पुणे, सोलापूर, सातारा नंतर महाराष्ट्रात पाचवे IT पार्क उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या IT पार्कला मान्यता दिली आहे.
Kolhapur IT park : पुण्याच्या जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कला 4 पर्याय उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रात पाचवे मोठे IT पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हे पाचवे IT पार्क कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर IT पार्कला मंजूरी दिली आहे. कोल्हापूरमध्ये आयटी पार्क उभारण्याच्या अनुषंगाने मोठ्या हालचाली सुरु आहेत. कोल्हापूरच्या या IT पार्कसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या आयटी पार्कसाठी शेंडा पार्कमधील 34 हेक्टर, तर नवीन क्रीडा संकुल आणि शासकीय दंत महाविद्यालयासाठी 8 हेक्टर, अशी 42 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. या जागेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात आयटी पार्क स्थापनेसह आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर आयटी पार्कनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. शेंडा पार्क येथील आरोग्य व कृषी विभागाच्या जागा आयटीसह विविध शासकीय प्रयोजनांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित होता. आयटी पार्कच्या उभारणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला होता. कोल्हापूर आयटी क्षेत्रासाठी पूरक असतानाही जागेअभावी आयटी पार्कचा निर्णय होत नसल्याने आमदार राजेश क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे हा विषय विधिमंडळात मांडला होता. त्यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आयटी पार्कसाठी जागा देण्याची मागणी करीत स्थानिकस्तरावरही पाठपुरावा केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांकडून जागेबाबत प्रस्ताव मागितला होता. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक प्रस्ताव तयार केला होता. तो विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच आयटी पार्कसाठी जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे.हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी आणि स्थानिक पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुणे विमानतळाजवळील पुरंदर येथे एक नवीन आयटी पार्क उभारण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच पुण्यातील या दोन IT पार्कनंतर सोलापूर जिल्ह्यात तिसरे मोठे IT पार्क उभारले जात आहे. महाराष्ट्रातील चौथे मोठे IT पार्क सातारा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. यानंतर आता कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातील पाचवे मोठे IT पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
4 Alternatives To Pune's World Famous Hinjewadi I Pune It Park Solapur It Park Satara It Park Kolhapur Will Be The Fifth IT Park In Maharashtra सातारा आयटी पार्क सोलापूर आयटी पार्क पुणे आयटी पार्क कोल्हापूर आयटी पार्क
