Pune Mundhwa Land Irregularities Parth Pawar Case: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांचा उल्लेख करत थेट इशारा दिलाय.
Pune Mundhwa Land Irregularities Parth Pawar Case : समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन झी 24 तासने प्रकाशझोतात आणलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात मोठा आरोप केला आहे.
मुंढवा जमीन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. सरकारकडून पुणे कोर्टात मुंढवा जमीन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून याचिका दाखल केली आहे. हा अजित पवार, पार्थ पवार, शीतल तेजवनी यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असं दामनिया यांनी म्हटलं आहे. पार्थ पवारांचं नाव एफआयआरमध्ये हवंमात्र आपण हे होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांविरोधात आपण याचिका दाखल करणार, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार यांचं नाव काल एफआयआरमध्ये यायला पाहिजे. उच्च न्यायालयाने पार्थ पवार यांचं नाव का नाही हे विचारलं आहे, अशी आठवण दमानिया यांनी करुन दिली. सरकारला इशारा देताना अंजली दमानिया यांनी, जी फसवणूक झाली आहे त्याची शिक्षा लोकांना मिळाली पाहिजे, असंही म्हटलं आहे.अधिवेशनावर रोजचा कोट्यवधींचा खर्च होतो आणि आमदार...हिवाळी अधिवेशनामध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनावणे बिबट्यांसंदर्भातील प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी बिबट्याचा ड्रेस परिधान करुन गुरुवारी विधानसभेत दाखल झाले होते. यावरुनही दमानियांनी टोला लगावला आहे. फॅन्सी ड्रेस ,फॅशन शो म्हणायचं का? आमदार काय ड्रेस घालून येत आहेत. अधिवेशनावर एका दिवसाचा 12 ते 13 कोटी रुपये खर्च होत आहे. हे असे ड्रेस घालून येत आहेत. आमदारांची काय बुद्धीमत्ता आहे, असा टोला दमानियांनी लगावला.विरोधी पक्षाने महाराष्ट्रासाठी लढलं पाहिजेपुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात न मांडल्याबद्दलही दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्ष नवीन विषय मांडेल असं वाटतं होतं. ते मांडत नाही. गायरान जमीन, आरोग्य, शिक्षा यावर सरकारने श्वेत पत्रिका काढावी. 2000 ते 2025 कालावधीतील श्वेतपत्रिका काढावी. महसूल विभागकडून इशारा पत्र काढावीत. अनियमितता काढावी आणि दोषींना 24 तासात बडतर्फ करण्याचा आदेश काढावा. गृहखात्याने इशारा पत्र द्यावं. विरोधी पक्षाने महाराष्ट्रासाठी लढावं, असं दमानियांनी म्हटलं आहे.मुख्यमंत्र्यांविरुद्ध कोर्टात जाणारमी कोर्टात जाणार आहे. खारगे समितीकडे तिसरं सबमिशन करणार आहे. त्यानंतर कोर्टात याचिका दाखल करणार. मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचण्याची पाळी आली आहे. 21 कोटी भरण्यास सांगितलं. 42 कोटी सांगितलं. उद्योग विभागाने एफआयआर करून गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. उदय सामंत यांच्याशी बोलणार आहे. कोर्टाची ऑर्डर आणून जप्तीची वसुली करणार, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.शीतल तेजवानीच्या घरावर दोन वेळ कारवाही झाली. रोख रकमेने व्यवहार झाला असावा पण ते दिसत नाही, असंही दमानिया म्हणाल्या.
Mundhwa Land Irregularities Parth Pawar Case Anjali Damania Slams Opposition Party
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Mumbai Water Cut: मुंबईकर ध्यान दें! 12-13 दिसंबर को मुंबई के इन इलाकों में नहीं आएगा पानी, BMC की लिस्ट देखेंमुंबईकरों को आने वाले कुछ दिनों में पानी की किल्लत का सामना करना पड़ेगा। बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (BMC) ने बड़े पैमाने पर पाइपलाइन कनेक्शन का काम शुरू किया है। इसके कारण 12 और 13 दिसंबर को शहर के कई हिस्सों में 24 घंटे पानी बंद करने की घोषणा की...
Read more »
कल का मौसम 12 दिसंबर: दिल्ली समेत 4 शहरों में छाएंगे काले बादल... देश के 13 जिलों में घने कोहरे की चेतावनी13 दिसंबर को दिल्ली, शिमला, मनाली और देहरादून में काले बादल छाए रहेंगे। उत्तर और पूर्वी भारत के 12 शहरों में घने कोहरे की चेतावनी जारी की गई है, जिससे सुबह की यात्रा करने वालों को सावधानी बरतनी होगी। झारखंड, बिहार और यूपी में अगले सप्ताह से मौसम अपना रौद्र रूप...
Read more »
Christmas Vacation: ക്രിസ്മസ് അവധി; ഇത്തവണ അവധി പത്തല്ല 12 ദിവസം, തീയതികള് പ്രഖ്യാപിച്ചുChristmas Vacation: ക്രിസ്മസ് അവധിക്കൊപ്പം വാരാന്ത്യങ്ങളും കൂടി ഉൾപ്പെടുന്നതോടെയാണ് 12 ദിവസത്തെ അവധി ലഭിക്കുക
Read more »
12/12 Portal: 12 दिसंबर सिर्फ एक तारीख नहीं, यह है किस्मत बदलने का गोल्डन गेट, बस करने होंगे ये काम12-12 पोर्टल का दिन 12/12 Portal Significance ऊर्जा और सकारात्मकता का प्रतीक है। इस दिन ध्यान, मेडिटेशन और सकारात्मक सोच से जीवन में नई शुरुआत और सौभाग्य बढ़ता है। आइए इसके बारे में विस्तार से जानते हैं।
Read more »
இன்றைய ராசிபலன்: இந்த 2 ராசிக்காரர்களுக்கு கவனம் தேவை.. ரொம்ப செலவாகும்!December 12 Today Rasi Palan: இன்றைய ராசிபலன் - டிசம்பர் 12, 12 ராசிகளுக்கான பலன்களை இங்கே தெரிந்துக்கொள்வோம்.
Read more »
13 जिलों में बंट गई दिल्ली, अब इन दो इलाकों के लोगों को नहीं काटना पड़ेगा 12 KM का चक्करदिल्ली में अब जिलों की संख्या 11 से बढ़कर 13 हो गई है। सरकार ने क्षेत्र और जनसंख्या को ध्यान में रखते हुए यह फैसला लिया है। पुनर्गठन से लोगों को राहत मिलेगी, क्योंकि कुछ जिलों में कामकाज को लेकर परेशानी हो रही थी। पूर्वी जिले का क्षेत्र निगम के शाहदरा उत्तरी जोन के समान होगा। पुरानी दिल्ली जिला बनने से चांदनी चौक और सदर बाजार की समस्या पर ध्यान...
Read more »
