Geoglyphs In Konkan: रत्नागिरीतील देऊडमध्ये सापडलेली कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
Geoglyphs In Konkan : रत्नागिरीतील देऊडमध्ये सापडलेली कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.: कोकणात अनेक ऐतिहासिक स्थानं आहेत. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जातात.
कोकणातील अनेक भागात कातळशिल्प मोठ्या प्रमाणात आढळतात. अश्मयुगीन काळातील ही काताळशिल्प म्हणजे जणू गुढच आहे. इतिहासपूर्व काळातील मानवी संस्कृतीच्या या पाउलखुणा आहेत. कोकणातील कातळशिल्प ही संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यात आता आणखी एका कातळशिल्पाची भर पडली आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील देउड कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. रत्नागिरीसह राजापूर तालुक्यातील अश्मयुगीन कातळशिल्प आढळून आली आहेत. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनायाच्यामार्फत कातळशिल्प परिसराचा व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गंत कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील देउड येथे प्रसाद शंकर आपडे यांच्यासह काहींच्या मालकीच्या जागेत कातळशिल्प आढळून आले होते. हे कोरलेले मध्याश्मयुगीन कातळशिल्प आहे. या कातळावर एकशिंगी गेंडा, गाढव, वानर, हरिण आणि इतर पावलांचे ठसे रेखाटण्यात आले आहे. एकूण 10 बाय 10 चौरस मीटर असे एकूण 100 चौरस मीटर इतके आहेत. कातळशिल्प परिसरातील 310 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. रत्नागिरीत देउड येथे सापडेले काताळशिल्प हे मध्यमपाषाण युगातील आहेत म्हणजेच जवळपास 20,000 ते 10,000 वर्षांपूर्वीचे आहेत. महाराष्ट्र व गोव्याजवळ 900 किमी क्षेत्रावर हे कातळशिल्प पसरले आहेत. फक्त रत्नागिरीतच 70 ठिकाणी 1,500 हून अधिक अशा कलाकृती आहेत. ज्यातील सात कलाकृतींना युनेस्कोने संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली आहे. कोकणातील ही कातळशिल्पे अरबी समुद्र आणि लगतचा सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास १७० किमी लांब आणि २५ किमी रुंद पट्ट्यात आढळली आहेतमहाराष्ट्र
Geoglyphs And Petroglyphs Stone Art Difference Between Geoglyphs And Petroglyphs Why Are Petroglyphs Important Geology And Petrology Geoglyphs Ratnagiri Geoglyphs In Konkan News About महाराष्ट्र Protected Monuments In Maharashtra
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
विशाळगड अतिक्रमण प्रकरण तापलं! स्थानिकांना अज्ञातांकडून मारहाणीचा आरोप; घरांवर दगडफेकVishalgad Illegal Construction Matter: कोल्हापूरमधील विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भातील प्रकरण चिघळल्याचं चित्र पाहायला मिळत असून या परिसरात तणाव आहे.
Read more »
नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजNavra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.
Read more »
पूजा खेडकरमुळे दिव्यांगांवर शंका घेणं महिला IAS अधिकाऱ्याला महागात पडलं; थेट राष्ट्रीय...Pooja Khedkar Case Police Complaint Against IAS officer: पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असतानाच या महिला अधिकाऱ्याने केलेलं विधान आता तिच्या अंगलट येणार असं चित्र पाहायला मिळत आहे.
Read more »
ठाण्यातील 500 वर्ष जुना घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा प्रस्ताव; शिवप्रेमी संतापलेघोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा वादग्रस्त ठराव अखेर मागे घेण्यात आला आहे.
Read more »
Vidhan Sabha Election 2024: राज्यातील पहिलीच लढाई बाप विरुद्ध बेटा? वडील म्हणाले, 'त्याचा बाप..'Father Vs Son Fight In Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे या दोन पक्षांमध्ये संघर्ष झाला तसेच चित्र पुन्हा दिसण्याची दाट शक्यता आता एका निर्णयाने निर्माण झाली आहे.
Read more »
Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...Maharashtra Weather News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस आता अखेर काहीशी विश्रांती घेणार असून अखेर सूर्यनारायणाचं दर्शन होण्यास पूरक स्थिती पाहायला मिळत आहे.
Read more »
