Mumbai cold wave : मुंबईत मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद; किमान तापमानाचा आकडा पाहून तुमचाच तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण, हा इतका गारठा आलाय कुठून?
Mumbai cold wave : मुंबईत मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद; किमान तापमानाचा आकडा पाहून तुमचाच तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण, हा इतका गारठा आलाय कुठून? Mumbai cold wave : IMD नं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात कडाक्याच्या थंडीची तीव्रता वाढत असून, आता मुंबई शहरालाही हा थंडीच्या लाटेचा विळखा बसल्याचं पाहायला मिळत आहे.
हवामान विभाहाचा अंदाज पाहता मुंबई शहरात ही परिस्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम असेल असंही सांगण्यात येत आहे. गुरुवारी मुंबईच्या किमान तापमानाचा आकडा 15 अंश, तर गिरीस्थान असणाऱ्या माथेरानचं किमान तापमान 17 अंश नोंदवण्यात आलं होतं. तर शुक्रवारी समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत सांताक्रूझ इथं पारा 14.9 अंशावर पोहोचल्यानं मोसमातील सर्वात नीचांकी तामपानाची नोंद करण्यात आली. कडाक्याच्या थंडीमुळं आता मुंबईकरांची दातखिळी बसत असून, शहरातच नागरिकांना पाचगणी, महाबळेश्वर अन् माथेरानचा अनुभव येत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, शहरात पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळी तामपानात लक्षणीय घट पाहता येत असून, मुंबईसुद्धा चांगलीच गारठली आहे हे यातून स्पष्ट होत आहे. आयएमडीच्या माहितीनुसार 12 डिसेंबरला शहराच्या तापमानाचा आकडा 15°C च्या आसपास राहण्याची अपेक्षा असून, त्यानंतर 16 डिसेंबरपर्यंत ते हळूहळू 16°C पर्यंत वाढेल आणि 14 ते 16 डिसेंबर दरम्यान हा आकडा 16 ते 18°C दरम्यान असेल पोहोचेल. थंडी असूनही, मुंबई शहरासाठी IMDनं कोणताही शीतलहरीचा इशारा जारी केलेला नाही. सध्या संपूर्ण राज्यात तापमानात घसरण झाली आहे. अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा किमान तापमानाची नोंद असून काही ठिकाणी सरासरीच्या आकड्यावर तापमान स्थिरावलं आहे. उत्तर भारतातून शीतलहरींची दिशा आता दक्षिण भारताकडे अतिशय वेगानं वळल्यामुळे राज्यातील किमान तापमानावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. ज्यामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंशांच्या खालीसुद्धा आला आहे. IMD च्या निरीक्षणानुसार वाऱ्यांच्या विचित्र स्थितीमुळं राज्यात दीर्घकाळ टीकणारी थंडी अनुभवता येणार आहे. अतिशय ताकदीनं उत्तरेकडील कोरडे वारे कोणत्यही अडथळ्याशिवाय महाराष्ट्रात धडकत आहेत. त्यात निरभ्र आकाश आणि वातावरणातील किमान आर्द्रतेमुळं रात्रीच्या वेळी तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी पश्चिमी झंझावाताची निर्मिती नियंत्रणात असून, मागील काही वर्षांमध्ये हिवाळ्यात सातत्यानं निर्माण होणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं शीतलहरींच्या प्रवासात अडथळे येऊन त्याचा थंडीवर परिणाम होताना दिसलेला. यंदाचं वर्ष मात्र इथं अपवाद ठरत आहे. गंभीरने कॉलर पकडली आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या अन्..; 'त्या' खेळाडूचं करिअर संपलं, पुन्हा दिसलाच नाही11 शरद पवारांकडे किती पैसा आहे? संपत्तीचा आकडा समोर; सर्वाधिक गुंतवणूक शेअर्समध्ये, सुनेकडून कर्ज अन्...Yuvraj Singh Birthday: आलिशान घर ते महागड्या गाड्या; किती संपत्तीचा मालक आहे युवराज सिंग? जाणून घ्या Net WorthDaily Numerology 12 December : 'या' लोकांना आज भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका; तुम्हाला नशिबाची साथ मिळणार
Mumbai Weather Mumbai Cold Wave Mumbai News Mumbai Temprature Mumbai City Lowest Temprature Matheran Mahabaleshwar Harsh Winter Maharashtra Weather News Weather News Cold Wave Mumbai Cold Temperatures Imd Lowest Temperature Pune Cold Wave Maharashtra Severe Cold Wave 2025 Maharashtra Weather Update December 2025 Cold Pune Mumbai Winter Alert Aajachya Batmya Todays News Latest News Breaking News Headlines Marathi News Mumbai News Maharashtra News Pune News India News टुडेज न्यूज ब्रेकिंग न्यूज
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
दिल्ली-NCR में रात में हल्की बारिश हुई: यूपी-राजस्थान समेत 5 राज्यों में बारिश की संभावना; जम्मू-कश्मीर में...India Weather, Cold Wave Updates, Cold Wave in India, India Weather, Winter Updates, Winter in India, Winter Alert, IMD Weather forecast, Weather News
Read more »
मैदानी राज्यों में गर्मी बढ़ी, एमपी-छत्तीसगढ़ में पारा 30° पार: रायपुर में 36° तापमान रिकॉर्ड हुआ; मनाली में ...India Weather, Cold Wave Updates, Cold Wave in India, India Weather, Winter Updates, Winter in India, Winter Alert, IMD Weather forecast, Weather News
Read more »
हिमाचल में पारा -14ºC, धूप के बावजूद भयंकर ठंड: अगले दो दिन बर्फबारी-बारिश की संभावना; MP-राजस्थान में तेज ...India Weather, Cold Wave Updates, Cold Wave in India, India Weather, Winter Updates, Winter in India, Winter Alert, IMD Weather forecast, Weather News
Read more »
जम्मू-कश्मीर में अगले 5 दिन बर्फबारी-बारिश की संभावना: राजस्थान में दिन का पारा 40 डिग्री के करीब पहुंचा, म...india Weather, Cold Wave Updates, Cold Wave in India, India Weather, Winter Updates, Winter in India, Winter Alert, IMD Weather forecast, Weather News
Read more »
तमिलनाडु के ऊटी में ओस जमी, MP में शीतलहर: राजस्थान-झारखंड समेत 5 राज्यों के 30 जिलों में पारा 10° से नीचे;...IMD Weather Update; Mumbai Rainfall Snowfall Cold Wave Alert Himachal Uttarakhand Jammu Kashmir| MP Rajasthan
Read more »
Severe Cold Wave: অ্যাঁ? মাইনাস ৭ ডিগ্রি! ভয়ংকর শৈত্যপ্রবাহে কাঁপছে ভারত! কলকাতায় কী হবে? পশ্চিমবঙ্গে?Severe Cold Wave J K Cold Wave Kashmir Faces Severe Cold Wave With Sub-Zero Night Temperatures Leh Hits minus 7 degree C heavy snowfall
Read more »
