Maharashtra Municipal Corporation Election Man Dies: मतदानाच्या दिवशी हादरवून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली असून मतदानासाठी निघालेल्या एका व्यक्तीच्या निधानामुळे घरातील करता पुरुष गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आली आहे.
Maharashtra Municipal Corporation Election Man Dies: अकोला महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या एका मतदाराला जीव गमवावा लागला आहे.
या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. कोण आहे ही व्यक्ती?प्रभाग क्रमांक 18 मधील शहा बाबू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठच्या सुमारास मतदानासाठी घरातून निघालेल्या गौतम भगवान गरड यांना रस्त्यातच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते कोसळले. उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले.घरचा कमवता पुरुष गेलागौतम गरड हे पानपट्टीचा छोटा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी अनुसया गरड आणि दिव्यांग मुलगा कुणाल आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या अचानक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर मतदान केंद्र परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, गरड कुटुंबाला शासनाने तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.मतदान केंद्रांवर काय सुविधा?प्रत्येक केंद्रावर पिण्याचे पाणी, प्रतीक्षा शेड, स्वच्छता गृह, प्रकाश, दिव्यांगांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर, दिशादर्शक फलक उपलब्ध आहेत. दिव्यांग, गर्भवती आणि ज्येष्ठांना प्राधान्य देण्यात येते. प्रत्येक प्रभागात एक गुलाबी/सखी केंद्र महिलांकडून चालवले जात आहे. ज्यात सर्व कर्मचारी महिला असतील. तसेच एक आदर्श केंद्र गुलाबी रंगसंगतीत सजवण्यात आले आहे.अकोला महानगरपालिकेसाठी 17.25 टक्के मतदान झालं आहे.
Maharashtra Municipal Corporation Election Maharashtra Municipal Corporation Election 2026 Maharashtra Local Body Election Maharashtra Municipal Election Local Body Election Mahanagar Palika Election Maharashtra महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक मनपा निवडणूक Municipal Corporation महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक BMC Election 2025 Date BMC Election 2025 Voting Date BMC Election 2025 Result Date Shiv Sena Mns BJP Uddhav Thackeray Raj Thackeray Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde Latest News On Maharashtra Municipal Election 202 Breaking News On Maharashtra Municipal Corporatio Mahanagar Palika Nivadnuk Batmya Mahanagar Palika Marathi Batmya Maharashtra News Mumbai News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Sharad Pawar NCP First List of Candidates: शरद पवारांनी उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर, NCP च्या यादीत फक्त 7 नावं, कोण आहेत हे उमेदवार?BMC Election, BMC, बीएमसी निवडणूक, Mumbai Municipal Corporation, बृहन्मुंबई महानगरपालिका, Municipal Corporation Election, Maharashtra Municipal Election, Local Body Election, Mahanagar Palika Election, Maharashtra, महाराष्ट्र, महानगरपालिका निवडणूक, मनपा निवडणूक, Municipal Corporation, महाराष्ट्र...
Read more »
BMC Election 2026: महायुति में सीट बंटवारा तय, इतने सीटों पर चुनाव लड़ेगी बीजेपी और शिवसेनाMaharashtra News in Hindi | BMC Election 2026 | BMC Election | Mumbai BMC Election | BMC Election news | Seat-sharing finalized in Mahayuti alliance | BJP | Shiv Sena | Mumbai Municipal Corporation Elections | Maharashtra |
Read more »
उद्धव बोले- बीजेपी वोट चुराने के बाद उम्मीदवार चुरा रही: लोकतंत्र पर अब भीड़तंत्र का कब्जा; 20 साल बाद शिवस...Maharashtra Municipal Corporation Election 2026 Politics Update; Follow MNS Shiv Sena UBT Manifesto, BJP, Uddhav Thackeray, Raj Thackeray Devendra Fadnavis Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
राज ठाकरेंच्या कार्टूनप्रमाणे वागतोय NCP शरद पवार पक्ष? सुप्रिया सुळेंनी दिलेलं उत्तर पाहाचMaharashtra Municipal Corporation Election: खासदार सुप्रिया सुळे यांनी झी 24तासला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या पक्षाची बाजू मांडत अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
Read more »
Maharashtra Municipal Election Voting LIVE: काँग्रेस कार्यालय जाळलं नवी मुंबईत शिंदेंचा उमेदवार पोलिसांच्या ताब्यात अन्...Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates (महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक मतदान लाइव्ह बातम्या): मुंबईसहीत महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडत आहे.
Read more »
कोण राज ठाकरे आणि कोण..? भाजपा आमदाराचा हल्लाबोल; मराठी माणूस बोलायचे अन् किचनमध्ये...Maharashtra Municipal Corporation Election: निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राज आणि उद्धव ठाकरे ज्या मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत त्याच मुद्द्यावरुन भाजपाच्या महिला आमदाराने जोरदार टोला लगावल्याचं पाहायला मिळत आहे.
Read more »
