'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशारा

Virat News

'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशारा
KohliRohitVirat Kohli
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 102 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

T20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.

T20 World Cup: युवराज सिंगने आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही खेळण्याची शक्यता आहे.

सध्याच्या आयपीएल हंगामात दोन्ही खेळाडूंनी आपल्या जबरदस्त खेळीने सर्वांना प्रभावित केलं आहे. गुरुवारी सनरायजर्स हैदराबादविरोधातील सामन्यात विराटने 43 चेंडूत अर्धशतक ठोकलं. मात्र त्याच्या स्ट्राइक रेटवरुन टीका होत आहे. पण असं असलं तरी बंगळुरुचा स्टार फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली गतवर्षीच्या टी-20 वर्ल्डकपपासून या प्रकारात फारसे खेळलेले नाहीत. अफगाणिस्तानविरोधातील मालिकेतून दोघांनी टी-20 मध्ये पुनरागमन केलं होतं. रोहितने यावेळी शतक ठोकलं होतं. पण विराट फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. आगामी टी-20 वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार असून या खेळपट्टींवर विराट आणि रोहित शर्मा हवेत असं बोललं जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगलाही असंच वाटत आहे. दरम्यान यावेळी त्याने योग्य वेळी निवृत्ती घेण्याचा सल्लाही दोन्ही दिग्गजांना दिला आहे.वय वाढू लागल्यानंतर तुम्ही कितीही चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी वयाचीच चर्चा होते असा इशाराच युवराजने दोघांना दिला आहे. बीसीसीआयने आता भविष्यातील संघ उभारणीकडे लक्ष द्यावं असं सुचवताना टी-20 वर्ल्डकपनंतर विराट आणि रोहितने या प्रकारातून बाहेर पडावं असा सल्ला दिला आहे. "तुमचं वय वाढू लागल्यानंतर लोक तुमच्या वयाबद्दल बोलतात. लोक तुमचा फॉर्म विसरुन जातात," असं युवराजने ICC ला सांगितलं."हे दोघे भारतासाठी महान खेळाडू आहेत. त्यांची इच्छा असेल तेव्हा निवृत्ती घेण्याचा त्यांना हक्क आहे," असंही युवराजने म्हटलं. पुढे त्याने म्हटलं आहे की,"मला टी-20 प्रकारात नव्या तरुण खेळाडूंना पाहायला आवडेल. कारण यामुळे अनुभवी खेळाडूंच्या खांद्यावरील ओझं कमी होईल. ते एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळू शकतील. या वर्ल्डकपनंतर अनेक तरुण खेळाडू संघात येऊन पुढील वर्ल्डकपसाठीचा संघ तयार करतील अशी आशा आहे". टी-20 वर्ल्डकप संघ निवडण्यासाठी 1 मे अंतिम तारीख आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडसमिती प्रमुख अजित आगरकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यानंतर 15 सदस्यीय संघाची घोषणा होईल. जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्डकप खेळला जाणार आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. आयपीएलमध्ये काही खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असल्याने निवड समितीसमोर अनेक पर्याय आहेत.मुंबई

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Kohli Rohit Virat Kohli Rohit Sharma Virat Kohli India

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षPHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
Read more »

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
Read more »

'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
Read more »

पालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' कारणासाठी बसचालकांचा आंदोलनाचा इशारापालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' कारणासाठी बसचालकांचा आंदोलनाचा इशाराSchool Bus : पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकाने शाळेबद्दल घेतलेल्या एका निर्णयाच्या विरोधात बसचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Read more »

मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टमुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टMaharashtra Heat Wave: महाराष्ट्रातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Read more »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 21:34:15