Viral Video: व्हायरल व्हिडीओमध्ये बिबट्या कचऱ्यात अन्नाचा शोध घेताना दिसत आहे. यावेळी तो प्लास्टिक तोंडात घेऊन खातानाही दिसत आहे.
Viral Video : जंगलं नष्ट करुन मानवी वस्त्या निर्माण करण्यात आल्या आणि प्राण्यांवर आपला निवारा गमावण्याची वेळ आली. यामुळेच अनेक ठिकाणी वन्यप्राणी आणि माणसांमध्ये संघर्ष होतानाही दिसतो. निसर्गाचा समतोल राखताना वन्य प्राण्यांनाही त्यांचा निवारा देणं, जंगलं नष्ट न करणं महत्त्वाचं का आहे याचा प्रत्यय दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
17 सेकंदाची ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये बिबट्या चक्क कचरा खाताना दिसत आहे. राजस्थानच्या माऊंट अबूमधील ही घटना आहे. वनअधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. बिबट्या हा निसर्गातील सर्वात प्राणघातक शिकारी प्राण्यांपैकी एक आहे, जो त्यांच्या गुप्ततेसाठी, ताकदीसाठी आणि अनुकूलतेसाठी ओळखला जातो. परंतु या व्हिडीओत बिबट्या अत्यंत वेगळ्या रुपात दिसत आहे. व्हिडीओमध्ये बिबट्या हताशपणे प्लास्टिक, घाण आणि इतर कचऱ्यातून कचऱ्यात अन्न शोधताना दिसत आहे.हे किती दुःखद दृश्य आहे. शिवांश साह यांनी माउंट अबूजवळ हा बिबट्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. पाहा आपला कचरा जंगलात कसा पोहोचत आहे!, असं कासवान यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे. चला चांगले बनूया, जंगलांचे रक्षण करूया, कचऱ्याचे व्यवस्थापन करूया आणि जंगलाला त्याचे घर परत देऊया, असा संदेशही त्यांनी दिला आहे. What a sad visual. Shri Shivansh Sah recorded this #leopard near Mount Abu.See how our trash is reaching the wild ! pic.twitter.com/V5YUSOwXiW— Parveen Kaswan, IFS October 18, 2025व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडिया युजर्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून, वन्य प्राण्यांच्या अधिवासाच्या समस्येवर सरकारने कारवाई करत कठोर पाऊल उचलावं अशी मागणी केली.खूप दुःखद. एक गोष्ट स्पष्ट आहे. आम्ही आमची नागरी जाणीव स्वेच्छेने बदलणार नाही. त्यासाठी मोठा दंड आकारावा लागेल, असं एका युजरने म्हटलं आहे. तर एकाने म्हटलं आहे की, विकासाच्या नावाखाली त्यांचे अधिवास त्यांच्याकडून काढून घेतले जात आहेत, जंगले नष्ट केली जात आहेत. पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे पण सरकारला त्याचा काही फरक पडत नाही.तिसऱ्याने टिप्पणी करत लिहिलं आहे की, मी माउंट अबूचा आहे. मी आधी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये दोन अस्वल डंपिंग यार्डमध्ये होते. आता गायी, म्हशी, अस्वल आणि बिबट्या हे सर्व एकत्र दिसतात. मला नावं सांगायची नाहीत, पण ते काहीही करत नाहीत. खूप वाईट वाटत आहे.चौथ्याने म्हटले: खरोखर खूप वाईट. जेव्हा आपण त्यांची जमीन अतिक्रमण करतो तेव्हा या गरीब प्राण्यांकडे दुसरा पर्याय नसतो. माणसाच्या लोभाला अंत नाही.गेल्या वर्षीपर्यंत, भारतात बिबट्यांची संख्या 13 हजार 874 होती, 2018 ते 2022 दरम्यान दरवर्षी 1.08 टक्के वाढ नोंदवली गेली. पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असं दिसून आलं आहे की मध्य प्रदेश मध्ये देशातील बिबट्यांची सर्वाधिक संख्या आहे, त्यानंतर महाराष्ट्र , कर्नाटक आणि तामिळनाडू आहे.
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
खेसारी चुनाव जीतेंगे या नहीं, इसमें डाउट है, मनोज तिवारी का आ गया पहला रिएक्शनBJP MP Manoj Tiwari Video: भोजपुरी कलाकार खेसारी लाल के चुनाव लड़ने पर बीजेपी सांसद मनोज तिवारी ने Watch video on ZeeNews Hindi
Read more »
कॉर्सेट ब्लाउज पर स्कर्ट स्टाइल साड़ी में ठांय लगीं Nia Sharma, शादी सीजन में आप भी कर लें तुरंत कॉपीNia Sharma Video: निया शर्मा ने अंकिता लोखंड़े और विक्की जैन की दिवाली पार्टी में चार चांद लगा दिए Watch video on ZeeNews Hindi
Read more »
राम सिंह पर बीजेपी का विश्वास बरकरार, सुनिए क्या-क्या बोलेRam Singh Video: बिहार विधानसभा चुनाव कों लेकर बीजेपी ने दोबारा बगहा सदर सीट से मौजूदा विधायक राम Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Video: सीतापुर में बिक रहीं पटाखे जैसी मिठाइयां, सुतली बम जैसी मिठाइयों ने बच्चों को लुभायाsitapur video: यूपी के सीतापुर में दीपावली के त्यौहार को लेकर इन दोनों एक निजी मिठाई की दुकान पर Watch video on ZeeNews Hindi
Read more »
जबलपुर में पलटा सरसों के तेल से भरा ट्रक, लूटने की मच गई होड़, देखें VideoJabalpur Video: जबलपुर जिले में सरसो के तेल से भरा एक ट्रक पलट गया, जिसके बाद तेल लूटने के लिए होड़ Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Lucknow News: महिला यात्रियों ने TTE को बुरी तरह पीटा, शर्ट भी फाड़ डाली, ट्रेन में सीट को लेकर हुआ था विवादLucknow TTE Marpeet Viral Video: लखनऊ के चारबाग रेलवे स्टेशन पर महिला यात्रियों ने ट्रेन टिकट Watch video on ZeeNews Hindi
Read more »
