावी म्हणून मोदी सरकारने महात्मा राम रहिम यास तुरुंगातून खास सुट्टी दिली. राम रहिमवर खून, बलात्कार, धमक्या असे आरोप आहेत. त्याच्या आश्रमांवर धाडी पडल्या, त्यात नशेचे सामान मोठ्या प्रकरणात सापडले, पण या महात्म्यास आतापर्यंत ‘भाजप’ मेहेरबानीने वारंवार मोठी ‘सुट्टी’ देण्यात आली. हरयाणाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन महात्मा राम रहिमने केले. त्यावर मोदी यांचे काय म्हणणे आहे?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.Maharashtra Weather News : मान्सून 2.0; वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, परतीच्या पावसानं वाढवली चिंतामहाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रणनिती! राज ठाकरे यांचा मास्...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Slamsm BJP PM Mod Sanjay Rathod Pooja Chavan Refrance

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

गणपति पर्व पर कीजिए भगवान श्री गणेश के लाइव दर्शनगणपति पर्व पर कीजिए भगवान श्री गणेश के लाइव दर्शनGanesh Chaturthi 2024: आज देशभर में गणेश पूजा की धूम मची हुई है। देश के अलग-अलग इलाकों से गणेश पूजा Watch video on ZeeNews Hindi
Read more »

मुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणारमुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणारLadki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंब भेट कार्यक्रमाला आजपासून सुरूवात झालीये. राज्यभर हा उपक्रम राबवला जातोय. आज पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या कीसननगरमधील लाभार्थी कुटुंबाला भेट दिली.
Read more »

मुली घरात असतानाच बापाला संपवलं; प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटामुली घरात असतानाच बापाला संपवलं; प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटारात्री 1 वाजता बेल वाजली, दार उघडल्यावर मारेकऱ्यांनी राहुलची हत्या केली. नंतर घरातील दागिने आणि रोकड किंमती वस्तूंची चोरी केली. पण ही हत्या चोरीसाठी नसून पत्नीने...
Read more »

DNA: दुर्गा पूजा से चिढ़ती हैं ममता बनर्जी?DNA: दुर्गा पूजा से चिढ़ती हैं ममता बनर्जी?ममता बनर्जी के राज में दुर्गा पूजा को लेकर विवाद बढ़ गया है। पश्चिम बंगाल के नादिया में दुर्गा पूजा Watch video on ZeeNews Hindi
Read more »

रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..Railway Bonus 2024: रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
Read more »

नवरात्रि दिन 3: वाराही अम्मा का पूजननवरात्रि दिन 3: वाराही अम्मा का पूजननवरात्रि के तीसरे दिन वाराही अम्मा की पूजा की जाती है। इस दिन कन्याकल्याणी रूप में भी अम्मा की पूजा होती है।
Read more »



Render Time: 2026-04-02 06:00:05