Chemical Attack: या प्रकरणासंदर्भातील माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली असून तिघांनी नेमकी काय काय तयारी केली होती यासंदर्भातील धक्कादायक आणि तितकीच हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.
Chemical Attack: गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या रिसिन नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला आहे. या कारवाईत चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
या माध्यमातून एका संशयित दहशतवादी सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. या तिघांकडून तीन पिस्तूल, 30 काडतुसे आणि एरंडीचे चार लिटर तेल, तीन मोबाइल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.इस्लामिक स्टेट शी संबंधअटक करण्यात आलेल्यांत डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख व सुहेल मोहम्मद सलिम यांचा समावेश आहे. या तिघांनी लखनौ, दिल्ली व अहमदाबादमध्ये अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. या कटातील म्होरक्या मध्य आशियातील खुरासान येथील इस्लामिक स्टेट शी संबंधित आहे, अशी माहिती गुजरात एटीएसचे उपमहासंचालक सुनील जोशी यांनी दिली. एटीएसनुसार, डॉ. सय्यद हा उच्चशिक्षित व कट्टरवादी असून मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आवश्यक पैसा उभा करणे आणि त्यासाठी तरुणांची भरती करण्याची योजना त्याने आखली होती. त्याचा खुरासान येथील म्होरक्या पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून या टोळीला शस्त्रे पाठवत होता.दोघे उत्तर प्रदेशातीलडॉ. सय्यद व्यतिरिक्त अन्य दोन आरोपी आझाद सुलेमान शेख व मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम उत्तर प्रदेशचे रहिवासी असून, त्यांना बनासकांठा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. या दोघांनी कथितरीत्या राजस्थानच्या हनुमानगडमधून शस्त्रे मिळवून ती डॉ. सय्यदला पुरवली होती. डॉ. सय्यद याला 17 नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.सीडीआरमधून माहिती बाहेरया तिघांचे कॉल डिटेल रेकॉर्ड आणि चौकशीतून बाहेर आलेल्या माहितीनुसार गेल्या एक वर्षापासून ते अनेक संवेदनशील शहरांची माहिती घेत होते. त्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, यांचा संबंध एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीशी आहे काय, याचा तपास सुरू आहे.अशी झाली होती तयारीया डॉक्टरने साथीदारांच्या मदतीने दहशतवादी हल्ला करण्यासाठी एरंडीच्या बियांवर रासायनिक संशोधन सुरू केले होते. यासाठी आवश्यक उपकरणे, कच्चा मालही जमा करून ठेवला होता. विष तयार करण्यासाठी आवश्यक प्रारंभीची रासायनिक प्रक्रियाही त्याने सुरू केली होती.काय आहे रिसिन विष?एरंडीच्या बियांवर प्रक्रिया झाल्यानंतर उरलेल्या कचऱ्यांतून हे भयंकर विष तयार केले जाते. हे विष पोटात गेले तर श्वासोच्छ्वासास त्रास, घशावर सूज येते. इंजेक्शनच्या माध्यमातून ते शरीरात गेले तर शारीरिक क्रियांवर गंभीर परिणाम होऊन ते अत्यंत घातक ठरते.डॉ. सय्यदचे पाकिस्तान कनेक्शनएटीएसच्या चौकशीत डॉ. सय्यदने दिलेल्या माहितीनुसार, भारतात हल्ला घडवून आणण्यासाठी त्याने गांधीनगर जिल्ह्यात कलोलमध्ये एका निर्मनुष्य जागी शस्त्रे जमवली होती. त्यांचा म्होरक्या अबू खदिजा हा मूळ अफगाणिस्तानचा असून इस्लामिक स्टेटशी संबंधित आहे. पाकिस्तानमधील अनेकांच्या तो संपर्कात होता.
Terror Plot Busted Telangana Doctor UP Arrested Gujarat Ats Chemical Aatack Gurat
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Garba Attack: गुजरात में गरबा पंडाल पर पथराव भीड़ ने दुकानों-गाड़ियों में लगाई आग, पुुलिस पर भी हमलाGarba Attack: गुजरात में गरबा पंडाल पर पथराव भीड़ ने दुकानों-गाड़ियों में लगाई आग, पुुलिस पर भी हमला Attack in Navratri Garba of Gujarat news in hindi राज्य
Read more »
वाराणसी में युवक ने जहर खाकर दी जान: पत्नी के अफेयर की जानकारी पर विवाद, पत्नी और सास पर मुकदमा दर्जyoung man committed suicide by consuming poison in Varanasi.
Read more »
Murshidabad Shocker: এতদিনের সম্পর্ক ধুয়ে মুছে সাফ! প্রেমিকের বাড়ির উঠোনেই মর্মান্তিক পরিণতি তরুণীরMurshidabad girl consume poison at her boyfriend house due to denial of relationship
Read more »
लाल साड़ी में Isha Malviya ने लगाए Poison Baby गाने पर जबरदस्त ठुमके, क्रेजी लुक्स और अदाओं ने चलाया फैंस पर जादूIsha Malviya Dance: ईशा मालवीय ने लाल साड़ी में Poison Baby गाने पर जबरदस्त ठुमके लगाए. ईशा की Watch video on ZeeNews Hindi
Read more »
SIR in Bengal: হুগলিতে হাহাকার! SIR আতঙ্কে শিশুকন্যার সঙ্গেই বিষ পান গৃহবধূর, সাহায্যে অভিষেক...Panic in Hooghly Woman drinks poison with young girl in fear of SIR help arrives from Abhishek banerjee
Read more »
