मुंबईतील रस्ते कामांबाबत विधानभवनात हायव्होल्टेज बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते.
हाय व्होल्टेज बैठकीत आदित्य ठाकरे अन् एकनाथ शिंदे आले आमने सामने, अध्यक्षासंमोर म्हणाले 'आधी यांच्या.' मुंबईतील रस्ते कामांबाबत विधानभवनात हायव्होल्टेज बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते.
हाय व्होल्टेज बैठकीत आदित्य ठाकरे अन् एकनाथ शिंदे आले आमने सामने, अध्यक्षासंमोर म्हणाले 'आधी यांच्या...' मुंबईतील रस्ते कामांबाबत विधानभवनात हायव्होल्टेज बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते.मुंबईतील रस्ते कामांच्या निकृष्ठतेवर विधानसभेत विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज विधानभवनात हायव्होल्टेज बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते. या बैठकीत आमदारांनी रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत तक्रारींचा पाढा वाचला. दुसरीकडे मुंबईतील रस्त्यांच्या क्राॉक्रीटीकरणाच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी अशी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या समक्ष विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली. मुंबई रस्ते कामाच्या बैठकीत आदित्य ठाकरे- शिंदे समोरासमोर आले होते. बैठकीतील काही व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओत एकनाथ शिंदे येताच सर्व आमदार उभे राहिल्याचं दिसत आहे. मात्र आदित्य ठाकरे हे खाली बसूनच राहिले.बैठकीत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी अशी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली. यावेळी एकनाथ शिंदे त्यांच्या समोरच बसले होते. मुख्यमंत्र्यांकडेही रस्ते कामांबाबत चौकशीची मागणी करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.एकनाथ शिंदेंनी रस्ते कामांच्या आढावा घेणारा रिपोर्ट सादर केला. टप्पा 1 मध्ये 23 टक्के काम झाले तर टप्पा 2 मध्ये 0.5 टक्के काम झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रस्त्यांच्या कामांचा दर्जा; मुदतीत काम पूर्ण होणार का?; समन्वयातील अडथळे यावर आमदारांनी लक्ष वेधलं. आशिष शेलार यांनीही आपल्या मतदारसंघातील रस्ते कामाबाबत असणा-या समस्या मांडल्या. 31 मेपर्यंत मुंबईतील सुरु असलेली सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. 15 मीटरपेक्षा कमी असणारे, लहान रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण न करता अस्फॉल्टमध्ये त्यांची कामे करावीत अशी सूचनाही आमदारांनी केली. सदर विषयावर पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे. एका महिन्याने 25 एप्रिलला ही बैठक पार पडणार आहे.महाराष्ट्र बातम्या
Aditya Thackeray Eknath Shinde शिवसेना आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजी राजे यांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पाहा ते काय म्हणाले...छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे. तसेच शहाजी राजांच्या स्मारकाबाबतही फडणवीसांनी माहिती दिली आहे. झी २४तास च्या बातमीची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.
Read more »
विधानभवनात जेव्हा समोरा समोर आले ठाकरे, शिंदे, फडणवीस... एकाचा नमस्कार, दुसऱ्याने पाहिलं पण नाहीउद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमने सामने आले. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले देखील नाही.
Read more »
आदित्य ठाकरेंची उपमुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका, शिवसेनेने प्रत्युत्तर देत म्हटलं, 'आदूबाळ हे आजचे सूर्याजी पिसाळ...'Aaditya Thackeray Vs Eknath Shinde: आदित्य ठाकरे आणि शिवसेनेत ट्विटर वॉर, ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताच शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.
Read more »
मुंबई पुणे शिवनेरी ST बसच्या ड्रायव्हरचे तडकाफडकी निलंबन; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची सर्वात मोठी कारवाईमुंबई पुणे शिवनेरी ST बसच्या ड्रायव्हरचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
Read more »
महाराष्ट्र: एकनाथ शिंदे पर कुणाल कामरा के बयान से भड़की शिवसेना, होटल में तोड़फोड़; आदित्य ठाकरे बोले- कायर...शिवसेना कार्यकर्ताओं ने रविवार को मुंबई के खार इलाके में होटल यूनिकॉन्टिनेंटल में तोड़फोड़ की। इस होटल में स्टैंड-अप कॉमेडियन कुणाल कामरा के शो की शूटिंग हुई थी, जिसमें उन्होंने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर
Read more »
एकनाथ शिंदेवर पॅरडी अन् शिवसैनिकांचा राडा; वादावर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया!Kunal Kamra: स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आपल्या राजकीय विनोदांसाठी ओळखला जातो. आपल्या कॉमेडीमुळे तो अनेकदा वादात सापडलाय. कामरा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही; खरं तर, त्याचा वादांशी जवळचा संबंध आहे. दरम्यान आता कुणालचा आणखी एक कॉमेडी व्हिडीओ समोर आलाय.
Read more »
