Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसे नं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसे नं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसे नं पहिला डाव टाकलाय.
पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.विधानसभा रणसंग्रामाआधी मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढताहेत. लोकसभेला मोदींना पाठिंबा देणा-या राज ठाकरेंनी विधानसभेसाठी 'एकला चलो'चा नारा दिलाय. राज ठाकरेंनी यापुढे जात मनसेच्या २ उमेदवारांची नावं घोषित करून पहिला डाव टाकलाय. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. शिवडीमधून मनसेनं बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवलंय. शिवडीत सध्या शिवसेना ठाकरे पक्षाचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. इथं महायुती कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पोटनिवडणुकीत भुजबळांचा पराभव केल्यानं जायंट किलर म्हणून पुढे आले. शिवडीमधून आमदार म्हणून निवडून आले. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून मनसेत कार्यरत. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे.पंढरपूरमधून मनसेनं दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केलीय. पंढरपूरमध्ये सध्या भाजपचे समाधान आवताडे विद्यमान आमदार आहेत. इथं मविआकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शाखा प्रमुख ते मनसेचे राज्याचे नेते असा त्यांचा प्रवास आहे. विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांचे समर्थक आहेत. त्यांनतर तालुका पातळीवर शिवसेना पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर त्यांच्यासोबत राहिले. सोलापूर जिल्हा संघटक पदावर काम केले. सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील राज ठाकरे यांची सभा यशस्वी केली होती. 2009 साली पंढरपूर विधानसभा मनसेकडून लढवली होती. शिवडी आणि पंढरपूरपाठोपाठ वरळीमधून मनसेकडून संदीप देशपांडेंची वर्णी लागणार असल्याचंही जवळपास निश्चित मानलं जातंय. सोलापुरात पदाधिका-यांसोबत बोलताना राज ठाकरे यांनी तसे संकेतच दिलेत. गेल्या काही दिवसांपासून मनसेनं वरळीवर लक्ष केंद्रित केलंय. नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राज ठाकरेंनी वरळीतील नागरी समस्यांवर चर्चा केली होती. त्यामुळं आदित्य ठाकरेंच्या वरळीच्या गडाला राज ठाकरेच सुरुंग लावणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.महाराष्ट्र
Biggest Political Plan Of MNS In Maharashtra Maharashtra Politics राज ठाकरे मनसे
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Read more »
मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणारयेत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती आणि माहाविकास आघाडीपाठोपाठ राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे.
Read more »
चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते.
Read more »
शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरMaharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत. बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत.
Read more »
मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टSindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
Read more »
