हॉटेलबाहेर, मैदानात, बससमोर... विराटच्या Autograph साठी चिमुकल्याची धावपळ; Video चा शेवट पाहाच

IPL 2025 News

हॉटेलबाहेर, मैदानात, बससमोर... विराटच्या Autograph साठी चिमुकल्याची धावपळ; Video चा शेवट पाहाच
IPLVirat KohliLifetime Memory
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 125 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

IPL 2025 Virat Kohli Viral Video: विराट कोहली अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच क्लब क्रिकेट स्पर्धेमध्ये आयपीएल 2025 च्या माध्यमातून टी-20 सामना खेळणार आहे.

IPL 2025 Virat Kohli Viral Video: विराट कोहली अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच क्लब क्रिकेट स्पर्धेमध्ये आयपीएल 2025 च्या माध्यमातून टी-20 सामना खेळणार आहे.इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे.

पहिला सामना कोलकात्यामागील ईडन गार्डन्सच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बंगळुरुचा संघ काही दिवसांपासून कोलकात्यामध्ये तळ ठोकून आहे. दोन्ही संघ मैदानात कसून सराव करत आहे. याच सरावादरम्यानचा एक रंजक व्हिडीओ समोर आला आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सराव करताना पाहण्यासाठीही मोठी गर्दी होताना दिसत आहे. अशाच गर्दीतील एक चिमुकला विराटची स्वाक्षरी म्हणजेच ऑटोग्राफ मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मुलाबरोबर व्हिडीओत जे काही घडलं ते सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यामुळेच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.व्हिडीओच्या सुरुवातीला आरसीबीचा संघ सरावाला जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे. बाहेर पडताना दाराजवळच गर्दीत एक चिमुकला हातात विराटचा फोटो आणि मार्कर घेऊन उभा असतो. विराट जवळून जातो तेव्हा सुरक्षेसाठी लावलेली दोरी न ओलांडता हा चिमुकला विराटकडे ऑटोग्राफ मागतो. पण विराट त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि पुढे निघून जातो. त्यानंतर हा चिमुकला आरसीबीच्या संघाचा पाठलाग करत मैदानात प्रेक्षकांच्या गॅलरीत पोहोचतो.मैदानात पोहचल्यानंतर स्टॅण्डमधून विराटला सराव करताना पाहतानाही हा छोटा मुलगा मैदानाजवळ लावलेल्या जाळ्यांवर चढून, 'विराट भैय्या... विराट भैय्या...' अशा हाका मारुन विराटचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र इथेही तो अपयशी ठरतो.त्यानंतर आरसीबीचा संघ मैदानातून बाहेर पडतानाही ता चिमुकला गर्दीमध्ये त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या खांद्यावर बसून हातात विराटचा फोटो आणि मार्कर घेऊन ऑटोग्राफसाठी आवाज देताना दिसतो. मात्र विराट गर्दीमधून पुढे निघून जातो आणि बसमध्ये दरवाजाजवळच्या पहिल्या सीटवर बसतो. मात्र यावेळी विराटचं लक्ष बसच्या दाराजवळ गर्दीत असलेल्या चिमुकल्याकडे जातो. तो एका सहकाऱ्याच्या मदतीने चिमुकल्याकडील स्वत:चा फोटो आणि मार्कर मागवून घेतो. हा सहकारी बस बाहेर येऊन विराटचा फोटो घेतो आणि बसमध्ये जातो. बसमध्ये बसलेला विराट त्याच्या फोटोवर चिमुकल्याला ऑटोग्राफ देतो. त्यानंतर हा फोटो पुन्हा गर्दीतील अनेक हात लागत चिमुकल्यापर्यंत पोहोचतो. विराटच्या ऑटोग्राफसहीतचा हा फोटो हातात पडल्यानंतर चिमुकल्याचा आनंद पाहण्यासारखा असतो. दरम्यान विराटही बसमध्ये थम्ब अप दाखवून या चाहत्याच्या जिद्दीचं कौतुक करताना आणि त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देताना दिसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ... Virat Kohli reacted and said"Wait" to a little fan among the packed crowd and then asked the security staff to get the poster and gave his autographआजच्या सामन्यामध्ये विराटची कामगिरी कशी राहणार याबद्दलची चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. विराट हे पर्व रजत पाटीदारच्या कॅप्टनशीपखाली खेळणार आहे. तर कोलकात्याचं नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे.स्पोर्ट्स

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

IPL Virat Kohli Lifetime Memory Little Fan

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'...म्हणून पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना जिंकावा'; माजी भारतीय क्रिकेटरनं सांगितलं कारण'...म्हणून पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना जिंकावा'; माजी भारतीय क्रिकेटरनं सांगितलं कारणChampions Trophy 2025 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आजचा सामना दुबईच्या मैदानात होणार असून त्यापूर्वीच भारताच्या माजी क्रिकेटपटूने हे विधान केलं आहे.
Read more »

पाक सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, रिझवान आणि हर्षित राणामध्ये मैदानात धक्काबुक्की, Video Viralपाक सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, रिझवान आणि हर्षित राणामध्ये मैदानात धक्काबुक्की, Video ViralChampions Trophy 2025 : भारत - पाक​ हायव्होल्टेज सामन्यात बऱ्याचदा खेळाडू एकमेकांशी भिडताना तुम्ही यापूर्वी देखील पाहिलं असेल. असाच राडा रविवारी झालेल्या भारत - पाक सामन्यात सुद्धा झाला.
Read more »

Video: विराटने विजयी चौकार लगावत शतक झळावल्यानंतर पाकिस्तानी तरुणींनी काय केलं पाहाचVideo: विराटने विजयी चौकार लगावत शतक झळावल्यानंतर पाकिस्तानी तरुणींनी काय केलं पाहाचPakistan Fans Celebration Virat Kohli Century: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीने त्याचं चौथं शतक झळावलं. या सामन्यानंतर पाकिस्तानमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Read more »

आता कन्फर्म तिकिट मिळणारच! होळीसाठी मध्य रेल्वे चालवणार 28 स्पेशल ट्रेन; वेळ, तारीख सगळ जाणून घ्याआता कन्फर्म तिकिट मिळणारच! होळीसाठी मध्य रेल्वे चालवणार 28 स्पेशल ट्रेन; वेळ, तारीख सगळ जाणून घ्याHoli Special Train News: होळीनिमित्त गावाला जाताय मध्य रेल्वेकडून 28 ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या रेल्वेचे वेळापत्रक एकदा पाहाच.
Read more »

Video : 'तुम भी कविता पढोगे... मराठी में?' आशाताईंच्या प्रश्नाचं विकी कौशलनं खास शैलीत दिलं उत्तर...Video : 'तुम भी कविता पढोगे... मराठी में?' आशाताईंच्या प्रश्नाचं विकी कौशलनं खास शैलीत दिलं उत्तर...Video : छावा (Chhaava) या चित्रपटाच्या निमित्तानं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेता विकी कौशल यानं पुन्हा जिंकलं अख्ख्या महाराष्ट्राचं मन.... हा व्हिडीओ पाहाच
Read more »

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित-विराटने मैदानात केलं असं सेलिब्रेशन; पाहा VIDEOChampions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित-विराटने मैदानात केलं असं सेलिब्रेशन; पाहा VIDEOChampions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मैदानात स्टंपसह दांडिया खेळत आनंद व्यक्त केला. तर जडेजा आणि अर्शदीप सिंग यांनी भांगडा करताना दिसून आलेत.
Read more »



Render Time: 2026-04-02 06:13:15