'ठरलं म्हणजे ठरलं... इथून पुढं भारत...', ट्रम्प यांनी का केला हा मोठा दावा? रशियाचं नाव घेत जे काही म्हणाते ते तणाव वाढणारं

World News News

'ठरलं म्हणजे ठरलं... इथून पुढं भारत...', ट्रम्प यांनी का केला हा मोठा दावा? रशियाचं नाव घेत जे काही म्हणाते ते तणाव वाढणारं
AmericaIndiaMartahi News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 128 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 106%
  • Publisher: 63%

Donald Trump India Russia : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या राजकीय धोरणांमुळं चर्चेत आले असून, भारताबाबतही त्यांची धोरणं चर्चेचा विषय ठरत आहेत.

Donald Trump India Russia : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असणारं आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय नातं गेल्या काही काळापासून गटांगळ्या खाताना दिसत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळं या तणावात आणखी भर पडू शकते असं म्हटलं जात आहे.

नुकतंच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांची भेट घेतली आणि याच भेटीदरम्यान त्यांनी एक अनपेक्षित दावा केला. भारताविषयी ट्रम्प यांनी दावा करत काय म्हटलं? भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असा दावाच थेट ट्रम्प यांनी झेलेंस्कींसमोर केला. याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची हमी दिल्याचंही वक्तव्य केलं होतं. भारतानं तेल आयात कमी केली असून हे एक मोठं पाऊल असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण आता चीनवरही हेच दबावतंत्र आजमावणार असून, रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी त्यांना भूमिका घ्यायला लावू असाही दावा त्यांनी केला. एकिकडे ट्रम्प जागतिक स्तरावर हे दावे करत असतानाच भारताच्या पररराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मात्र मंत्रालयाच्या वतीनं हे सर्व दावे फेटाळले. मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये सदर मुद्द्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही असं म्हणत हल्लीच्या दिवसांमध्ये या दोन नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून संपर्क साझण्यात आलेला नाही त्यामुळं तेल खरेदीबाबतच्या आश्वासनाचा इथं प्रश्नच येत नाही असं भारताकडून ठामपणे सांगण्यात आलं. भारत आणि रशियाच्या तेल व्यवहारावर ट्रम्प यांची काय हरकत? अमेरिकेच्या भूमिकेनुसार रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यानं मॉस्कोला युक्रेनसोबतच्या युद्धामध्ये आर्थिक सहाय्य होत आहे. चीनकडूनही याचीच पुनरावृत्ती होत असल्यानं ट्रम्प यांनी हरकत दर्शवली होती. पत्रारांनी याच मुद्द्याला अनुसरून जेव्हा ट्रम्प यांना हंगेरीकडून रशियातूनन तेलाची आयात होण्यासंदर्भातील प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी काहीशी सौम्य भूमिका घेतली. हंगेरी एका प्रकारे अडचणीत असून या देशाता स्वत:चा समुद्र नाही, तेलाच्या आयातीसाठी त्यांना पाईपलाईनचाच आधार आहे. ज्यामुळं तेसुद्धा तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांत आहे. दर दिवशी विविध धोरणांवरून आणि प्राख्यानं आता रशियावर ट्रम्प यांचं लक्ष केंद्रीत असल्या कारणानं आंतरराष्ट्रीय राजकारणात आता पुढं या प्रकरणाला नेमकं काय वळम मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. FAQट्रम्प यांनी भारताविषयी काय दावा केला?अमेरिकी राष्ट्राधीक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांच्या भेटीदरम्यान दावा केला की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. भारताने ट्रम्प यांच्या दाव्यावर काय प्रतिक्रिया दिली?भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्रम्प यांचे सर्व दावे फेटाळले. मोदी आणि ट्रम्प यांच्यात तेल खरेदीच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. हल्लीच्या दिवसांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरही संपर्क झालेला नाही, त्यामुळे अशा आश्वासनाचा प्रश्नच येत नाही, असे ठामपणे सांगण्यात आले.ट्रम्प यांची भारत-रशिया तेल व्यवहारावर हरकत का?ट्रम्प यांच्या मते, भारत आणि चीनसारखे देश रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मॉस्कोला युक्रेन युद्धासाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

America India Martahi News Donald Trump Tariff War Russian Oil Trump Zelenskyy India To Stop Buying Russian Oil Trump Repeats Claim रशिया भारत तेल कंपन्या ट्रम्प बातम्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मैं भारत और PM मोदी के बहुत क़रीब हूं...ट्रैरिफ वॉर के बीच बदले डोनाल्ड ट्रंप के सुरमैं भारत और PM मोदी के बहुत क़रीब हूं...ट्रैरिफ वॉर के बीच बदले डोनाल्ड ट्रंप के सुरUS President Donald Trump said this about India amid the tariff war, मैं भारत और PM मोदी के बहुत क़रीब हूं...ट्रैरिफ वॉर के बीच बदले डोनाल्ड ट्रंप के सुर
Read more »

ये भारत का आत्मसम्मान…, भारत के रूसी तेल व्यापार से लेकर ट्रंप के महंगे टैरिफ तक रूस का अमेरिका को जवाबये भारत का आत्मसम्मान…, भारत के रूसी तेल व्यापार से लेकर ट्रंप के महंगे टैरिफ तक रूस का अमेरिका को जवाबRussia Backs India On Trump Tariffs: रूसी विदेश मंत्री सर्गेई लावरोव ने भारत पर ट्रंप की ओर से लगाए गए टैरिफ को लेकर भारत का समर्थन किया है.
Read more »

PM Modi Congratulates US President Trump On ‘Historic Gaza Peace Plan,’ Discusses Trade ProgressPM Modi Congratulates US President Trump On ‘Historic Gaza Peace Plan,’ Discusses Trade ProgressPrime Minister Narendra Modi and US President Donald Trump also discussed ongoing cooperation between India and the United States, particularly in areas of trade, investment, and regional stability.
Read more »

यूक्रेनी राष्ट्रपति जेलेंस्की ने ट्रम्प से बात की: गाजा पीस प्लान की बधाई दी; कहा- रूस-यूक्रेन युद्ध को भी ...यूक्रेनी राष्ट्रपति जेलेंस्की ने ट्रम्प से बात की: गाजा पीस प्लान की बधाई दी; कहा- रूस-यूक्रेन युद्ध को भी ...Ukrainian President Volodymyr Zelensky calls US President Donald Trump to congratulate on Gaza Peace Plan; discusses ending Russia-Ukraine war and strengthening air defense, highlights impact of sanctions on Russia
Read more »

Israel-Hamas Ceasefire: फिर से भारत-पाकिस्तान जंग रुकवाने का डोनाल्ड ट्रंप ने किया दावा, कहा- मैं युद्ध सुलझाने में एक्सपर्टIsrael-Hamas Ceasefire: फिर से भारत-पाकिस्तान जंग रुकवाने का डोनाल्ड ट्रंप ने किया दावा, कहा- मैं युद्ध सुलझाने में एक्सपर्टफिर से भारत-पाकिस्तान जंग रुकवाने का डोनाल्ड ट्रंप ने किया दावा, कहा- मैं युद्ध सुलझाने में एक्सपर्ट Donald Trump again Claims for India-Pak War Amid Israel Hamas Ceasefire
Read more »

Donald Trump: রাশিয়ার কাছ থেকে আর তেল কিনবে না ভারত; কথা হয়েছে মোদীর সঙ্গে, চাঞ্চল্যকর দাবি ট্রাম্পেরDonald Trump: রাশিয়ার কাছ থেকে আর তেল কিনবে না ভারত; কথা হয়েছে মোদীর সঙ্গে, চাঞ্চল্যকর দাবি ট্রাম্পেরIndia would not purchase oil from Russia, Donald Trump s big claim
Read more »



Render Time: 2026-04-02 13:57:57