U19 World Cup 2026 : अंडर 19 वर्ल्ड कप 2026 जिंकण्यासाठी भारताने इंग्लंड संघासमोर 412 धावांचं टार्गेट ठेवलं होत मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात इंग्लंड अपयशी ठरली. यासह टीम इंडियाने सहाव्यांदा U19 वर्ल्ड कप जिंकला आहे.
U19 World Cup 2026 : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अंडर 19 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना खेळवला जातोय. या सामन्यात भारताच्या युवा शिलेदारांनी जबरदस्त कामगिरी करत तब्बल 411 धावांचा डोंगर उभा केला. अंडर 19 वर्ल्ड कप 2026 जिंकण्यासाठी त्यांनी इंग्लंड संघासमोर 412 धावांचं टार्गेट ठेवलं होत मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात इंग्लंड अपयशी ठरली.
यासह टीम इंडियाने सहाव्यांदा U19 वर्ल्ड कप जिंकला आहे. वैभव सूर्यवंशीने केली शतकीय कामगिरी : झिम्बाब्वेमध्ये अंडर 19 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना खेळवला जात आहे. या सामन्यात सुरुवातीला टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. या सामन्यात टीम इंडियाकडून फलंदाज वैभव सूर्यवंशीने 175 धावांची कामगिरी केली. वैभवने 80 बॉलमध्ये 175 धावांची खेळी केली. यात 15 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश आहे. तर कर्णधार आयुष म्हात्रेने 53 धावा केल्या. त्यासोबतच वेदांत त्रिवेदीने 32, विहान मल्होत्राने 30, अभिज्ञान कुंडूने 40, कनिष्क चौहानने 37 धावा केल्या. टीम इंडियाने 9 विकेट्स गमावून तब्बल 411 धावा केल्या. आणि इंग्लंडला विजयासाठी 412 धावांचं टार्गेट दिलं. 100 धावांनी मिळवला विजय : टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 412 धावांचं टार्गेट दिलं होतं. हे टार्गेट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात इंग्लंडकडून कालेब फाल्कोनरने 115 धावा, बेन मेसने 45, बेन डॉकिन्सने 66, थॉमस रीवने 31 तर जेम्स मिंटोने 28 धावा केल्या. टीम इंडियाने इंग्लंडला 311 धावांवर ऑलआउट केले. यात टीम इंडियाच्या गोलंदाजांपैकी सर्वाधिक ३ विकेट्स या आर एस अंबरिशने घेतल्या. दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहानने प्रत्येकी 2 धावा केल्या आणि खिलन पटेल आणि कर्णधार आयुष म्हात्रेने प्रत्येकी 1 धावा घेतल्या. टीम इंडियाने इंग्लंडला ऑल आउट करून 100 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने केला नवा रेकॉर्ड : टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये 411 धावांची खेळी करणारा पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाने अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताविरुद्ध 253 धावा केल्या होत्या. तर प्लेऑफमध्ये सुद्धा 350 धावांपेक्षा अधिक स्कोअर करणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी सुद्धा हा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावे होता. टीम इंडियाने 2016 मध्ये नामिबिया विरुद्ध 400 हून अधिक धावांची खेळी केली होती तर अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा हा तिसरा 400 पेक्षा जास्त धावांचा स्कोअर होता; इतर कोणत्याही संघाकडे एकापेक्षा जास्तवेळा अशी कामगिरी केली नाही. इंग्लंडची प्लेईंग 11 :बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयेस, थॉमस र्यू , कालेब फाल्कनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबास्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अॅलेक्स ग्रीनभारताची प्लेईंग 11 :आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे , विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू , आर एस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन
Team India Cricket News Marathi News Ayush Mhatre
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
LIVE: விஜய் வழக்கில் இன்று தீர்ப்பு.. IND vs ENG U19 உலகக் கோப்பை இறுதி போட்டிLIVE: விஜய் வழக்கில் இன்று தீர்ப்பு.. IND vs ENG U19 உலகக் கோப்பை இறுதி போட்டி - முக்கிய அப்டேட்ஸ்!
Read more »
IND U19 VS ENG U19: भारत ने टॉस जीता, पहले बल्लेबाजी का फैसलाअंडर-19 विश्व कप 2026 के फाइनल में भारत और इंग्लैंड के बीच मुकाबला खेला जा रहा है। भारत ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। भारतीय टीम छठी बार खिताब जीतने की उम्मीद लगाए हुए है।
Read more »
वैभव का अंडर-19 वर्ल्ड कप फाइनल में हाईएस्ट स्कोर: एक पारी में सबसे ज्यादा छक्के लगाए; 55 बॉल पर सेकंड फास्...Vaibhav Sooryavanshi India Vs England U19 World Cup Final 2026 Records Update;
Read more »
Vaibhav Sooryavanshi Under-19 World Cup Final: ১৫ চার ১৫ ছয়ে ১৭৫! বিশ্বকাপ ফাইনালে বৈভবের বেদম ধোলাই বিট্রিশদের, ৪১১ রানের এভারেস্টে ভারত!India vs England U19 World Cup Final IND post record 411-9 after Vaibhav Sooryavanshi 175
Read more »
वैभव का अंडर-19 वर्ल्ड कप फाइनल में हाईएस्ट स्कोर: एक पारी में सबसे ज्यादा छक्के लगाए; 55 बॉल पर सेकंड फास्...Vaibhav Sooryavanshi India Vs England U19 World Cup Final 2026 Records Update;
Read more »
U19 World Cup Final: বৈভবের বিস্ফোরণে বিট্রিশদের ছিন্নভিন্ন করে ষষ্ঠবার বিশ্বচ্যাম্পিয়ন ভারতindia beats engaland to win U19 World Cup Final 2026
Read more »
