Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आहे.
Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आहे.
बारामतीसोबत आता माढ्यातील लोकसभा निवडणुकीत देखील राजकीय वातावरण तापत चाललं आहे. अशातच शरद पवार यांनी महायुतीला दोन्ही ठिकाणी मोठा झटका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रमुख नेते उत्तमराव जानकर हे शरद गटात सामील होणार आहेत. जानकर हे धनगर समाजाचे नेते असून त्यांना जनतेचा चांगला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. सोलापूर जिल्ह्यातील अनेक जागांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे आता महायुतीला याचा मोठा फटका बसणार आहे. यासोबत अजित पवारांचा पराभव केल्यानंतर पक्ष सोडणार असल्याचे उत्तमराव जानकर यांनी म्हटलं आहे. उत्तमराव जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील अनेक समर्थकांसह शरद पवार गटात सामील होणार आहेत. जानकर यांचा सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. अशा स्थितीत उत्तम जानकर यांनी पक्षप्रवेश केल्याने सोलापूर आणि माढा येथील भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांचे 30 वर्षांचे कट्टर राजकीय वैर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने संपवले. त्यानंतर बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असा इशारा उत्तमराव जानकर यांनी दिला आहे. उत्तमराव जानकर हे शरद पवारांना जाऊन मिळाल्याने त्यांनी अजित पवारांविरोधात भूमिका घेतली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी शुक्रवारी निर्णायक मेळावा घेतला. जानकर यांना समर्थन देण्यासाठी हजारो समर्थक वेळापूर मध्ये जमा झाले होते. उत्तमराव जानकर यांनी बोलावलेल्या बैठकीला जयंत पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सहकार महर्षीचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. यावेळी भाजपने आज पर्यंत फसवणूक केली आहे, अशी भावना कार्यकत्यांनी बोलून दाखवली. यासोबत जानकर समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे जायचे नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे जानकर यांनी मोहिते पाटील यांच्या पाठीमागे आपली ताकत लावत महायुतीसमोरील आव्हान वाढवलं आहे. सहा महिन्यापासून यासाठी पडद्यामागे प्लॅनिंग सुरू असल्याचा गौप्यस्फोट उत्तमराव जानकर यांनी केला आहे."बारामतीमध्ये अजित पवार यांचा पराभव करेपर्यंत मी अजित पवार गटात आहे. अजित पवारांचा पराभव करुन त्यांचा गट सोडणार आहे," असे उत्तमराव जानकर यांनी म्हटलं आहे.Gold Rate: दोन महिन्यात सोनं 11 हजारांनी महागले! 'या' कारणामुळे अचानक वाढल्या किंमती, पाहा आजचे दरनटीला नटी नाही तर काय म्हणायचं? नवनीत राणांवरील बेताल टीकेच...
Ajit Pawar Supriya Sule NCP Pune Sharad Pawar Marathi News Maharashtra News Maharashtra Politics Uttamrao Jankar
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनाराज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
Read more »
LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
Read more »
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि....Eknath Khadse Death Threat : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त समोर. धमकी देणाऱ्यां संशयितांमध्ये काही नावं समोर...
Read more »
शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Read more »
IPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?IPL Points Table Scenario : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) प्लेऑफचं गणित सोपं झालंय.
Read more »
