'घरात खेळतोयस का?', Live मॅचमध्ये कुलदीपवर भडकला ऋषभ पंत, अंपायरनी सुद्धा दिली वॉर्निंग

Ind Vs SA News

'घरात खेळतोयस का?', Live मॅचमध्ये कुलदीपवर भडकला ऋषभ पंत, अंपायरनी सुद्धा दिली वॉर्निंग
Kuldeep YadavRishabh PantCricket News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 107 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

IND VS SA : गुवाहाटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंत गोलंदाज कुलदीप यादववर चिडलेला दिसला. त्याने भर मैदानात कुलदीप यादवला सुनावलं.

IND VS SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जातेय. यातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी पराभव झाला ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

सीरिजमधील शेवटचा सामना हा गुवाहाटी येथे खेळवला जात असून रविवारी या सामन्याचा दुसरा दिवस आहे. मात्र यादरम्यान टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंत गोलंदाज कुलदीप यादववर चिडलेला दिसला. त्याने भर मैदानात कुलदीप यादववर ओरडून तू घरात खेळत नाहीयेस असं म्हटलं. पण नेमकं काय घडलं याविषयी जाणून घेऊयात. टीम इंडियाला का मिळाली वॉर्निंग?दुसऱ्या दिवशी 88 वी ओव्हर कुलदीप यादवने टाकली. पण ओव्हर सुरु करण्यासाठी त्याने 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला. कुलदीप फिल्डिंग सेट करण्यात गुंतला होता. आईवेळी स्टंप माईकमध्ये पंतचा आवाज ऐकू आला की कुलदीपने किमान एक बॉल तरी लवकर टाकावा. ऋषभ पंतने आठवण करून दिली की टायमर लावला आहे, तेव्हा अंपायरने दुसऱ्यांदा वॉर्निंगचा ईशारा केला. मागच्या 8 ओव्हरमध्ये टीम इंडियाने आयसीसीच्या स्टॉप क्लॉक नियमाचं उल्लंघन केल्याची ही तिसरी घटना होती. ICC स्टॉप क्लॉक नियम नेमका काय?टेस्ट क्रिकेटमध्ये एक ओव्हर संपण्याच्या नंतर दुसरी ओव्हर 60 सेकंदांच्या आतमध्ये सुरु करायला हवी. यापेक्षा अधिक वेळ घेतल्यास अंपायर वॉर्निंग देतात. जर अशी वॉर्निंग अम्पायरने दोनदा दिली तर त्याच्या पुढच्यावेळेला संघावर पेनल्टी बसू शकते आणि विरोधी संघाला 5 फुकट धावा मिळू शकतात. प्रत्येक 80 ओवर्स नंतर हे पुन्हा सुरू होते. याचा अर्थ असा की जर या इशाऱ्यांनंतर 80 षटकांपर्यंत कोणतीही चूक झाली नाही, तर त्यानंतरही आणखी दोन वॉर्निंग दिल्या जातील.हेही वाचा : IPL 2026 नंतर एमएस धोनी सह हे 3 स्टार खेळाडू सुद्धा घेणार निवृत्ती, लिस्ट पाहून हैराण व्हाल या नियमाचा उद्देश वेळेचा अपव्यय रोखणे आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंना पुढचे षटक सुरू करण्यास जास्त वेळ लागणार नाही. फक्त गोलंदाजांनाच नाही तर फलंदाज बाद झाल्यावरही असाच नियम लागू होतो. एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर, नवीन फलंदाजाला पहिला चेंडू ३ मिनिटांच्या आत खेळावा लागतो. जर जास्त वेळ घेतला आणि विरोधी संघाने अपील केले तर फलंदाजाला टाइम आउट नियमानुसार बाद घोषित केले जाते.FAQ : कुलदीप यादवने काय चूक केली? कुलदीप यादवने ओव्हर सुरु करण्यासाठी 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला.टीम इंडियाला वॉर्निंग का मिळाली? टीम इंडियाला वॉर्निंग मिळाली कारण मागच्या 8 ओव्हरमध्ये ICC स्टॉप क्लॉक नियमाचं उल्लंघन केल्याची ही तिसरी घटना होती.ICC स्टॉप क्लॉक नियम काय आहे? ICC स्टॉप क्लॉक नियम म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये एक ओव्हर संपण्याच्या नंतर दुसरी ओव्हर 60 सेकंदांच्या आतमध्ये सुरु करायला हवी.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Kuldeep Yadav Rishabh Pant Cricket News Marathi News

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Karnataka Political Crisis Live Update: ದೆಹಲಿ ದಂಡಯಾತ್ರೆ: ಸಿಎಂ ಸಿದ್ದು ಡಿಕೆಶಿ ಬಣದ ನಡುವೆ ತೀವ್ರಗೊಂಡ ರಾಜಕೀಯ ಸಂಘರ್ಷ..!Karnataka Political Crisis Live Update: ದೆಹಲಿ ದಂಡಯಾತ್ರೆ: ಸಿಎಂ ಸಿದ್ದು ಡಿಕೆಶಿ ಬಣದ ನಡುವೆ ತೀವ್ರಗೊಂಡ ರಾಜಕೀಯ ಸಂಘರ್ಷ..!Karnataka Political Crisis Live Update: ದೆಹಲಿ ದಂಡಯಾತ್ರೆ: ಸಿಎಂ ಸಿದ್ದು ಡಿಕೆಶಿ ಬಣದ ನಡುವೆ ತೀವ್ರಗೊಂಡ ರಾಜಕೀಯ ಸಂಘರ್ಷ..!
Read more »

Breaking News LIVE Update: সাত সকালে নিউটাউনে দুর্ঘটনা! বেপরোয়া গাড়ি ছিটকে পড়ল, একের পর এক পথচারীকে...Breaking News LIVE Update: সাত সকালে নিউটাউনে দুর্ঘটনা! বেপরোয়া গাড়ি ছিটকে পড়ল, একের পর এক পথচারীকে...Breaking News LIVE Update: সাত সকালে নিউটাউনে দুর্ঘটন�
Read more »

Live: பிரதமருக்கு ஸ்டாலின் கோரிக்கை வானிலை நிலவரம் IND vs SA டெஸ்ட்Live: பிரதமருக்கு ஸ்டாலின் கோரிக்கை வானிலை நிலவரம் IND vs SA டெஸ்ட்Live: பிரதமருக்கு ஸ்டாலின் கோரிக்கை வானிலை நிலவரம் IND vs SA டெஸ்ட் - அப்டேட்ஸ்
Read more »

PAK vs SL 3rd T20 Live Score: श्रीलंका को दूसरा झटकाPAK vs SL 3rd T20 Live Score: श्रीलंका को दूसरा झटकाPakistan vs Sri Lanka 3rd T20 Today Match Live Score: पाकिस्तान और श्रीलंका के बीच ट्राई सीरीज का तीसरा मुकाबला आज रावलपिंडी स्टेडियम में खेला जा रहा है।
Read more »

Breaking News LIVE Update: কসবার হোটেলে CA-এর রহস্যমৃত্যু! যুগলের খোঁজে হন্যে পুলিস...Breaking News LIVE Update: কসবার হোটেলে CA-এর রহস্যমৃত্যু! যুগলের খোঁজে হন্যে পুলিস...Breaking News LIVE Update: কসবার হোটেলে CA-এর রহস্যমৃত্�
Read more »

Live: காஞ்சிபுரத்தில் தவெக விஜய் கூட்டம் 16 மாவட்டங்களில் மழைக்கு வாய்ப்பு IND vs SALive: காஞ்சிபுரத்தில் தவெக விஜய் கூட்டம் 16 மாவட்டங்களில் மழைக்கு வாய்ப்பு IND vs SALive: காஞ்சிபுரத்தில் தவெக விஜய் கூட்டம் 16 மாவட்டங்களில் மழைக்கு வாய்ப்பு IND vs SA - அப்டேட்ஸ்
Read more »



Render Time: 2026-04-02 22:17:44