Pappu Yadav Challange: महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादाचा परिणाम आता बिहारमध्येही दिसू लागलाय. पूर्णियाचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला केल्याबद्दल राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.
'ऐक राज ठाकरे, मी यूपीचा.महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं', 26/11 हल्ल्यावेळी लढलेल्या Ex कमांडोंने विचारले प्रश्न! Raj Thackeray : 26/11 च्या मुंबई हल्ल्यात कर्तव्य बजावेल्या एक्स मरीन कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला आहे.
'ऐक राज ठाकरे, मी यूपीचा..महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं', 26/11 हल्ल्यावेळी लढलेल्या Ex कमांडोंने विचारले प्रश्न! Raj Thackeray: 26/11 च्या मुंबई हल्ल्यात कर्तव्य बजावेल्या एक्स मरीन कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला आहे.महाराष्ट्रात सध्या भाषेवरून गोंधळ सुरू आहे. मराठी आणि हिंदी घोषणांच्या दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एका रॅलीत मराठी अस्मितेचा नारा दिला. मराठी बोलणार नाही, असा माज करणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन राज ठाकरेंनी केले. व्यावसायिक सुशील केडियाने राज ठाकरेंना आव्हान दिले आणि त्यानंतर माफी मागितली. यानंतर मी मुंबईत येऊन त्यांचा सर्व अहंकार बाहेर काढेन!, असे आव्हान पूर्णियाचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी दिलंय. आता एका सैनिकाने राज ठाकरेंना काही प्रश्न विचारलेयत. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात कर्तव्य बजावेल्या एक्स मरीन कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, 'मी उत्तर प्रदेशचा आहे. पण जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा मी माझा जीव धोक्यात घालून महाराष्ट्रासाठी रक्त सांडले. त्यावेळी तुमचे योद्धे कुठे होते?'प्रवीण तेवतिया यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते गणवेशात दिसत आहेत. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर उत्तर प्रदेश लिहिले आहे. त्यांच्या गळ्यात बंदूक लटकलेली आहे. मी ताज हॉटेलमध्ये 150 लोकांचे प्राण वाचवले. त्यावेळी भाषा मध्ये आली नव्हती, राज्य नव्हते. फक्त देश आणि मानवता होती. म्हणून भाषेच्या नावाखाली देशाचे विभाजन करू नका. हास्याची कोणती भाषा नसते, असे प्रवीण म्हणाले.माध्यमांतील वृत्तानुसार, तेवतिया हे मार्कोस कमांडो होते आणि 26/11 च्या हल्ल्यात त्यांनी त्यांच्या टीमचे नेतृत्व केले. ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या ऑपरेशनमध्ये त्यांना 4 गोळ्यांचा सामना करावा लागला आणि तरीही ते खंबीर राहिले. त्यांच्या शौर्यामुळे 150 हून अधिक लोकांचे प्राण वाचले. भाषेच्या नावावरुन वाद सुरू असताना त्यांनी आपला मुद्दा मांडला आणि राज ठाकरे यांना प्रश्न विचारला.महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी संक्ती करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजयी मेळावा घेतला. मराठी न बोलल्याबद्दल एका हिंदू व्यक्तीला मारहाण केल्याचे म्हणत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मनसेवर टीका केली. 'टोपी घातलेले' लोक मराठी चांगले बोलतात का? असा प्रश्नही उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या बाहेरील भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलच तापलंय.मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या मीरा रोड येथील दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला. यानंतर सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की,"राज ठाकरे याची नोंद घ्या की, मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या अती गैरवर्तनामुळे मी निश्चित केलं आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?". असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान दिले. यानंतर त्यांनी राज ठाकरेंची माफी मागितली. दरम्यान त्यांनी आणखी एक ट्विट करत देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय. जोपर्यंत महाराष्ट्राचे प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे. तोपर्यंत निश्चिंत राहा. कोणावरही कोणत्याही प्रकारचा अत्याचार सहन केला जाणार नाही. न्याय व्यवस्था संपूर्ण सक्रीय राहील. विश्वास हाच प्रेमाचा आधार आहे. प्रेम न्यायाचा आणि न्याय धर्माचा आधार आहे. जय महाराष्ट्र, जय भारत! असे सुशील केडीयांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
Ex Marine Commando Praveen Kumar Praveen Kumar On Raj Thackeray Pappu Yadav News प्रवीण कुमार सुशील केडिया Pappu Yadav Latest News Raj Thackeray News Marathi Language Controversy Marathi Language War पप्पू यादव न्यूज पप्पू यादव लेटेस्ट न्यूज राज ठाकरे न्यूज मराठी भाषा विवाद मराठी भाषा
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर राज ठाकरे संतापले, उपस्थित केलेले प्रश्न विचार करायला लावणारे!Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत. काय म्हणाले राज ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया.
Read more »
महाराष्ट्र में जबरन हिंदी थोपने की कोशिश किसी हाल में स्वीकार नहीं करेंगे : राज ठाकरेमहाराष्ट्र में जबरन हिंदी थोपने की कोशिश किसी हाल में स्वीकार नहीं करेंगे : राज ठाकरे
Read more »
मराठी लोगों के दबाव के कारण ही सरकार ने फैसला वापस लिया : राज ठाकरेमराठी लोगों के दबाव के कारण ही सरकार ने फैसला वापस लिया : राज ठाकरे
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत5 जुलै रोजी मोर्चाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार होते. 5 जुलैचा ठाकरे बंधूंचा एकत्रीत मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
Read more »
उद्धव और राज ठाकरे के साथ आने से महायुति को कोई दिक्कत नहीं : भरत गोगावलेउद्धव और राज ठाकरे के साथ आने से महायुति को कोई दिक्कत नहीं : भरत गोगावले
Read more »
उद्धव और राज ठाकरे मराठी मुद्दे पर दिखा रहे बनावटी चिंता : भाजपा विधायक अमित साटमउद्धव और राज ठाकरे मराठी मुद्दे पर दिखा रहे बनावटी चिंता : भाजपा विधायक अमित साटम
Read more »
