महाराष्ट्र हादरला! मित्रासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार, सहा जणांना अटक

Gang Rape In Parbhani News

महाराष्ट्र हादरला! मित्रासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार, सहा जणांना अटक
Parbhani Crime Newsपरभणी क्राईम न्यूज
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

परभणीत सामूहिक अत्याचार झाला आहे. सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Parbhani Crime News : सर्वत्र दिवाळीची धामधूम असताना महाराष्ट्रात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मित्रासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परभणीत ही खळबळजनक घटना घडली आहे.

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव परिसरातील इटोली शिवारात 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेला सहा दिवस उलटले असून जिंतूर पोलीस ठाण्यात सहा आरोपी विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी जलद गतीने तपास करीत सहाच्या सहा आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली.या मध्ये एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती आहे, 14 ऑक्टोबर रोजी एक तरुणी आणि तिच्या मित्रासोबत झाडाखाली गप्पा मारत बसले होते. त्यावेळी काही विकृत मनोवृत्तीच्या तरुणांनी त्यांना पकडत तरुणीवर अत्याचार केला. यावेळी तरुणीजवळ असलेली रोकड आणि इतर साहित्य देखील काढून घेतले. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. 29 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कारकल्याणमध्ये एका 29 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी प्रियकराने केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडित तरुणीचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली आणि तिचे अश्लील व्हिडीओ बनवले. एवढंच नाही तर तरुणीच्या कुटुंबीयांनाही धमक्या देत ब्लॅकमेल केल्याचं समोर आलं आहे. मोबाईलमध्ये साठवलेले अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. विनीत गायकर असे या आरोपी प्रियकराचे नाव असून कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Parbhani Crime News परभणी क्राईम न्यूज

 

United States Latest News, United States Headlines



Render Time: 2026-04-02 01:18:16